ETV Bharat / state

महामुंबईत रेल्वे-बससाठी एकच तिकीट ते किल्ल्यांसाठी विशेष रेल्वे, जाणून घ्या, रेल्वेमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांनी कोणत्या केल्या घोषणा? - RAIL PROJECTS IN MAHARASHTRA

राज्यात विविध रेल्वे प्रकल्प सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

rail projects in Maharashtra
महाराष्ट्र रेल्वे प्रकल्प (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 11, 2025 at 6:55 PM IST

2 Min Read

मुंबई – केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज संयुक्त पत्रकार परिषद घेऊन राज्यात सुरू असलेल्या आणि नव्याने मंजूर झालेल्या रेल्वे प्रकल्पांची सविस्तर माहिती दिली. महाराष्ट्रासाठी यंदाचं रेल्वे बजेट हे ( rail projects in Maharashtra) ऐतिहासिक ठरल्याचं त्यांनी मत व्यक्त केलं. मुंबईसह राज्याच्या ग्रामीण, विदर्भ, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील रेल्वे विकासाच्या योजनांचा यामध्ये समावेश असून, यामुळे राज्याच्या आर्थिक व सामाजिक विकासाला गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं, महाराष्ट्रासाठी यावर्षी 23 हजार 700 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही आकडेवारी मागील वर्षांच्या तुलनेत 20 पट अधिक आहे. हे बजेट केवळ आकड्यांपुरते मर्यादित नाही. हे बजेट महाराष्ट्राच्या सर्वांगीण प्रगतीसाठी निर्णायक ठरेल, असा विश्वास रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला. या प्रकल्पात गोंदिया-बल्लारशाह दरम्यान 240 किमी लांबीचा आणि 4 हजार 819 कोटी रुपयांचा प्रकल्प, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कुर्ला सहावी मार्गिका, पुणे जवळ उरळी मेगा टर्मिनस, आणि वसई रेल्वे हब या प्रमुख कामांचा समावेश आहे. मुंबईसाठी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून 17 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे.

रेल्वेची फ्रिक्वेन्सी वाढवण्याचा विचार-मुंबईतील रेल्वेची फ्रिक्वेन्सी वाढवण्याचा रेल्वे मंत्रालयाचा विचार असल्याचंदेखील केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी सांगितलं. उपनगरीय वाहतुकीत रेल्वे फेऱ्या वाढवण्यासाठी उपाययोजनादेखील केल्या जात असल्याची माहिती रेल्वेमंत्री यांनी दिली. मुंबईत दररोज सुमारे 80 लाख प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. यामुळे वाहतूक सुरक्षित आणि वेळेवर होण्यासाठी विशेष उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये ‘कवच व्हर्जन 5’, नवीन ‘बेटर ट्रेन’ डिझाइन आणि दरवाजे स्वयंचलित बंद होणाऱ्या गाड्यांचे उत्पादन या तंत्रज्ञानाचा समावेश आहे. यामुळे मुंबईकरांच्या प्रवासातील अनुभव लक्षणीयपणं सुधारेल, असे वैष्णव यांनी सांगितलं.

पॉईंट मशीनची डिझाईनचं पेटंट-मुंबईतील पावसाळ्यातील वारंवार होणाऱ्या वाहतूक खोळंब्यांचा विचार करून रेल्वे मंत्रालयानं विशेष उपाययोजना केल्या आहेत. यामध्ये पॉईंट मशीन बदल, मायक्रो ड्रेनेज प्रणाली आणि दीड फूट पाण्यातही गाड्या चालतील, अशी यंत्रणा तयार करण्यात येत असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. विशेष म्हणजे या पॉईंट मशीनची डिझाईन आणि त्याचे अपडेट व्हर्जन मुंबईमधील रेल्वेच्या अभियंत्यांनी तयार केले आहे. त्याचे पेटंटदेखील घेतलं जाणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णवी यांनी दिली.

पर्यटनासाठी विशेष रेल्वे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज सर्किट टूर योजनेची घोषणा केली. रेल्वे मंत्रालय आणि पर्यटन विभाग एकत्र येऊन 10 दिवसांची विशेष ऐतिहासिक दौरा योजना राबवणार आहेत. एक विशेष रेल्वे मुंबईतून सुटेल. ही रेल्वे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचं दर्शन पर्यटकांना घडवेल. यासाठी आराखडा तयार केल्या जात असल्याची माहितीदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

महामुंबईसाठी एकच तिकीट-एमएमआर रिजन म्हणजेच महामुंबई भागातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आनंदाची बातमी दिली आहे. तुम्ही ठाणे, कल्याण कोणत्याही भागातून रेल्वेने प्रवास करा. ठाणे महानगरपालिकेच्या बसने प्रवास करा अथवा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या बसनं प्रवास करा. अथवा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या बसनं म्हणजेच बेस्टने प्रवास करा किंवा मेट्रोने प्रवास करा. तुम्हाला सर्वांसाठी एकच तिकीट आता काढता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांचा तिकीट काढण्यासाठी लागणारा वेळ वाचणार आहे. यासाठी मुंबई वन कार्ड तयार करण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस यांनी ‘मुंबई 1’ कार्ड लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचं सांगितलं. या एकाच कार्डवर बस, लोकल, मेट्रो यांचा प्रवास करता येणार आहे. पुढील एका महिन्यात याचा आराखडा तयार होईल. यामुळे प्रवाशांना वेगवेगळे तिकीट काढणे आणि दाखविण्याच्या त्रासापासून सुटका होणार आहे.

हेही वाचा-

  1. देशातील पहिल्या हायड्रोजन ट्रेनची चाचणी सुरू, जगातील सर्वात मोठं हायड्रोजन इंजिन
  2. पीएम गतिशक्ती राष्ट्रीय बृहत आराखडाच्या अनुषंगाने कनेक्टिव्हिटी अन् लॉजिस्टिक सुधारणार ; एनपीजीच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.