नागपूर- नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयच्या फिजिओथेरपी विभागात कार्यरत असिस्टंट प्रोफेसर डॉ. अर्चना राहुले यांच्या हत्या प्रकरणाचा उलगडला झाला. त्यांचे पती डॉ. अनिल शिवशंकर राहुले आणि दीर राजू राहुले यांनी हत्या केल्याचं तपासात उघड झालं आहे. हुडकेश्वर पोलिसांनी मुख्य आरोपी अनिल राहुले आणि राजू राहुले यांना अटक केलेली (Nagpur crime news) आहे.
डॉ. अनिल राहुले हा इन्स्टीट्यूट ऑफ मेडिकल कॉलेज रायपूर छत्तीसगड राज्य येथे असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. त्यानं डॉ. अर्चना यांच्या चारित्र्यावर संशय घेत हत्या केल्याची बाब तपासात पुढे आली असल्याची माहिती डीसीपी झोन ४ च्या उपायुक्त रश्मीता राव यांनी दिलेली आहे. हत्येची घटना ९ एप्रिल हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीच्या लाडीकर ले-आऊट येथील डॉ. अर्चना राहुले यांच्या घरी घडली होती. मात्र, घटनेच्या तीन दिवसांनंतर म्हणजे १२ एप्रिलला डॉ. अर्चना यांची हत्या झाल्याचं पुढे आलं होतं.
24 वर्षांपासून डॉ. अर्चना राहुले कार्यरत होत्या. त्या मेहनती होत्या. त्यांचा घरात मृतदेह आढळून आला. सहा तासाच्या चौकशीनंतर आरोपी हा पतीच असल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. दोन्ही भावांनी मिळून हत्या केली. संशयातून आरोपीनं वेगवेगळ्या राज्यांमध्ये काम केलं आहे. आरोपी सातत्यानं संशय व्यक्त होता. त्यानुसार डॉक्टर महिला स्वत:ला अॅडजस्ट करत होत्या. आरोपीनं पत्नीवर लक्ष ठेवण्यासाठी घराबाहेर सीसीटीव्ही लावले होते. घरात कोणालाही येण्यास परवानगी नव्हती- पोलीस उपायुक्त ,रश्मीता राव
आरोपींनी असा रचला होता प्लॅन- डॉ. अर्चना राहुले यांच्या पतीनं त्यांना ९ एप्रिलला मोबाईलद्वारे संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र,अर्चना यांनी पती अनिलचा कॉल रिसिव्ह केला नाही. त्यानंतर त्यांनी १० आणि ११ एप्रिललादेखील पत्नी अर्चना यांना संपर्क साधला. मात्र, डॉ. अर्चना कोणताही प्रतिसाद देत नसल्यामुळे डॉ.अनिल राहुले यांनी रायपुरवरून थेट नागपूर गाठले. घराचं दार उघडून आत प्रवेश केला. त्यावेळी अर्चना या मृतावस्थेत आढळून आल्यात अशी माहिती आरोपीनं पोलिसांना दिली होती. मात्र, नागपूर हुडकेश्वर पोलिसांनी प्रकरणाचा तांत्रिक तपास करून अवघ्या काही तासात आरोपीचं बिंग फोडलं.
३ दिवसांनंतर कळाले डॉ. अर्चना यांची हत्या झाली- ९ एप्रिल रोजी आरोपी अनिल राहुले आणि राजू राहुले यांनी डॉ. अर्चना यांची हत्या केल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. मुख्य आरोपी अनिल राहुले हा रायपूरला निघून गेला. तर दुसरा आरोपी राजू हा भंडारा जिल्ह्यात गेला. ठरल्याप्रमाणं आरोपी डॉ. अनिल राहुले हे नागपूरला परतले. त्यांनी अर्चना कॉल घेत नसल्यानं घरी आल्याचा कांगावा केला होता. मात्र, पोलिसांनी केलेल्या योग्य तपासात आरोपीनं केलेले बनाव उघडकीस आला. त्यानंतर दोन्ही आरोपी थेट पोलीस कोठडीत पोहचले आहेत. डॉ. अर्चना राहुले यांना एक मुलगा आहे. हा मुलगा तेलंगणामधील करीमनगर येथे वैद्यकीय शिक्षण घेत असून तिसऱ्या वर्षाला आहे.
हेही वाचा-