ETV Bharat / state

कला म्हणजे देवानं दिलेलं वरदान! म्हापसेकरांचं 'मेरीगोल्ड' चित्र प्रदर्शन 31 तारखेपर्यंत पाहता येणार - PRADEEP MAPASEKAR MARIGOLD

काळाघोडा येथील आर्मी नेव्ही इमारतीच्या तळमजल्यावर हे प्रदर्शन 31 तारखेपर्यंत सकाळी 11 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुले राहणार आहे.

Mapasekar's 'Marigold' painting exhibition
म्हापसेकरांचं 'मेरीगोल्ड' चित्र प्रदर्शन (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 26, 2025 at 4:50 PM IST

Updated : March 26, 2025 at 9:48 PM IST

1 Min Read

मुंबई - वृत्तपत्रांच्या लेआउटमध्ये चित्रकार आणि व्यंगचित्रकार प्रदीप म्हापसेकर यांचा हातखंड आहे. संपूर्ण वृत्तपत्रसृष्टीत प्रदीप म्हापसेकर हे त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण लेआउटसाठी ओळखले जातात. साहित्य मूल्य ओळखणारा चित्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. दरम्यान, अंगात उपजत कलागुण असणाऱ्या प्रदीप म्हापसेकर यांच्या "मेरीगोल्ड" या चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी यांच्या हस्ते 25 मार्च रोजी पार पडलंय. काळाघोडा येथील आर्मी नेव्ही इमारतीच्या तळमजल्यावर हे प्रदर्शन 31 तारखेपर्यंत सकाळी 11 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सर्वांसाठी खुलं राहणार आहे.

म्हापसेकरांच्या बहुतेक चित्रांमध्ये दोन आकार : मिलिंद गवळी यांनी प्रदीप म्हापसेकर यांचे याप्रसंगी कौतुक केलंय. म्हापसेकरांच्या बहुतेक चित्रांमध्ये दोन आकार असतात, त्यांना प्रकृती किंवा जीवन घडविणार्‍या स्त्रोताचे प्रतीक म्हणता येईल. त्यांच्यासारख्या कलाकाराने आता आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घ्यावी, अशा शुभेच्छा मिलिंद गवळी यांनी दिल्यात. खरं तर इथे जमलेल्यांपैकी बरेच जण कलाकार आहेत आणि मला स्वतः ला कलाकार असल्याचा अभिमान आहे, असंही मिलिंद गवळी म्हणालेत. कलाकार मंडळी समाजामधलं संतुलन कायम राखत असतात. सध्याच्या काळात कलाकार मंडळींपुढे मोठी आव्हानं आहेत, याचासुद्धा त्यांनी उल्लेख केलाय. मान्यवरांना दिव्यांग मुलांनी तयार केलेली कागदी झेंडूची फुलं दिली गेली, या गोष्टीचे सुद्धा त्यांनी कौतुक केलंय.

Marigold painting exhibition
'मेरीगोल्ड' चित्र प्रदर्शन (Source- ETV Bharat)

"चौथी सीट" ह्या पुस्तकाचे लवकरच प्रकाशन : अष्टगंध प्रकाशनच्या संजय शिंदे यांनी प्रदीप म्हापसेकर हे चित्रकार अन् व्यंगचित्रकार आहेतच, शिवाय लेखक आणि कवीसुद्धा आहेत, त्यांच्या "चौथी सीट" ह्या पुस्तकाचे लवकरच प्रकाशन आपण करणार आहोत, असं त्यांनी जाहीर केलंय. सर्व मान्यवर मंडळींनी आपल्या भाषणातून प्रदीप म्हापसेकर यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी एक कार्यशाळा घेऊन आम्हालासुद्धा चित्र काढायला शिकवावं, असं मत प्रदर्शित केलंय.

प्रदर्शनातील चित्र विक्रीला ठेवण्यात आलीत : प्रदीप हे दिव्यांग मुलांसाठी अशा तर्‍हेची कार्यशाळा घेत असतात हे विशेष आहे. सदर प्रदर्शनातील चित्र विक्रीला ठेवण्यात आलेली आहेत, तर काही चित्र लिलावासाठी ठेवलीत. यातून मिळणारे पैसे हे "सेव्ह आर्ट" ह्या संस्थेला आणि काही सेवाभावी संस्थांना दिले जाणार असल्याचं भगवान या कार्यकर्त्यांनी जाहीर केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संदीपा यांनी नेटके यांनी केलं असून, सदर समारंभाला मिलिंद गवळी यांच्या पत्नीसुद्धा उपस्थित होत्या.

Mapasekar's 'Marigold' painting exhibition
म्हापसेकरांचं 'मेरीगोल्ड' चित्र प्रदर्शन (Source- ETV Bharat)

हेही वाचा :

  1. 'कुणाल कामरानं गाणं लिहिलं तर शिंदे गँगला मिरची लागली'; संजय राऊतांचा हल्लाबोल
  2. "हे कसलं मोदींचं हिंदुत्व? एकिकडं औरंगजेबाची कबर अन्...", हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून संजय राऊतांची पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका

Last Updated : March 26, 2025 at 9:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.