पिंपरी चिंचवड : पतीनं पत्नीसोबत अघोरी कृत्य केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड शहरातून समोर आली आहे. पत्नीनं कोर्टामध्ये पोटगीचा दावा दाखल केल्यामुळं पतीनं घृणास्पद कृत्य केलं आहे. पतीनं विभक्त राहणाऱ्या पत्नीच्या गळ्याला कोयता लावत जबरदस्तीनं अत्याचार केला. त्यानंतर हळदी-कुंकू लावलेल्या लिंबाच्या चार फोडी पत्नीच्या गुप्तांगात पिळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हा प्रकार विशालनगर पिंपळे निलख इथं घडला आहे. याबाबत 36 वर्षीय पीडित महिलेनं सांगावी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पत्नीच्या गळ्यावर ठेवला कोयता : तक्रारदार महिला आणि आरोपी पती या दोघांचा 2004 मध्ये विवाह झाला होता. या दाम्पत्याला 2 मुलं आहेत. लग्नानंतर काही वर्षांतच आरोपी पती हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यामुळं त्यांच्यात वाद व्हायचे. सातत्यानं वाद होत असल्यामुळं २०२३ मध्ये पीडित महिला आपल्या दोन्ही मुलांना घेऊन बालेवाडी इथं राहण्यासाठी गेली. तर, आरोपी पती दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी गेला. परंतु, मुलांची वह्या, पुस्तकं पतीच्या घरी राहिल्यानं ते आणण्यासाठी पीडित महिला पतीच्या घरी गेली. मुलांच्या शाळेच्या साहित्यासाठी आली. काय सामान घेऊन जाते, असं म्हणत पतीनं पत्नीला शिवीगाळ केली. पतीनं मद्यप्राशन केल्यामुळं पत्नीनं त्याला प्रत्युत्तर दिलम नाही. मी बोलतो तरी माझ्याकडं बघत नाही, असं म्हणत पतीनं पत्नीच्या गळ्यावर कोयता ठेऊन तिच्यावर अत्याचार केला.
पत्नीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध : पत्नीच्या गळ्यावर कोयता ठेऊन आरोपी पतीनं पीडित पत्नीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. एवढ्यावर न थांबता पतीनं हळदी-कुंकू लावलेल्या लिंबाच्या चार फोडी आणल्या. त्यानंतर अघोरी कृत्य केलं. मी तुझ्यावर जादूटोणा केला आहे. तू आता वेडी होणार आहेस. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुझा मर्डर करतो" अशी धमकीही त्यानं दिली. हा भयंकर प्रकार घडल्यावर पीडित पत्नी कोणाला काही न बोलता आई आणि मुलांसह घरी गेली.
महिला अधिकाऱ्यांकडून तपास : घरी गेल्यानंतर पीडित पत्नीनं घडलेला प्रकार आपल्या आई आणि मामीला सांगितला. या प्रकारानंतर कुटुंब हादरून गेलं. घडललेला प्रकार कोणाला सांगावा हे कुटुंबीयांना कळत नव्हतं. त्यानंतर पीडित महिलेच्या कुटुंबानं परिचित असणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते दीपक कांबळे यांना घडलेल्या प्रकाराबाबत सांगितलं. कांबळे यांनी तातडीनं ही माहिती सांगवी पोलीस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितली. त्यानंतर पीडित महिलेची तक्रार नोंदवली. संबंधित पीडित महिलेनं सांगितल्याप्रमाणं तक्रार दाखल करून घेतली आहे. 7 वर्षांपेक्षा कमी शिक्षा असलेल्या गुन्ह्यात आरोपीला कायद्यानं अटक करता येत नाही. परंतु, आरोपीवर आवश्यक कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा महिला अधिकाऱ्यांकडून तपास केला जात आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांनी दिली.
हेही वाचा :