कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या पत्रकार प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर न्यायालयानं धक्का दिला. प्रशांत कोरटकर याच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवस वाढ करण्यात आली. त्यामुळे प्रशांत कोरटकर याला न्यायालयानं मोठा धक्का दिल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान प्रशांत कोरटकर याच्यावर न्यायालय परिसरात वकिलानं हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानं मोठी खळबळ उडाली.
प्रशांत कोरटकरला आणखी दोन दिवस पोलीस कोठडी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर न्यायालयानं तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली होती. आज त्याची पोलीस कोठडी संपल्यानंतर पोलिसांनी त्याला पुन्हा न्यायालयात हजर केलं. यावेळी पोलिसांनी पत्रकार प्रशांत कोरटकर याची सात दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली. मात्र न्यायालयानं प्रशांत कोरटकर याला दोन दिवसांची वाढीव पोलीस ठोठावली आहे. त्यामुळे प्रशांत कोरटकर याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
प्रशांत कोरटकर याच्यावर न्यायालयाबाहेर हल्ल्याचा प्रयत्न : प्रशांत कोरटकर याची आज पोलीस कोठडी संपणार असल्यानं पोलिसांनी प्रशांत कोरटकर याला न्यायालयात आणलं. यावेळी न्यायालयानं प्रशांत कोरटकर याला दोन दिवसांची वाढीव पोलीस कोठडी ठोठावली आहे. मात्र यावेळी प्रशांत कोरटकर याच्यावर वकिलानं हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी दक्ष असलेल्या पोलिसांनी तत्काळ वकिलाला ताब्यात घेतलं. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.
हेही वाचा :