ठाणे -जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात डोंबिवलीतील पर्यटक अतुल मोने यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मुलीसमोरच दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या होत्या. दहशतवाद्यांच्या क्रोर्याचा अनुभव अतुल मोने यांची मुलगी ऋचा मोने यांनी माध्यमांशी बोलताना सांगितला.
बैसरन टेकड्यांवरील घनदाट जंगलानं वेढलेल्या मैदानात पर्यटक आनंद लुटत असताना अचानक दहशतवाद्यांनी पोलिसांच्या वेशात मंगळवारी दुपारी अंदाधूंद गोळीबार केला. या गोळीबारात माझे बाबा, काका आणि मामा असे तिघेजण गेले. हा गोळीबार करणाऱ्या दोन दहशदवाद्यांना पाहिले. त्यांनीच माझ्या बाबांना माझ्या समोरच गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात (अतुल मोने ) बाबा १० ते १५ मिनिटं असेच जमिनीवर पडून होते. इतक्यात तेथील स्थानिक नागरिकांनी आम्हाला आपला जीव वाचावा असे बोलून खाली पळायला सांगितले. दहशतवादी हल्ल्याची आपबिती सांगताना (pahalgam terror attack) ऋचा मोने या मुलीनं हुंदके देत अंगावर काटा आणणारा प्रसंग सांगितला.
डोळ्यादेखत तिघांचे मृत्यू- बाबा, काका आणि मामा यांना आपल्यासमोर दहशतवाद्यांकडून ठार मारले जात असताना त्यांची जागीच तडफड सुरू होती. ते आर्तपणे किंकाळ्या फोडत होते. त्यांच्याकडं हताशपणं पाहण्याव्यतिरिक्त काही करू शकत नाही, या विचारानं कुटुंबीयांची घालमेल झाली होती. अतुल मोने हे पश्चिम डोंबिवलीतील ठाकुरवाडी भागात राहतात. मोने हे पत्नी आणि मुलीसह पर्यटनासाठी पहलगाम येथे दुसऱ्यांदा गेले असल्याची माहिती त्यांची मुलगी ऋचा मोने हिने दिली.
पहिल्यांदाच फिरायला गेल्यानंतर अनुभव- मी पहिल्यादांच काश्मीरला गेले होते. काश्मीर फिरण्यासाठी गेल्यानंतर पहिल्याच दिवशी असा अचानक प्रसंग घडला. आम्हाला आता सरकारकडून न्यायाची अपेक्षा असल्याचं तिनं सांगितले. अतुल मोने हे मध्य रेल्वेच्या परळ येथील कार्यशाळेत विभागीय अभियंता म्हणून कार्यरत होते. अतुल मोने यांच्या सोबत डोंबिवलीत राहत असलेले हेमंत जोशी आणि संजय लेले हे देखील पहलगाम येथे फिरण्यासाठी गेले होते. त्यांचाही दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला.
तिघांचे मृतदेह सावरण्याची मुलांवर वेळ- हल्ला केल्यानंतर दहशतवादी संजय लेले यांना कुटुंबीयांपासून खेचून नेत होते. त्यावेळी कुटुंबीयांनी बचाव करत किंकाळ्या फोडल्या. जीव वाचविण्याकरिता कुटुंबीयांचा टाहो सुरू असताना दहशतवाद्यांनी आपल्या बाबांना संजय लेले यांच्या डोक्यात गोळ्या झाडल्या. आपले वडील, काका आणि मामा यांचे मृतदेह सावरण्याची वेळ माझ्यावर आल्याची आपबिती २० वर्षाच्या संजय लेले यांचा मुलगा हर्षल लेले यांनी दिली आहे.
हेही वाचा-