ETV Bharat / state

नवाब मलिक यांच्या अपघातग्रस्त जावयाची प्रकृती चिंताजनक; ताब्यात घेण्यात कारचालकाला पोलिसांनी सोडलं - Sameer Khan Accident

Sameer Khan Accident : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांचा जावई समीर खान यांचा गणपती विसर्जनादिवशी अपघात झाल्यानंतर ते अजूनही बेशुद्ध आहेत. याप्रकरणी अबुल मोहम्मद याला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याला नोटीस देऊन पोलिसांनी सोडून दिलय.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 18, 2024, 9:04 PM IST

Sameer Khan Accident
नवाब मलिक (Source - ETV Bharat)

मुंबई Sameer Khan Accident : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांच्या कारचा भीषण अपघात झाला. कुर्ला कोहिनूर परिसरात थार कारच्या अपघातात जखमी झालेल्या समीर खान यांच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यांना 48 तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं आहे. अपघातादरम्यान समीर खान यांच्या पत्नी आणि नवाब मलिक यांची मुलगी निलोफर या देखील सोबत होत्या. त्यांना किरकोळ जखम झाली. या अपघाताप्रकरणी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात वाहन चालक अबुल मोहम्मद अन्सारी (वय 38) याच्या विरुद्ध गुन्हा करून अन्सारीला 35(1) (अ) प्रमाणं नोटीस देऊन पोलिसांनी सोडून दिलय.

नेमका कसा घडला अपघात? : समीर खान आणि त्यांची पत्नी निलोफर हे दोघं अनंत चतुर्दशी दिवशी सकाळी नियमित वैद्यकीय तपासणीसाठी कुर्ला पश्चिम कोहिनूर येथील क्रिटीकेअर रुग्णालयात गेले होते. तपासणी झाल्यानंतर दोघंही बाहेर आले होते. यानंतर समीर यांनी ड्रायवरला गाडी घेऊन येण्यास सांगितलं. यावेळी ड्रायव्हरकडून गाडी आणताना चुकून ब्रेक ऐवजी एक्सलेटरवर पाय पडला आणि गाडी जोरात येऊन समीर खान यांना धडकली.

समीर खान यांची प्रकृती चिंताजनक : अपघातात समीर खान गंभीरित्या जखमी झाले. त्यांच्या डोक्याला, खांद्याला आणि मणक्याला गंभीर दुखापत झाली असून दोन शस्त्रक्रिया पार पडल्या आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समीर खानचे चुलत सासरे कप्तान रशीद मलिक यांनी दिली. समीर खान यांची पत्नी निलोफर ही किरकोळ जखमी झाली.

या प्रकरणी विनोबा भावे नगर पोलीस ठाण्यात चालक अबुल मोहम्मद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 35 (1) (अ) प्रमाणे नोटीस देऊन सोडून देण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चालक अबुल मोहम्मद हा समीर खान यांच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून नोकरीला आहे.

हेही वाचा

  1. कवर्धा येथील राणी दहरा धबधब्याच्या पाण्यात बुडून नागपूरच्या इंजिनीअरचा मृत्यू - Nagpur Engineer Death
  2. पुणे हादरले! ऐन गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला पुण्यात गोळीबार; तीन संशयितांना अटक - Firing On Businessman
  3. शेतात मोटर सुरू करण्यासाठी गेलेला मूकबधीर मुलगा बंधाऱ्यात बुडाला, आईच्या डोळ्यादेखत घडली घटना - Youth Drowns In River

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.