कोल्हापूर Kolhapur Vande Bharat Express : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याहस्ते आज एकाच वेळी देशातील अनेक रेल्वे मार्गांना जोडणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ करण्यात आला. कोल्हापुरातील छत्रपती शाहू महाराज टर्मिनस येथून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही सोमन्ना यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हापूर-पुणे मार्गावर 'पहिली वंदे भारत एक्सप्रेस' 4 वाजून 25 मिनिटांनी रवाना झाली. करवीरवासीयांनी बहुचर्चित वंदे-भारत एक्सप्रेसचं ठीक-ठिकाणी फुलांचा वर्षाव करून स्वागत केलं.
वंदे भारत तिकीटदर कमी करचा प्रयत्न करणार : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्र्यांनी कोल्हापूर-पुणे वंदे भारतचा दर कमी करण्यासंदर्भात आणि कोल्हापूर-मिरज दुहेरीकरणाचं काम सुरू करण्याबाबत प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं. कोल्हापूर रेल्वे ट्रॅकवरून सुसाट धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला पाहण्यासाठी करवीरवासीयांनी रेल्वे मार्गाजवळ मोठी गर्दी केली होती. तर ठीक-ठिकाणी वंदे भारत एक्सप्रेसवर फुलांचा वर्षाव करून या रेल्वेचं स्वागत करण्यात आलं. यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, मध्य रेल्वेचे विशेष प्रबंधक प्रभात रंजन, पुणे विभागाचे अधिकारी रामदास भिसे, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेशकुमार सिंह, विभागीय रेल्वे व्यवस्थापक विकास कुमार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कोल्हापूर-मुंबई वंदे भारतसाठी पाठपुरावा सुरू : कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस पेक्षा कोल्हापुरातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक असल्यानं, या मार्गावर वंदे भारत सुरू व्हावी अशी कोल्हापूरकरांची मागणी होती. मात्र, तत्पूर्वी कोल्हापूर ते पुणे मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस आज धावली. कोल्हापूर ते मुंबई मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसचा प्रस्ताव केंद्रीय रेल्वे मंत्रालयाला देण्यात आला आहे. त्याचा पाठपुरावा सुरू असून लवकरच या मार्गावर वंदे भारत एक्सप्रेस धावेल असा विश्वास, खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केला.
हेही वाचा -
- वंदेभारत स्लीपर ट्रेनमध्ये आंघोळीची सोय, प्रवाशांचा हॉटेलमध्ये होणारा खर्च वाचणार - Vande Bharat sleeper train
- कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्सप्रेस 'या' दिवशी धावणार, कोल्हापूरकरांची प्रतीक्षा संपली; चाचणी पूर्ण - Kolhapur Vande Bharat Express
- मुंबई ते दिल्ली मार्गावर धावणार देशातील पहिली 'वंदे भारत स्लीपर एक्सप्रेस'; ऑगस्ट महिन्यात होणार चाचणी - Vande Bharat Sleeper Express