ETV Bharat / state

मुंबईतील बेस्टला इलेक्ट्रिक बसचा पुरवठा अपुराच; तीन वर्षांत अवघ्या 536 बस मिळाल्या - MUMBAI BEST

ऑगस्ट 2025 पर्यंत सर्व बस वितरित करण्याचे प्रस्तावित आहेत.ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीने त्यांच्या भागीदार, बीवायडीकडून बॅटरी-फिटेड चेसिसच्या पुरवठ्यातील व्यत्ययामुळे विलंब झाल्याचे कारण दिलंय, असंही बेस्टने म्हटलंय.

Mumbai BEST has insufficient supply of electric buses
मुंबईतील बेस्टला इलेक्ट्रिक बसचा पुरवठा अपुराच (Source- ETV Bharat)
author img

By PTI

Published : April 28, 2025 at 10:49 AM IST

3 Min Read

मुंबई- मे 2023 पर्यंत बेस्टला 2100 इलेक्ट्रिक बस पोहोचवण्याचे आदेश दिलेल्या कंत्राटदार कंपनीने करारावर स्वाक्षरी झाल्यापासून तीन वर्षांत अवघ्या 536 बस पुरवल्या आहेत, त्यामुळे मुंबई वाहतूक सेवा प्रदात्यांना कमी ताफ्याने अन् कमी सेवांसह काम करावे लागले. ऑगस्ट 2025 पर्यंत सर्व बस वितरित करण्याचे प्रस्तावित आहेत.ऑलेक्ट्रा ग्रीनटेक कंपनीने त्यांच्या तंत्रज्ञान भागीदार, बीवायडीकडून बॅटरी-फिटेड चेसिसच्या पुरवठ्यात झालेल्या व्यत्ययामुळे या विलंबाचे कारण दिले, असंही बेस्टने म्हटले आहे.

इलेक्ट्रिक बसच्या कमतरतेमुळे प्रतीक्षा वेळ वाढला : मुंबईच्या वाहतूक जाळ्याचं हृदय मानल्या जाणाऱ्या बेस्ट बस प्रवाशांसाठी शेवटच्या मैलापर्यंतची महत्त्वाची कनेक्टिव्हिटी पुरवतात. महानगर आणि त्याच्या विस्तारित उपनगरांमध्ये दररोज 30 लाखांहून अधिक प्रवासी बेस्ट बसवर अवलंबून असतात. इलेक्ट्रिक बसच्या कमतरतेमुळे प्रतीक्षा वेळ वाढला आहे अन् गर्दीसुद्धा वाढलीय. मे 2022 च्या करारानुसार, ओलेक्ट्रा ग्रीनटेकची उपकंपनी असलेल्या एव्हेट्रान्स प्रायव्हेट लिमिटेडने एका वर्षाच्या आत बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि वाहतूक उपक्रम बेस्टला 2100 ई-बस वेट लीज मॉडेल अंतर्गत पुरवायचे होते. "आतापर्यंत बेस्टसाठी 536 बसेस वितरित करण्यात आल्या आहेत," असे कंपनीच्या प्रवक्त्याने पीटीआयला सांगितले.

बेस्टच्या ताफ्यात सुमारे 2800 पर्यंत कमी बस : ऑलेक्ट्रा ग्रीनटेक मॉडेल अंतर्गत खासगी कंत्राटदार बसेस चालविण्यासाठी आणि त्यांची देखभाल सुनिश्चित करण्यासाठी चालक पुरवतात. विशेष म्हणजे डिलिव्हरीचे टप्पे पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यानंतरही ऑलेक्ट्रा ग्रीनटेकला एप्रिल 2024 मध्ये अतिरिक्त 2400 इलेक्ट्रिक बसेस पुरवण्यासाठी आणखी एक कंत्राट देण्यात आलंय. जुन्या बसेस निवृत्त झाल्यामुळे आणि ई-बस पुन्हा भरण्यास विलंब झाल्यामुळे रोख रकमेची कमतरता असलेल्या बेस्टला कमी होत चाललेल्या ताफ्यासह कामकाज चालवावं लागतंय, बेस्टच्या ताफ्यात बस दशकापूर्वी 4500 बसेसवरून सुमारे 2800 पर्यंत कमी झाल्यात.

