ETV Bharat / state

गेल्या 10 वर्षांतील विक्रमी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली केवळ 9 महिन्यात; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

2024-25 या आर्थिक वर्षातील पहिल्या 9 महिन्यांत आतापर्यंत एकूण 1,39,434 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आलीय.

Chief Minister Devendra Fadnavis
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 7, 2025 at 12:35 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

नागपूर- केंद्र सरकारच्या डीपीआयआयटीने परकीय गुंतवणुकीचा डिसेंबर 2024 अखेरचा अहवाल जाहीर केलाय. गेल्या 10 वर्षांतील सर्वाधिक वार्षिक परकीय गुंतवणूक अवघ्या 9 महिन्यांत महाराष्ट्राने प्राप्त केल्याचा दावा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय. एक्सवर त्यांनी यासंदर्भात एक पोस्ट शेअर केलीय.

पहिल्या 9 महिन्यांत आतापर्यंत एकूण 1,39,434 कोटी रुपये : त्यात ते म्हणतात की, 2024-25 या आर्थिक वर्षातील पहिल्या 9 महिन्यांत आतापर्यंत एकूण 1,39,434 कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आलीय. ही गेल्या 10 वर्षांत महाराष्ट्रात कोणत्याही एका वर्षात आलेल्या परकीय गुंतवणुकीपेक्षा सर्वाधिक आहे. असे होत असतानाच महायुती सरकारने आपलाच 2016-17 या आर्थिक वर्षाचा विक्रम मोडलाय. अर्थात या आर्थिक वर्षातील एक तिमाही आणखी बाकी आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन! माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, अजितदादा पवार आणि मंत्रिमंडळाच्या नेतृत्वात आपल्या महाराष्ट्राची घोडदौड ही अशीच कायम राहील, असंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधोरेखित केलंय.

Record foreign investment in Maharashtra
महाराष्ट्रात विक्रमी परकीय गुंतवणूक (Source- ETV Bharat)

महाराष्ट्र प्रथम तर गुजरात तिसऱ्या क्रमांकावर : महाराष्ट्रातील गुंतवणूक गुजरातने पळवल्याची ओरड कायमच होत असते. डीपीआयआयटीने परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत कोणत्या राज्यात किती गुंतवणूक आलेली आहे, याची माहिती सादर केली असून, त्यामध्ये महाराष्ट्र प्रथम तर कर्नाटक दुसऱ्या आणि गुजरात तिसऱ्या स्थानी आहे, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलंय.

हेही वाचा -

  1. इच्छामरण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी कर्नाटकमधील महिलेचा लढा; जाणून घ्या करीबासम्मा यांचा संघर्षमय प्रवास
  2. डॉक्टरांच्या हलगर्जीमुळं पत्नी आणि बाळाचा मृत्यू, आता मला इच्छामरण द्या - आदिवासी पतीची न्यायालयाकडं मागणी - Application For Euthanasia