ETV Bharat / state

कफ सिरपची नशेसाठी आंतरराज्यीय तस्करी; एनसीबी मुंबईकडून 15 लाखांचा साठा जप्त, तिघे अटकेत - Cough Syrup Smuggling Case Mumbai

Cough Syrup Smuggling Case Mumbai : कफ सिरपचा वापर नशेसाठी होत असल्यानं त्याची तस्करी करणाऱ्या तीन आरोपींना मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं आज (21 जुलै) अटक केली. त्यांच्याकडून कफ सिरपच्या 3 हजार बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. बाजारात याची किंमत 15 लाख रुपये आहे.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 21, 2024, 9:17 PM IST

Cough Syrup Smuggling Case Mumbai
फाईल फोटो (File Photo)

मुंबई Cough Syrup Smuggling Case Mumbai : कोडिनद्वारे बनवण्यात आलेल्या आणि नशेसाठी वापर होत असलेल्या कफ सिरपच्या (सीबीसीएस) तस्करीमध्ये गुंतलेल्या तीन आरोपींना मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) अटक केली. ही तस्करी आंतरराज्यात चालवण्यात येणाऱ्या टोळीकडून करण्यात येत होती. एनसीबीला मिळालेल्या माहितीनुसार कारवाई करत आरोपींकडून कफ सिरपच्या ३ हजार बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्याचे वजन ३०० किलो असून त्याची बाजारातील किंमत १५ लाख रुपये आहे.

पाळत ठेवून छापामारी : या कफ सिरपचा नशा करण्यासाठी गैरवापर केला जातो. त्यामुळे अशा प्रकारे गैरवापर करणाऱ्यांवर पाळत ठेवून मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीने ही कारवाई केली. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर परिसरात हे कफ सिरप मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यावर त्या ठिकाणी पाळत ठेवून छापा मारून ही कारवाई करण्यात आली. एनसीबी आणि प्रशासनाच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी वेगवेगळ्या ट्रान्सपोर्टर्सच्या माध्यमातून दुसऱ्या नावाने हे कफ सिरप मागवले गेले; परंतु त्याची वाहतूक करताना त्याची ओळख लपवण्यात आली होती.

आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी : उत्तर प्रदेशच्या लखनऊमधून हे कफ सिरप उल्हासनगरात मागवण्यात आले. यामध्ये गुंतलेल्या एस.आर. अहमद, एम. अस्लम व वाय खान या तीन आरोपींना एनसीबीने अटक केली. या तिन्ही आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून या कफ सिरपच्या तस्करीमध्ये आणि अंमली पदार्थांच्या विक्रीमध्ये त्यांचा गेल्या काही काळापासून सहभाग असल्याची माहिती समोर आली आहे. लखनऊ मधून मागवण्यात आलेले हे सिरप ट्रान्सपोर्ट कंपनीतून घेत असताना एनसीबीने हे कफ सिरप जप्त केले आणि आरोपींना अटक केली. या प्रकरणात पुढील तपास सुरू असल्याची माहिती एनसीबी मुंबईचे अतिरिक्त संचालक अमित घावटे यांनी दिली आहे.

हेही वाचा:

  1. Merian Biotech cough syrup : मेरियन बायोटेकचे कफ सिरप मुलांना घातक, लहानग्यांना न देण्याचे डब्ल्यूएचओचा अहवाल
  2. Cough Syrup Seized : प्रतिबंधित अंमली पदार्थाच्या कफ सिरपच्या 4970 बाटल्या जप्त
  3. Syrup Medicine: कफ सिरपमुळे तब्बल 66 मुलांनी प्राण गमावला?, गांबिया देशात घडली घटना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.