ETV Bharat / state

कुंचल्यातून कॅनव्हासवर रेखाटलेल्या दुर्मीळ चित्रांचा प्रचार अन् प्रसार; कीर्ती गायकवाडांकडून नवोदितांना प्रोत्साहन देण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रयत्न

चित्रकार कुंचल्यातून भवतालाचे प्रतिबिंब कॅनव्हासवर रेखाटत असतो. त्यामुळं चित्रकाराची एक कलाकृती ही एका पुस्तकाच्या वर्णनापेक्षाही काही कमी नसते, असं म्हटलं जातं.

art gellery Special Story
कुंचल्यातून कॅनव्हासवर रेखाटलेल्या दुर्मीळ चित्रांचा प्रचार अन् प्रसार! (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : October 11, 2025 at 7:30 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई : लेखक किंवा साहित्यिक हे आपल्या भावना किंवा जे त्यांना इतरांना सांगायचं आहे, ते आपल्या लेखणीच्या माध्यमातून कागदावर मांडत असतात. तर व्यंगचित्रकार हा एका व्यंगचित्राच्या माध्यमातून दहा पानाच्या निबंधाचं वर्णन आपल्या व्यंगचित्रातून करत असतो. तर चित्रकार कुंचल्यातून भवतालाचे प्रतिबिंब कॅनव्हासवर रेखाटत असतो. त्यामुळं चित्रकाराची एक कलाकृती ही एका पुस्तकाच्या वर्णनापेक्षाही काही कमी नसते, असं म्हटलं जातं. लहान लहान चित्रातून मोठमोठं वर्णन अनेक चित्रकारांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय.

art gellery Special Story
दुर्मीळ आणि जुन्या चित्रांचं प्रदर्शन (ETV Bharat Reporter)

चित्रांचा प्रचार आणि प्रचार : मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरी ही चित्रकारांच्या चित्रांसाठी प्रसिद्ध आहे. तर गेल्या कित्येक वर्षांपासून आर्ट विस्ता आणि आर्ट गॅलरीच्या माध्यमातून जुनी आणि दुर्मीळ अशी विविध प्रकारची चित्रं लोकांना माहीत असावी, यासाठी त्या चित्रांचा प्रचार आणि प्रचार केला जातो. या आर्ट विस्ता आणि आर्ट गॅलरीच्या सीईओ कीर्ती गायकवाड करत आहेत. त्यामुळं देश-विदेशात दुर्मीळ आणि जुन्या चित्रांचं कशाप्रकारे प्रदर्शन भरवलं जातंय? यामागे नेमका काय उद्देश आहे? याबाबतचा खास रिपोर्ट...

कुंचल्यातून कॅनव्हासवर रेखाटलेल्या दुर्मीळ चित्रांचा प्रचार अन् प्रसार! (ETV Bharat Reporter)

दुर्मीळ आणि जुन्या चित्रांचं प्रदर्शन : "गेल्या बारा वर्षांपेक्षा अधिक जुन्या आणि दुर्मीळ चित्रांचं प्रदर्शन भरवतेय. विशेष म्हणजे 1948 रोजीचं चित्र देखील आमच्याकडे उपलब्ध आहे. तर स्वातंत्र्यानंतरच्या काळातील देखील अनेक दुर्मीळ आणि जुन्या चित्रांचं प्रदर्शन भरवलंय. ही चित्रं तुम्हाला अन्य ठिकाणी कुठंही पाहायला मिळणार नाहीत. पेंटिंग्स आर्ट्स आमच्याकडे पाहायला मिळतात. या कामासाठी मला माझे पती कुमार गायकवाड, जे स्वतः एक आर्टिस्ट आहेत. तेही मदत करतात. त्यांची सुद्धा या ठिकाणी अनेक पेंटिंग्स उपलब्ध आहेत," असं कीर्ती गायकवाड यांनी सांगितलं.

