मुंबई- देशाच्या आर्थिक राजधानी २८ वर्षीय महिला वैमानिकाचा प्रवासादरम्यान लैंगिक छळ झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी कॅबचा चालक आणि इतर दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
महिला वैमानिक गुरुवारी रात्री ११.१५ च्या सुमाराला दक्षिण मुंबईहून घाटकोपर येथील तिच्या घरी परतत असताना तिचा विनयभंग झाल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यानं दिली. पीडित महिलेचा पती संरक्षणदलात अधिकारी आहे. परंतु अधिकाऱ्याला सरकारी निवासस्थान मिळालेलं नाही.
काय पोलिसात दिली आहे तक्रार?गुरुवारी रात्री तिनं दक्षिण मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये जेवण केल्यानंतर तिच्या पतीने तिच्यासाठी उबर राईड बुक केली. त्यानंतर महिलेनं कॅबमधून घरी जाण्याला सुरुवात केली. मात्र, कॅब चालकानं २५ मिनिटानंतर मार्ग बदलला. त्यानंतर अचानक दोन पुरुषांना कॅबमध्ये बसण्याला परवानगी दिली. तेव्हा प्रवासात बसलेल्या शेजारी बसलेल्या एका व्यक्तीनं पीडित महिलेला अयोग्यरित्या स्पर्श केला, असे तिनं पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.
काय घडली नेमकी घटना?पुरुषानं चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केल्यानंतर पीडित महिला ओरडली. मात्र, पीडित महिलेला पुरुषानं धमकाविलं. मात्र, कॅब चालकानं कोणताही हस्तक्षेप केला नाही, असे पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे. काही अंतर कॅब गेल्यावर आरोपींना महामार्गावर पोलिसांची तपासणी सुरू असल्याचं दिसून आलं. त्यामुळे पोलिसांना घाबरून दोन्ही पुरुष प्रवासी कॅबमधून बाहेर पडले. ते पळून गेले, असे महिलेनं सांगितलं. कॅब चालकानं दोघांना कॅबमध्ये का बसू दिलं, याबाबत महिलेला आरोपीनं कोणतंही स्पष्टीकरण दिलं नाही.
- दुसऱ्या दिवशी सकाळी पीडितेला घटनेची माहिती पतीला दिली. त्यानंतर पती आणि पत्नी घाटकोपर पोलिसात तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार पोलिसांनी कॅब चालकासह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील चौकशी सुरू असल्याचं पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलं.
हेही वाचा