ETV Bharat / state

पोलीस बंदोबस्तात प्रशांत कोरटकरला कोल्हापुरात आणलं, न्यायालयात हजर करणार - PRASHANT KORATKAR

छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक करण्यात आली आहे. त्याला आज न्यायालयात करण्यात येणार आहे.

Prashant Koratkar
प्रशांत कोरटकर (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 25, 2025 at 9:17 AM IST

Updated : March 25, 2025 at 9:29 AM IST

1 Min Read

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य केलेल्या आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिलेल्या प्रशांत कोरटकरला आज कोल्हापूर पोलिसांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात हजर केलं. यावेळी जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या आवारात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सकाळी अकराच्या सुमारास कोरटकरला न्यायालयात नेलं जाणार आहे.

कोरटकरला घेतलं ताब्यात : गेली महिनाभर पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला अखेर तेलंगणातील मंचरियालमधून कोल्हापूर पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतलं होतं. आज सकाळी त्याला जुना राजवाडा पोलिसात आणण्यात आलं. यावेळी कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीनं या ठिकाणी प्रचंड बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीवकुमार झाडे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर उपस्थित होते. महापुरुषांचा अवमान केल्याप्रकरणी आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याचा गुन्हा जुना राजवाडा पोलिसात कोरटकर विरोधात दाखल करण्यात आला आहे. अंतरिम जामीन मिळवण्यासाठी त्यांने अनेक प्रयत्न केले, मात्र जामीन नाकारल्यामुळं अटकेची टांगती तलवार कोरडकरवर होती. अखेर महिनाभर पोलिसांना गुणगारा देणाऱ्या कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी ताब्यात घेतलं.

प्रतिक्रिया देताना हर्षल सुर्वे (ETV Bharat Reporter)

कोल्हापुरात ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात : सकाळी 11 वाजता प्रशांत कोरटकरला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय, छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय आणि जुना राजवाडा पोलीस ठाण्याच्या परिसरात कोल्हापूर जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह जलद कृती दल, राज्य राखीव पोलीस दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

कोल्हापुरी पायतान दाखवण्याचा शिवसेनिकांचा इशारा : मराष्ट्रातील जनतेची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य केलेल्या कोरटकरला कोल्हापुरात आल्यानंतर त्याचं कोल्हापुरी चपलीने स्वागत करू, असा इशारा शिवसेना उबाठा गटाचे शहर समन्वय हर्षल सुर्वे यांनी दिला. गनिमी काव्याने कोरटकरला कोल्हापुरी पायतान दाखवणारच असा निश्चय कोल्हापुरातील शिवसैनिकांनी केलाय.

हेही वाचा -

  1. गुंगारा देणाऱ्या प्रशांत कोरटकरला तेलंगणातून अटक, इंद्रजीत सावंत यांनी सरकारकडं केली 'ही' मागणी
  2. भास्करराव पाटील यांचा पक्षप्रवेश, अजित पवार नांदेड दौऱ्यावर; प्रशांत कोरटकरविषयी काय म्हणाले?
  3. प्रशांत कोरटकर भारताबाहेर पळाल्याचा दावा, इंद्रजीत सावंतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "चिल्लर माणूस..."

Last Updated : March 25, 2025 at 9:29 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.