art gellery Special Story
दुर्मीळ आणि जुन्या चित्रांचं प्रदर्शन (ETV Bharat Reporter)

अपसा, लँडस्केप पेंटिंग्ज : "याठिकाणी अनेक जुनी पेटिंग्ज पाहायला मिळतील. इथं रझा सरांचं वॉटर ग्राफ हे पेंटिंग उपलब्ध आहे. जे कुठंही पाहायला मिळत नाही. तर नसरीन मोहम्मदी यांची खूप दुर्मीळ अशी चित्रं आहेत, जी फक्त आमच्याकडे उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, या ठिकाणी अपसा पेंटिंग्ज, लँडस्केप पेंटिंग्ज आदी प्रकारातील पेंटिंग्ज उपलब्ध आहेत," असंही कीर्ती गायकवाड यांनी म्हटलंय.

art gellery Special Story
दुर्मीळ आणि जुन्या चित्रांचं प्रदर्शन (ETV Bharat Reporter)

नवोदितांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न : "कलाक्षेत्र म्हटलं की पैसा आणि ओळख लागते, त्याशिवाय तुमचं काम होत नाहीत असं म्हटलं जातं. पण जे या क्षेत्रात नवोदित आर्टिस्ट येऊ इच्छितात. त्यांच्यासाठी त्यांच्या चित्रांना प्रसिद्धी मिळावी किंवा त्यांच्या चित्रांचे मार्केटिंग व्हावं. त्या कलाकारांचं नाव मोठं व्हावं, नवोदित चित्रकारांना प्लॅटफॉर्म उपलब्ध व्हावा, यासाठी आम्ही आमच्या आर्ट विस्ता आणि आर्ट गॅलरीच्या माध्यमातून त्या कलाकारांच्या चित्रांचं प्रदर्शन भरवतो. नवोदितांना कुठंतरी प्रोत्साहन मिळावं आणि त्यांनी या क्षेत्रात चांगलं काम करावं, हाच आमचा मुख्य हेतू आहे. तसंच, नवीन चित्रकारांना प्रोत्साहन मिळावं, यासाठी आमचा प्रयत्न असतो," असंही कीर्ती गायकवाड यांनी सांगितलं.

art gellery Special Story
दुर्मीळ आणि जुन्या चित्रांचं प्रदर्शन (ETV Bharat Reporter)

कोणत्या प्रसिद्ध चित्रकारांच्या चित्रांचा समावेश

  • सय्यद हैदर रजा
  • फ्रांसिस न्यूटन सूजा
  • बद्री नारायण
  • बी. प्रभा
  • बी. विठ्ठल
  • सुहास रॉय
  • नसरीन मोहम्मदी
  • कांता रेड्डी
art gellery Special Story
दुर्मीळ आणि जुन्या चित्रांचं प्रदर्शन (ETV Bharat Reporter)
art gellery Special Story
दुर्मीळ आणि जुन्या चित्रांचं प्रदर्शन (ETV Bharat Reporter)
art gellery Special Story
दुर्मीळ आणि जुन्या चित्रांचं प्रदर्शन (ETV Bharat Reporter)
art gellery Special Story
दुर्मीळ आणि जुन्या चित्रांचं प्रदर्शन (ETV Bharat Reporter)
art gellery Special Story
दुर्मीळ आणि जुन्या चित्रांचं प्रदर्शन (ETV Bharat Reporter)

हेही वाचा :

  1. दादरमध्ये मृत कबुतरांसाठी प्रार्थनासभा; महापालिका निवडणुकीत ताकद दाखवण्याचा जैन समाजाचा इशारा
  2. छोटा राजनचा साथीदार, कुख्यात गुंड डीके रावला ठोकल्या बेड्या; खंडणी प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
  3. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं 31 हजार कोटींचं पॅकेज फसवं, केवळ 5 हजार कोटीच शेतकऱ्यांच्या पदरात पडणार - संजय राऊत