ETV Bharat / state

मनोरुग्णालयात उजळली ‘मनांची दिवाळी’! रुग्णांनी साकारले कंदील, पणत्या अन् आशेच्या ज्योती

ठाण्यातील मनोरुग्णालयात रुग्णांनी दिवाळी 2025 साठी पणत्या, कंदील, तोरणं आणि सुगंधी अरोमा कँडल्स अशा विविध वस्तू बनवल्या आहेत

Thane mental hospital Diwali
रुग्णांनी कारले कंदील, पणत्या अन् आशेच्या ज्योती (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : October 12, 2025 at 4:51 PM IST

|

Updated : October 12, 2025 at 5:01 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

ठाणे : दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा, उत्साहाचा सण. ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात दरवर्षी उजळणारे दिवे केवळ मातीचे नसतात. ते असतात मनाने पुन्हा उजळलेल्या जीवनांचे. इथं रुग्णांच्या हातून तयार होणाऱ्या पणत्या, कंदील, तोरणं आणि सुगंधी अरोमा कँडल्स या फक्त वस्तू नाहीत. तर त्या असतात पुनर्वसनाच्या, स्वावलंबनाच्या आणि आत्मविश्वासाच्या ज्योती. मनोरुग्णांच्या जीवनात अंधार किती गडद असतो. हे फक्त त्यांच्या जवळच्या व्यक्तींनाच उमजतं. पण जेव्हा या रुग्णांच्या हातून सौंदर्य, सृजन आणि कलात्मकता उमटते, तेव्हा ती दिवाळी केवळ त्यांच्या आयुष्याची नाही व्यवसाय उपचार विभागात आकर्षक वस्तूंची निर्मिती झाली आहे. या उपचारपद्धतीचा मूळ उद्देश रुग्णांच्या मनातील सुप्त कौशल्य जागं करणं आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणणं हा आहे.

मनातील उजेडाचा, आनंदाचा आणि आत्मविश्वासाचा प्रतिबिंब : ऑक्टोबर महिना ‘जागतिक मानसिक आरोग्य महिना’ म्हणून साजरा केला जातोय. या दरम्यान आणि पुरुष व्यवसाय उपचार विभागात वैद्यकीय अधिक्षक डॉ. नेताजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांनी हजार पणत्या, पाचशे उटणे पाकिटे, अरोमा कँडल्स, तोरणं आणि सुंदर रांगोळ्या तयार केल्या आहेत. तर पुरुष विभागातील रुग्णांनी दीडशे आकाशकंदील, हजार वॅक्स पणत्या, दोनशे गेरू पाकिटे आणि पताका बनवल्या आहेत. या वस्तूंची रंगीबेरंगी झळाळी म्हणजे त्यांच्या मनातील उजेडाचा, आनंदाचा आणि आत्मविश्वासाचा प्रतिबिंब आहे.

प्रतिक्रिया देताना डॉ. नेताजी मुळीक (ETV Bharat Reporter)

मी काहीतरी करू शकतो : दिवाळीच्या काळात या सर्व वस्तू प्रदर्शनासाठी ठेवण्यात येतात. तसंच अनेक नागरिक वस्तूंची आवडीनं खरेदी करतात. यामुळं रुग्णांना आर्थिक सक्षमतेचा अनुभव येतो, आणि 'मी काहीतरी करू शकतो' या भावनेची कळी त्यांच्या मनात उमलते. यावर्षी रुग्णालयही रुग्णांनी बनवलेल्या आकाशकंदील, पताकां आणि तोरणांनी सजवलं जाणार आहे. यासाठी व्यवसाय उपचार तज्ज्ञ डॉ. हेमांगीनी देशपांडे, डॉ. सुधीर पुरी आणि डॉ. जानवी केरझरकर डॉ. आश्लेषा कोळी आदी अधिकारी आणि कर्मचाऱ्यानी अथक परिश्रम घेतले.

Thane mental hospital Diwali
मनोरुग्णांनी दिवाळीसाठी बनवल्या आकर्षक वस्तू (ETV Bharat Reporter)

रुग्णासोबत करतो मनाचं पुनर्वसन : रुग्णालयात डॉक्टर आणि थेरपिस्ट फक्त औषधं देत नाहीत. तर ते मनाचं पुनर्वसन करतात. उपचार विभागात रुग्णांना विविध थेरपीटिक ऍक्टिव्हिटीज दिल्या जातात. ज्यामुळं त्यांची एकाग्रता, सुसूत्रता, आकलन क्षमता वाढते आणि ते पुन्हा समाजात समरस होण्यासाठी तयार होतात.

हेही वाचा :

  1. जीएसटी नसलेल्या महिला बचत गटांच्या दिवाळी फराळाची लोकप्रियता शिखरावर, घरगुती चव स्वस्त दर आणि रोजगाराची संधी
  2. विद्यार्थ्यांनी तयार केले सुगंधी उटणे; कोंडीवते जिल्हा परिषद शाळेचा अभिनव उपक्रम, पाहा व्हिडिओ
  3. दिवाळी 2025 तारीख; जाणून घ्या पूजेची वेळ, पद्धत आणि नियम
Last Updated : October 12, 2025 at 5:01 PM IST