मोठी बातमी : ठाकरे ब्रँड! हिंदी सक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र मोर्चा निघणार, मराठी अस्मितेसाठी आले एकत्र
हिंदी सक्तीविरोधात मनसे आणि शिवसेना - उबाठा या दोन्ही पक्षांचा एकच मोर्चा निघणार आहे.

Published : June 27, 2025 at 9:32 AM IST
|Updated : June 27, 2025 at 10:58 AM IST
मुंबई : हिंदी सक्तीविरोधात मनसे आणि शिवसेना - उबाठा या दोन्ही पक्षांचा एकच मोर्चा निघणार आहे. याबाबतची एक पोस्ट शिवसेना - उबाठा पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर शेयर केली आहे. "महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्तीविरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल!" असं कॅप्शन टाकत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचे फोटो संजय राऊत यांनी 'एक्स'वर शेयर केले आहेत. त्यामुळं मराठी भाषेसाठी, मराठी अस्मितेसाठी ठाकरे बंधू एकत्र येत असल्याचं स्पष्ट झालं आहे.
राज ठाकरे - उद्धव ठाकरे एकत्र : हिंदीसक्ती आणि त्रिभाषा सूत्रविरोधात ठाकरे बंधू मैदानात उतरले आहेत. महाराष्ट्रतील शाळात हिंदी सक्तीविरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल, अशी 'एक्स' पोस्ट संजय राऊत यांनी केली आहे. त्यामुळे हिंदी सक्तीविरोधात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याचं निश्चित झालं आहे.
महाराष्ट्रतील शाळांत हिंदी सक्ती विरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल!
— Sanjay Raut (@rautsanjay61) June 27, 2025
जय महाराष्ट्र! pic.twitter.com/A8ATq2ra0k
एकत्र मोर्चा काढण्यासाठी केले प्रयत्न : हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्रविरोधात ठाकरे बंधू मैदानात उतरले आहेत. राज ठाकरे यांचा 5 जुलैला तर 7 तारखेला उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मोर्चा काढण्यात येणार होता. ठाकरे बंधूंचे दोन वेगवेगळे मोर्चे एकाच दिवशी काढण्यासाठी प्रयत्न सुरु होते. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही यासाठी हालचाली सुरु होत्या. 5 जुलैच्या मोर्च्यात सहभागी व्हावं, यासाठी प्रयत्न केले जात होते. यानंतर आज खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रतील शाळात हिंदी सक्तीविरोधात एकच आणि एकत्र मोर्चा निघेल, अशी एक्स पोस्ट संजय राऊत यांनी केली आहे.
सस्नेह जय महाराष्ट्र,
— Raj Thackeray (@RajThackeray) June 26, 2025
आज सकाळी आपल्या मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी आणि मराठी माणसासाठी येत्या ६ जुलैला मोर्च्याची घोषणा केली होती. त्यात थोडा बदल आहे, हा मोर्चा रविवार ६ जुलैच्या ऐवजी, ५ जुलै शनिवारी सकाळी १० वाजता असणार आहे. बाकी ठिकाण आणि इतर सर्व तपशील तसेच असणार आहेत. त्यामुळे… pic.twitter.com/BUN1Av0GSK
मनसेच्या नेत्यांची प्रतिक्रिया : "राज ठाकरे यांनी गुरुवारी आवाहन केलं होतं, त्याला समोरुन प्रतिसाद मिळाला. मराठी भाषेची गळचेपी आणि हिंदी भाषेची सक्ती लादण्याचा प्रयत्न होतोय, त्याविरोधात मराठी माणसाने एकत्र येऊन आवाज उठवणे गरजेचे आहे. मराठी भाषा हा राजकीय मुद्दा नाही. मराठी भाषेपुढे कोणीही छोटं-मोठं नाही, सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे. यासाठी राज ठाकरे सकारात्मक आहेत, आम्ही सगळे सकारात्मक आहोत. 5 जुलै रोजी हा मोर्चा एकत्रितपणे निघेल," अशी माहिती मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली.
हेही वाचा -
- प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्तीची नको- शरद पवार यांचे ठाकरे बंधुंच्या भूमिकेला समर्थन
- तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती नाही, राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी प्रभावीपणे राबवणार – शिक्षणमंत्री दादा भुसे
- "हा केवळ भाषेचा नाही, तर महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न", हिंदी सक्तीवरून उद्धव ठाकरेंचा सरकारवर निशाणा

