ETV Bharat / state

मुलाच्या मृत्यूच्या धक्क्यानं वडिलांचा मृत्यू, दोघांच्या मृत्यूनं आईलाही हृदयविकाराचा झटका! - NANDED YOUNG FARMER SUICIDE

तरुण मुलानं केलेल्या आत्महत्येच्या धक्यानं वडिलांचा मृत्यू झाला. मुलगा आणि पतीच्या निधनामुळं आईलाही हृदयविकाराचा झटका आल्याचा प्रकार नसरत सावरगाव इथं घडला.

NANDED YOUNG FARMER SUICIDE
बेदरे पितापुत्र (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 13, 2025 at 8:55 PM IST

2 Min Read

नांदेड : मुलानं टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या केली. हा धक्का वडिलांना सहन झाला नाही. मुलानं आत्महत्या केल्याचं समजताच वडिलांना हृदयविकाराचा झटका आला. यात त्यांचा मृत्यू झाला. मुलगा आणि पतीच्या निधानामुळं पत्नीलाही ह्रदयविकाराचा धक्का बसला. त्यांच्यावर सध्या रुग्णालयता उपचार सुरू आहेत.

मुला पाठोपाठ वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ : मनाला चटका लावणारी घटना लोहा तालुक्यातील नसरत सावरगाव इथं घडली आहे. मुला पाठोपाठ वडिलांवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ सावरगाव इथल्या बेदरे कुटुंबियांवर आली आहे. या घटनेनं कुटुंबियांवर दुःखाच डोंगर कोसळला असून गावात शोककळा पसरली आहे. राहुल बेदरे (वय 27) आणि भीमराव बेदरे (वय 60) असं मृत बापलेकाचं नाव आहे.

आत्महत्येचं कारण अस्पष्ट : सावरगाव इथल्या भीमराव बेदरे यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. त्यांना चार एकर कोरडवाहू शेती आहे. राहूल हा एकुलता एक मुलगा होता. तो शेतीसह मिळेल ते काम करत वडिलांना हातभार लावत होता. सोमवारी त्यानं दिवसभर आपल्या मित्रांसोबत रोजदारीनं ट्रकमध्ये कापूस भरण्याचं काम केलं. त्यानंतर पेरणीसाठी खत आणि बी बियाणी आणतो म्हणून निघून गेला. मात्र, शेतात आत्महत्या करत त्यांनं जीवनयात्रा संपवली. त्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

मुलाच्या आत्महत्येचा वडिलांना धक्का : मुलानं आत्महत्या केल्याचा मोठा धक्का वडील भीमराव बेदरे यांना बसला होता. मंगळवारी राहुलवर अंत्यसंस्कार करून घरी परताना भीमराव बेदरे यांना हृदयविकाराचा झटका आला. यानंतर भीमराव बेदरे यांच्यावर त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून डिसार्ज मिळाला होता. मात्र घरी आल्यानंतर गुरूवारी पहाटे 4च्या सुमारास त्यांना पुन्हा हृदयविकाराचा झटका आला. यात त्यांची प्राणज्योत मालवली. मुलगा आणि पती यांच्या निधनाचा विरह पत्नीलाही असाह्य झाला. त्यांना ही हृदयविकाराचा झटका आला. ही माहिती समजताच नातेवाईकांनी त्यांना तात्काळ खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

पतीचं अंतिम दर्शन ही घेता आलं नाही : मुला पाठोपाठ पतीचे निधन झाल्यामुळं पत्नी शोभाबाई अस्वस्थ झाल्या. त्यांनाही हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांच्यावर खाजगी रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आलं. त्यामुळं त्यांना पतीच्या अंतिम दर्शनाला येता आलं नाही. भीमराव यांनी शेतीवर दोन्ही मुलींचं लग्न केलं. एकाच कुटुंबातील दोघांच्या निधनामुळं गावावर शोककळा पसरली आहे.

हेही वाचा :

  1. अहमदाबाद विमान अपघात : पुन्हा फोन करेन; आई-बाबांशी झालं मैथिलीचं शेवटचं बोलणं, पण ती वेळ आलीच नाही . . .
  2. कोल्हापुरातल्या जबरी चोरीचा पोलिसांनी अवघ्या काही तासांत लावला छडा, 50 लाखांच्या मुद्देमालांसह दोन चोरट्यांना बेड्या
  3. रेडा अन् पोतराज यांना घेऊन प्रहार कार्यकर्त्यांचं अनोखं आंदोलन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.