अकोला : असंख्य रूग्णांच्या जीवन तणावमुक्त करणाऱ्या मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी आत्महत्या करत जीवन संपवल्याची घटना घडली. ही घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. डॉ. प्रशांत जावरकर यांनी न्यू तापडिया नगरमधील त्यांच्या राहत्या घरी हे टोकाचं पाऊल उचललं. डॉ प्रशांत जावरकर यांच्या आत्महत्येमुळं वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
राहत्या घरी केली आत्महत्या : 48 वर्षीय डॉ प्रशांत जावरकर हे अकोल्यातील एका खासगी रुग्णालयात सेवा बजावत होते. मागील अनेक वर्षांपासून ते इथं काम करत होते. डॉ. प्रशांत जावरकर मुळचे अमरावती इथले रहिवासी होते. ते अकोला शहरात न्यू तापडिया नगरातील नंद लेआऊटमध्ये एका बंगल्यात राहत होते. त्यांनी शनिवारी राहत्या घरी आत्महत्या करत जीवन संपवलं. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
डॉ प्रशांत जावरकर यांच्या मृत्यूमुळं खळबळ : डॉ प्रशांत जावरकर यांच्या आत्महत्येप्रकरणी सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. यासंदर्भात प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. डॉ प्रशांत जावरकर मृत्यूमुळं वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जीएमसी इथं पाठवला आहे. तणाव, नैराश्य आणि मानसिक आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांचे समुपदेशन करून अनेकांना मदत करणाऱ्या डॉक्टरांनी आता स्वतःचा जीव संपवल्याच्या घटनेमुळं अकोला शहरात खळबळ उडाली आहे.
प्रकरणाचा पुढील तपास सुरू : "शहरातील प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रशांत जावरकर यांनी आत्महत्या करत जीवन संपवलं. आपल्या न्यू तापडिया नगर इथल्या राहत्या घरी त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत," अशी माहिती तपास अधिकारी धर्माळे यांनी दिली.
हेही वाचा :