ETV Bharat / state

मध्य रेल्वेचा जीवघेणा प्रवास! डोंबाऱ्याचा खेळ की व्यवस्थेचं अपयश? - MUMBAI TRAIN ACCIDENT

मुंबई लोकल ही मुंबईकरांसाठी लाईफलाईन नाही तर डेथलाईन ठरत चालली आहे का? असा सवाल आता प्रवाशांकडून विचारला जात आहे.

mumbai train accident Central Railway route dangerous
मुंबई लोकल (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 9, 2025 at 8:55 PM IST

2 Min Read

ठाणे : मुंबईकरांसाठी रेल्वे ही जीवनवाहिनी असली तरी आज ती मृत्यूची सावली बनली आहे. विशेषतः मध्य रेल्वेच्या कल्याण - कसारा- कर्जत मार्गांवर प्रवास करणं म्हणजे रोज जीवाशी खेळ करण्यासारखं झालं आहे. आपल्या पोटापाण्यासाठी लाखो चाकरमानी दररोज जीव मुठीत धरून हा प्रवास करत आहेत. ही केवळ सोय नसून, एक अगतिकता बनली आहे.

प्रवास करताना अनेक अडचणी : उपनगरातील शहरांची वाढती लोकसंख्या, अपुरी वाहतूक व्यवस्था आणि रेल्वेच्या प्रशासनाचा खेदजनक गलथानपणा यामुळे डब्यात प्रवासी अक्षरशः कोंबड्यांसारखे कोंबले जातात. उभं राहायलाही जागा नाही, श्वास घ्यायलाही कसरत करावी लागते. अशा परिस्थितीत जर दोन लोकल एकत्र आल्या, तर प्रवाशांच्या पिशव्या खेचल्या जातात, माणसं गाडीतून खाली फेकली जातात आणि अनेकदा त्यात मृत्यू ओढवतो.

दिवा - मुंब्रा दुर्घटना : सोमवारी मुंब्रा स्थानकाजवळ अशीच एक दुर्दैवी घटना घडली. दोन लोकल समोरासमोरून जात असताना धक्क्याने प्रवाशांच्या पिशव्या घासल्या आणि दहा प्रवासी खाली फेकले गेले. त्यातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. पण रेल्वे प्रशासन मात्र यावर केवळ मौन बाळगून बसले आहे. ही निष्काळजीपणाची परिसीमा नाही का? असा सवाल या दुर्घटनेनंतर प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

मध्य रेल्वे - अपघातांचा मृत्यूमार्ग? : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कसारा, कर्जत, खोपोली, पनवेल या मार्गांवर दररोज हजारो लोकल फेऱया चालतात. या मार्गांवर सकाळी आणि संध्याकाळी एवढी गर्दी होते की प्रवास करणे म्हणजे एक तपस्या वाटते. विशेषतः ठाणे, बदलापूर आणि ठाणे, कसारा मार्गावरील प्रवास तर जीवघेणा बनला आहे.

कसे होतात रेल्वे अपघात? : रेल्वेचा अपघातांचा इतिहास पाहिला तर तो अत्यंत भयावह आहे. गेल्या 15 महिन्यांत केवळ ठाणे, डोंबिवली आणि कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच 663 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. रुळ ओलांडताना, गाडीतून पडून, या सगळ्यांतून ही जीवितहानी झाली आहे. आकडे फक्त आकडे नाहीत हे मृत्यू आहेत आणि ते सांगतात की प्रशासन निष्क्रिय आहे, संवेदनशून्य आहे.

प्रशासनाच्या योजनांचा फोलपणा : रेल्वेकडे योजनांची यादी आहे. पण, त्या केवळ कागदावर आहेत. प्रवासी संघटनांनी अनेकदा उपाय सुचवले. डबे वाढवा, फेऱया वाढवा, वेळा सुधारित करा, सेफ्टी दरवाजे लागू करा, प्लॅटफॉर्मवर मनुष्यबळ वाढवा. तिसरी - चौथी मार्गिकेचे काम जलद करा, पण प्रत्यक्षात बदल दिसत नाहीत. दरवाज्यांवर लटकत, अंगावर बॅगा घेऊन प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे जीव अक्षरशः धोक्यात आहेत.

घातक दुर्लक्षाची जबाबदारी : हे केवळ अपघात नाहीत तर ही प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घडणारी जीवितहानी आहे. रेल्वेचा प्रवास स्वस्त आहे, पण त्यामुळे तो असुरक्षित असावा का? यंत्रणा फक्त आकडे जपते, अपघात गाळते आणि नंतर शांत बसते. ही लज्जास्पद स्थिती बदलायलाच हवी. रेल्वे ही मुंबईच्या लाखो नागरिकांची गरज आहे. पण ही गरज असुरक्षिततेच्या खाईत लोटणं हे शासनाच्या, प्रशासनाच्या आणि जबाबदार यंत्रणांच्या मूळ कामगिरीवरच प्रश्नचिन्ह उभं करतं, अशा तिखट भावना लोकलने प्रवास करणाऱया प्रवाशांनी बोलून दाखवल्या.

हेही वाचा -

  1. बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांमुळे रेल्वे कोलमडली, मुंबईसाठी एक वेगळं महामंडळ हवं - राज ठाकरे
  2. मुंबईची जीवन वाहिनी रेल्वे ठरतेय मृत्यूचा सापळा, वीस वर्षात ५० हजारावर अपघाती मृत्यू
  3. मुंबईत तिन्ही रेल्वेमार्गांवर दररोज सरासरी 7 लोकांचा मृत्यू, जगात सर्वाधिक मृत्यूदर!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.