पिंपरी चिंचवड (पुणे) : पिंपरी चिंचवड शहरात सोमवारी रात्री एका अल्पवयीन मुलीची धारदार शस्त्रानं वार करून हत्याची केल्याची घटना घडली आहे. परप्रांतीय मामा-भाच्यांनी आर्थिक वादातून अल्पवयीन मुलीची हत्या केल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी परप्रांतीय आरोपींना २४ तासाच्या आत ताब्यात घेतलं आहे.
आर्थिक व्यवहारातून अल्पवयीन मुलीची हत्या : उदयभान यादव आणि त्याचा भाचा अभिषेक यादव अशी आरोपी मामा-भाच्यांची नावे आहेत. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी जलद गतीनं तपास करत दोन्ही आरोपींना काही तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणातील आरोपी उदयभान हा अल्पवयीन मुलीच्या परिसरात राहत होता. तसंच उदयभान आणि कोमल यांच्यात आर्थिक व्यवहार होते. आर्थिक व्यवहारातूनच उदयभाननं आपला भाचा अभिषेक याच्या सहाय्यानं सोमवारी रात्री अल्पवयीन मुलीवर धारदार शस्रानं वार करत हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपींचा लागला सुगावा : चिंचवड पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या एका रुममध्ये अल्पवयीन मुलगी भाड्यानं राहत होती. आरोपी उदयभान यादव तिच्या घरासमोरच राहत होता. त्यानंच तिच्यावर हल्ला केल्याच पोलीस तपासात समोर आलं आहे. दोन अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवरून येत मुलीच्या गळ्यावर, पाठीवर आणि हातावर धारदार शस्रानं वार केले. या हल्ल्यात मुलगी गंभीर जखमी झाली. यानंतर मुलीला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं असता तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केलं.
आरोपी सीसीटीव्हीमध्ये कैद- मुलीवर हल्ला करून दोन्ही आरोपी दुचाकीवरून पळून जातानाचं दृश्य सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झालं आहे. या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपींची माहिती घेतली. यानंतर घटनेच्या २४ तासांच्या आत पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणातील परप्रांतीय आरोपी हे मुळचे उत्तर प्रदेश राज्यातील आंबेडकर जिल्ह्यातील सादिकापूर गावचे रहिवासी आहेत. ते सध्या चिंचवड इथं वास्तव्यास आहेत. त्यांच्यावर विविध कलमांनुसार दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास चिंचवड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश बांगर करत आहेत.
हेही वाचा :