अमरावती : जुगारात जिंकलेले 17 हजार लुटण्यासाठी मित्राचा खून केल्यानं मोठी खळबळ उडाली. ही धक्कादायक घटना परतवाडा इथल्या वन विभागाच्या परिसरात उघडकीस आली. विशेष म्हणजे तरुणाकडून 17 हजार घेतल्यानंतर या तरुणाचा मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आला. अरुण धाडसे असं खून करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. तर फैजान खान नूर खान आणि अय्यान खान रिजवान खान अशी मारेकऱ्यांची नावं आहे.
जुगारात जिंकलेल्या पैशासाठी मित्राचा खून : सागर, अय्यान, फैजान आणि अन्य सात ते आठ जण बहिरमजवळ निंभोरा इथं सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर जुगार खेळण्यासाठी 13 जूनला गेले होते. या ठिकाणी जुगार खेळताना सागर काही रक्कम जुगारात जिंकला. ही बाब फैजान आणि अय्यानला सुध्दा माहित होती. दरम्यान जुगार खेळून परतवाडा इथं परत येत असताना सागर हा अय्यान आणि फैजानच्या दुचाकीवरच बसून येत होता. दरम्यान मार्गातच लागणाऱ्या मुगलाईपुरा भागात हे दोघं सागरला घेवून गेले. यावेळी दुचाकीवर सागर मधात बसला होता. धावत्या दुचाकीवर अय्यान आणि फैजानपैकी एकानं दुपट्ट्यानं त्याचा गळा आवळला. त्यावेळी सागरनं त्यांचा प्रतिकार केला. म्हणून तिघंही दुचाकीवरुन खाली पडले. त्यानंतर अय्यान आणि फैजान यांनी सागरच्या डोक्यावर विट आणि दगडानं मारहाण केली. या मारहाणीत सागरचा घटनास्थळी मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्याचा मृतदेह या दोघांनी परतवाड्यातील वनविभागाच्या डेपोमागून वाहणाऱ्या एका नाल्यात फेकून दिला होता.
पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या : शनिवारी सांयकाळच्या सुमारास एक अनोळखी मृतदेह नाल्यात असल्याची माहिती परतवाडा पोलिसांना मिळाली. पोलीस घटनास्थळी गेले, मृतदेहाची पाहणी करुन ताब्यात घेतला. त्यावेळी मृतक तरुणाची ओळख पटली नव्हती. मात्र काही तासातच पोलिसांनी ओळख पटवून दोन्ही आरोपींना अटक केली.
हेही वाचा :