ETV Bharat / state

धनगर आरक्षणावर सरकार सकारात्मक, केंद्राकडं प्रस्ताव पाठवणार; सभापती राम शिंदे यांची स्पष्टोक्ती - RAM SHINDE ON DHANGAR RESERVATION

विधान परिषदेच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल अमरावतीमध्ये प्रा. राम शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना राम शिंदे यांनी धनगर आरक्षणाबाबत सरकार सकारात्मक असल्याचं सांगितलं.

RAM SHINDE ON DHANGAR RESERVATION
प्रा. राम शिंदेंचा सत्कार (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 26, 2025 at 8:17 PM IST

2 Min Read

अमरावती : प्रा. राम शिंदे यांची विधान परिषद सभापतीपदी निवड झाल्याबद्दल तसंच, धनगर समाजाचे आणि अमरावती जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार आणि आमदारांचा सत्कार अमरावतीत झाला. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा सत्कार सोहळा पार पडला. "धनगर समाजाचे अनेक प्रश्न आहेत, त्यापैकी धनगर आरक्षण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळं लवकरच या मुद्द्यावर सरकार तोडगा काढणार आहे. राज्याच्या सभागृहामध्ये यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊन तो केंद्राकडं पाठवणार," अशी माहिती विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी यावेळी बोलताना दिली.

स्मरणात राहील असा सत्कार; प्रा. शिंदे : "हा सत्कार आयुष्यात कायमस्वरूपी लक्षात राहील. अमरावतीमध्ये का सत्कार होतोय?, हे मलाही कळत नाही, आपण सर्व एवढ्या मोठ्या संख्येनं उपस्थित आहात. जिल्ह्यातले सर्व विधानसभा सदस्य परिषदेचे सदस्य, लोकसभा खासदार, राज्यसभेचे खासदार उपस्थित आहेत. त्यामुळं सत्कारावेळी मी भारावून गेलोय," अशी भावना सभापती प्रा राम शिंदे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली.

विधान परिषद सभापती राम शिंदे यांची स्पष्टोक्ती (ETV Bharat Reporter)

अमरावतीत साकारणार भव्य अहिल्यादेवींचा पुतळा : पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा भव्य पुतळा अमरावतीमध्ये साकारला जावा असा, असा प्रस्ताव आमदार सुलभा खोडके यांनी मांडला. पुतळ्यासाठी होणारा संपूर्ण खर्च आपल्या पगारांमधून करणार असल्याचं आमदार रवी राणा यांनी सांगितलं. तर, त्या पुतळ्याच्या परवानगीसाठी प्रशासन आपल्या पाठीशी असल्याची ग्वाही प्रा. शिंदे यांनी दिली.

अहिल्यादेवींच्या जन्मगावी पंतप्रधान मोदी येणार : "माजी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी 11 सप्टेंबर 1996 ला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झालेल्या अहिल्यानगर जिल्ह्यामधील जामखेड तालुक्यातील चौंडी गावाला भेट दिली होती. आता 300 व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनासुद्धा भेटीचं निमंत्रण दिलं आहे. त्यामुळं पंतप्रधान मोदी निश्चितच या कार्यक्रमाला उपस्थित राहतील," असा विश्वास प्रा. शिंदे यांनी व्यक्त केला.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा वारसा : "अहिल्यादेवी होळकरांचा जन्म ज्या घरात झाला, त्याच घरात माझा जन्म झाला. त्यामुळं त्यांचा वारसा मला नक्कीच मिळाला आहे. त्यामुळं माझी जबाबदारी अधिक वाढली आहे. अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या कार्यकाळात मंदिर जीर्णोद्धाराची अनेक कामे केलीत. त्या कुटुंबातील त्यांचा वारसा सांगणारा मी आहे, त्यामुळं माझी जबाबदारी अधिक वाढली आहे, अस प्रा. शिंदे म्हणाले.

धनगर आरक्षणावर लवकरच निर्णय घेऊ; बावनकुळे : "केंद्रात आणि राज्यात भाजपाचं सरकार असून सुद्धा धनगर आरक्षणावर निर्णय होत नसल्याची खंत, धनगर नेते दिलीप एडतकर यांनी व्यक्त केली. त्यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे यांनी म्हणाले, "राज्यपालांनंतर विधान परिषदेचे सभापतीपद महत्त्वाचे आहे, त्यामुळं लवकरच या संदर्भात विधानपरिषद आणि विधानसभेमध्ये निर्णय घेऊन तो लवकरच केंद्राकडं पाठवता येईल. त्या अनुषंगानं पाठपुरावा करता येईल."

कार्यक्रमाला मान्यवरांची उपस्थिती : कार्यक्रमाला खा. बळवंतराव वानखडे, खासदार अनिल बोंडे, आमदार रवि राणा, आमदार सुलभाताई खोडके, आमदार किरण सरनाईक, आमदार प्रताप अडसड, आमदार संजय खोडके, आमदार राजेश वानखडे, आमदार प्रविण तायडे, आमदार गजानन लवटे, आमदार चंदु यावलकर, दिलीप एडतकर, प्रवीण ढवळे, उमेश घुरडे आणि डॉ. वैभव ढवळे यांच्यासह अनेक धनगर नेते, समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

हेही वाचा :

  1. शेकडो वर्षांची परंपरा कायम; काठीतील राजवाडी होळीच्या दर्शनाला लाखो भाविकांची गर्दी
  2. पोलिसांचा 'स्मार्ट पहारा'; 'स्मार्ट ई-बिट सिस्टीम'मुळे घरफोडीसह गुन्हेगारीवर नियंत्रण येणं होणार शक्य
  3. नंदुरबारमधील मंदिरांमध्ये प्रवेशासाठी 'ड्रेस कोड' लागू होणार; महाराष्ट्र न्यास परिषदेत सर्वानुमते ठराव

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.