सिंधुदुर्ग : सध्या सिंधुदुर्ग पोलिसांची धावपळ वाढली असून, याचा परिणाम पोलिसांच्या आरोग्यावर होताना दिसत आहे. त्यातच दोडामार्ग तालुक्यातील दीपक गुड्डू सुतार या पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी निधन झालंय. ड्युटीवर जाण्यासाठी घरातून निघाले असता ड्युटीवर हजर होताच अचानक त्यांना त्रास जाणवू लागल्याने रुग्णालयात दाखल केलंय, परंतु त्यांचे निधन झालंय. या घटनेने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे.
अनेक पोलीस ठाण्यात आपली सेवा बजावली : दीपक सुतार हे 1993 मध्ये पोलीस दलात भरती झाले होते. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासह जिल्ह्यातील अनेक पोलीस ठाण्यात आपली सेवा बजावली होती, सध्या ते दोडामार्ग तालुक्यात होते. पोलिसांची असलेली धावपळ काहीसा अन् तणाव यामुळे काही पोलीस कर्मचाऱ्यांचे ड्युटीवर असतानाच हृदयविकाराने निधन झाल्याचे धक्कादायक प्रकार घडत आहे.
ड्युटीवर असतानाच हृदयविकाराचा तीव्र धक्का : खरं तर दीपक गुंडू सुतार याच्या बाबतीतही असाच प्रकार घडला असून, गुरुवारी ड्युटीवर असतानाच हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने त्यांचे निधन झालंय. या घटनेमुळे पोलीस दल सुन्न झाले असून, पोलिसांनी दीपक सुतार यांना अस्वस्थ वाटू लागल्यानंतर बरेच प्रयत्न केले, त्यांना तातडीने उपचारासाठी दोडामार्ग उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले, त्यानंतर तेथून म्हापसा गोवा येथील अजिलो हाॅस्पिटलमध्ये हलविण्यात आले. उपचारासाठी सगळे प्रयत्न केले पण त्याचा उपयोग झाला नाही, त्यातच त्यांचे निधन झाले. या घटनेने सुतार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, सुतार हे पोलीस दलात चालक म्हणून कार्यरत होते. सुतार यांचा स्वभाव सर्वांशी मिळून मिसळून राहण्याचा होता, तसेच त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.
हेही वाचा :