ETV Bharat / state

लोको पायलटसाठी वातानुकूलित रनिंग रूम्स आणि एसी केबिन; रेल्वेकडून लोको पायलटसाठी विविध सुविधा - RAILWAY BOARD ON LOCO PILOTS

रेल्वेतील लोको पायलटसाठी आता आनंदाची बातमी आहे. रेल्वेकडून लोको पायलटसाठी आता वातानुलकूलीत रुम्स आणि एसी केबिन सुविधा पुरवण्यात आली आहे.

Railway Board On Loco Pilots
संग्रहित छायाचित्र (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 21, 2025 at 2:23 PM IST

2 Min Read

मुंबई : रेल्वे प्रवास सुरळीत आणि सुरक्षित ठेवण्यासाठी रात्रंदिवस सेवा देणाऱ्या लोको पायलटसाठी रेल्वेनं आता सोयी-सुविधांचा दर्जा मोठ्या प्रमाणात उंचावला आहे. सध्या देशभरात लोको पायलटसाठी असलेल्या सर्व 558 रनिंग रूम्स वातानुकूलित करण्यात आल्याची माहिती भारतीय रेल्वेनं दिली असून, 7 हजार 75 लोकोमोटिव्ह केबिनमध्ये एसी बसवण्यात आल्याचं रेल्वेनं स्पष्ट केलं आहे.

लोको पायलट पायलटला सुविधा : आपल्या देशात दररोज लाखो लोक रेल्वेनं प्रवास करतात. रेल्वेचा प्रवास हा सुरक्षित व जलद प्रवास मानला जातो. लोको पायलट हे भल्या मोठ्या लांबलचक रेल्वेचं सारथ्य करत असतात. एका रेल्वे गाडीतून हजारो प्रवासी प्रवास करत असतात. या प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी याच लोको पायलटवर असते. त्यामुळे लोको पायलट हा भारतीय रेल्वे व्यवस्थेतील एक अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जातो. लोको पायलट ऊन, वारा, पाऊस काहीही असो हवामान अनुकूल असो वा प्रतिकूल कोणत्याही हवामानात हेच रेल्वेचे सारथी काम करत असतात.

मालवाहतुकीच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी : प्रवासी वाहतुकीसोबतच रेल्वे माल वाहतुकीची सेवा देते. त्यामुळे हजारो प्रवाशांसोबतच मालवाहतुकीच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी देखील लोको पायलटवर असते. मात्र, लोको पायलटला कामाच्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नसतात. लोको पायलटच्या समस्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनानं सुविधा सुधारण्यावर भर दिल्याचं रेल्वे बोर्डानं म्हटलं आहे.

आधुनिक इंजिन्समध्ये आता शौचालयांची सोय : रेल्वे प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार, आधुनिक इंजिन्समध्ये आता शौचालयांची सोयही करण्यात आली आहे. सध्या 1 हजार 170 इंजिन्समध्ये ही सुविधा उपलब्ध असून, जुन्या रेल्वे इंजिनमध्ये देखील हळूहळू या सुविधेसह अद्ययावत केलं जात असल्याचं रेल्वे विभागानं म्हटलं आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी 21 हजार धुके सुरक्षा उपकरणांची म्हणजेच फॉग सेफ्टी डिव्हाइस बसवण्यात आल्याचं देखील रेल्वेनं म्हटले आहे.

लोको पायलटना आधुनिक सिम्युलेटर आधारित प्रशिक्षण : लोको पायलटना आधुनिक सिम्युलेटर आधारित प्रशिक्षण देखील दिलं जात आहे. विजिलेंस कंट्रोल डिव्हाइसचा वापर करून पायलटच्या कार्यक्षमतेवर लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती रेल्वे विभागानं दिली आहे. कोरोनानंतर रेल्वेनं भरती प्रक्रियेला गती दिली असून, आतापर्यंत 51 हजार 856 सहाय्यक लोको पायलट आणि लोको पायलट मिळून एकूण 1 लाख 30 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आल्याचं रेल्वे विभागानं म्हटलं आहे. सोबतच लोको पायलटवर असणारा मानसिक व शारीरिक ताण कमी करण्यासाठी रेल्वेनं कामाचं नियोजनही सुधारलं आहे. सध्या प्रत्येक पायलटला दर 14 दिवसांत केवळ 52 तासांची ड्युटी दिली जात असल्याचं रेल्वे बोर्डानं म्हटलं आहे.

हेही वाचा :

  1. मुंबईसाठी वेगळं 'कवच', रेल्वेच्या फेऱ्या वाढविण्याबाबत रेल्वेमंत्र्यांची त्रिसूत्री!
  2. पुणे-मुंबई-पुणे रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! वेळ वाचणार
  3. लोकोपायलट आणि मोटरमनसाठी दिलासा; एसी कॅबिनमुळे थकवा होणार दूर, 'इतक्या' रेल्वेचे कॅबिन झाले गारेगार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.