बसची एकूण संख्या 530 पेक्षा जास्त : जुलै 2022 मध्ये 2100 ई-बस पुरवण्याचे कंत्राट मिळवल्यानंतर एव्हेट्रान्सने तीन महिन्यांत पहिली 12 मीटर लांबीची इलेक्ट्रिक बस दिलीय. डिलिव्हरी वाढत्या प्रमाणात अनियमित झाली. पीटीआयच्या चौकशीला उत्तर देताना म्हटलं आहे की, बेस्टने कंत्राटदाराला आतापर्यंत सर्व 2100 बसेस पुरवण्याची आवश्यकता असलेल्या कराराच्या अटींचा उल्लेख केलाय. करारानुसार, 25 टक्के बस सहा महिन्यांत, आणखी 25 टक्के बस नऊ महिन्यांत आणि उर्वरित 50 टक्के बसेस 12 महिन्यांत वितरित करायच्या होत्या, म्हणजे सर्व बसेस मे 2023 पर्यंत सुपूर्द करायच्या होत्या. मार्च 2025 पर्यंत एव्हेट्रान्सने 12 मीटर लांबीच्या 455 इलेक्ट्रिक बसेस पुरवल्या, ज्यामुळे एकूण संख्या 530 पेक्षा जास्त झाली, असे बेस्टने म्हटले आहे.

विलंबामुळे प्रत्येक न पोहोचलेल्या बससाठी 20 हजार रुपये दंड : बेस्टने कंपनीला विलंबाबद्दल 27 नोटिसा बजावल्या आहेत, त्यापैकी सर्वात अलीकडील 24 मार्च 2025 रोजी नोटीस पाठवण्यात आलीय. बेस्टच्या मते, विलंबामुळे प्रत्येक न पोहोचलेल्या बससाठी 20 हजार रुपये दंड आकारला जाणार आहे. करार रद्द झाला असला तरी बेस्टने सर्व 2100 बसेससाठी अनुदान आधीच मंजूर केले आहे. ऑलेक्ट्राने बीवायडीशी चर्चा सुरू केलीय आणि त्यांच्या ऑर्डर बुकची पूर्तता करण्यास वचनबद्ध आहे, असे कंपनीने एका निवेदनात म्हटलंय. आतापर्यंत बेस्टला 536 बसेस वितरित करण्यात आल्या आहेत," असे कंपनीच्या प्रवक्त्याने पीटीआयला उत्तर दिले.

बेस्टकडे 950 हून अधिक इलेक्ट्रिक बसेस : ऑलेक्ट्राने सांगितले की, त्यांनी बेस्टला 536 इलेक्ट्रिक बसेस यशस्वीरीत्या वितरित केल्यात, ज्या प्रति चार्ज 200 किमीपर्यंतचा प्रवास करीत असून, त्यांनी एक नवीन बेंचमार्क स्थापित केलाय, जो राष्ट्रीय सरासरीपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त असल्याचा दावा कंपनीनं केलाय. सध्या बेस्टकडे 950 हून अधिक इलेक्ट्रिक बसेस आहेत, ज्यामध्ये स्विच मोबिलिटीच्या 50 डबल-डेकर बसेस, टाटा मोटर्सच्या 340 बसेस, बेस्टच्या 20 बसेस आणि उर्वरित ऑलेक्ट्रा पुरवतात. तज्ज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय मानके प्रति लाख लोकसंख्येमागे 60 बसचा सल्ला देतात, परंतु मुंबई यात प्रचंड मागे आहे. जर आपण प्रति 2000 लोकसंख्येमागे एक बस (प्रति लाख 50 बसेस) विचारात घेतली तर बेस्टची सरासरी फक्त 0.4 बसेस आहे. "पुढील काही वर्षांत 100 टक्के विद्युतीकरणासह बेस्टच्या ताफ्यात 10000 बसेस (प्रति 2000 मध्ये 1.6 बसेस) असण्याचे बेस्टचे लक्ष्य आहे. "गेल्या पाच वर्षांत त्यांनी 5330 इलेक्ट्रिक बसेस ऑर्डर केल्या होत्या, परंतु आजपर्यंत फक्त 966 बसेस मिळाल्या आहेत," असे मॅकगिल विद्यापीठातील शहरी वाहतुकीवरील पीएचडी स्कॉलर सुवेध जयवंत म्हणालेत.

हेही वाचाः

एकनाथ शिंदेंचा संजय गायकवाडांना फोन अन् गायकवाडांकडून दिलगिरी व्यक्त; नेमकं घडतंय काय?

साताऱ्यात दुचाकी पिकअपची समोरासमोर धडक, दोन अल्पवयीन मित्र जागीच ठार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.