बीड- अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालंय. सध्या कांदा निर्यातीवर सरकारकडून कुठलंही बंधन नाही. तरीही कांद्याची निर्यात संथ गतीनं होत आहे. भारतातून सर्वात जास्त कांदा निर्यात होणाऱ्या बांगलादेशात सध्या स्थानिक कांद्याची विक्री सुरू असल्यानं तिथं भारतीय कांद्याची मागणी कमी झालीय. कांद्याला येणाऱ्या काळात चांगला भाव मिळेल, या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी आपला कांदा चाळीमध्ये साठवून ठेवला आहे. परंतु अवकाळी पावसामुळं चाळीतील कांदा भिजल्यानं शेतकरी अडचणीत सापडला आहे. त्यामुळे कांद्याच्या साठवणुकीवरही परिणाम झालाय. त्यामुळे शेतकऱ्यांना हा कांदा मिळेल त्या भावात विकावा लागणार आहे, परिणामी शेतकऱ्यांना अवकाळी पावसाचा आर्थिक फटका बसला असून, तोंडचा घास हिरावला आहे.
कमी बाजारभावामुळं शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला : बीड जिल्ह्यात कांद्याची लागवड झाली होती. या हंगामात शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन मिळालं होतं. त्यामुळं यंदाच्या हंगामात देखील कांद्याला चांगला भाव मिळेल, या आशेनं कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांद्याची लागवड केली होती. सध्या बहुतांश शेतकऱ्यांनी कांदा काढणी पूर्ण केली आहे. परंतु कमी बाजारभावामुळं शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला आहे. त्यातच अवकाळी पावसाचा फटका कांद्याला बसत असल्यानं शेतकरी अडचणीत सापडला आहे. केंद्र सरकारनं बफर स्टॉकसाठी नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत प्रत्येकी दीड लाख टन म्हणजे एकूण तीन लाख टन कांदा खरेदीचं उद्दिष्ट ठेवलं आहे, मात्र, ही खरेदी अद्याप सुरू न झाल्यानं शेतकरी चिंतेत आहे.
अवकाळी पावसाने काही कांदा शेतातच सडला : बीडच्या शेतकरीही अवकाळी पावसानं हवालदिल झालाय. मी साडेतीन एकर कांद्याची लागवड केली होती. जवळपास रोपं, बी-बियाणे, खतं, फवारणी आदी 2 लाख रुपयांच्या वर खर्च झाला आहे. अवकाळी पावसाने काही कांदा शेतातच सडला तर काही काढून झाकून ठेवला होता, परंतु अवकाळी पावसामुळे कांदा पाण्याखाली गेला आणि तो काळपट पडला आहे, तर काही कांद्याला कोंब फुटले आहेत. सध्या चांगल्या कांद्याला 15 रुपये किलोपर्यंत भाव आहे. आधीच कांद्याला भाव नाही आणि आता दुष्काळात तेरावा महिना म्हणल्याप्रमाणे अवकाळी पाऊस झालाय. आम्ही जगायचं कसं? असा सवाल शेतकरी कल्याण वाणी यांनी उपस्थित केलाय.
हेही वाचाः
अवकाळी पावसाचा कांद्याला फटका, नाफेडची कांदा खरेदी कधी शेतकऱ्यांचा सवाल
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कांद्याची निर्यात घटली; कांदा उत्पादक शेतकऱ्यांच मोठं नुकसान