ETV Bharat / state

राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन - MPSC STUDENTS PROTEST

एमपीएससी राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या (राज्यसेवा) निकालातील गोंधळ आणि प्रक्रियेमधील पारदर्शकतेच्या अभावामुळे विद्यार्थी हे नाराज झाले असून, आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे.

MPSC students protest demanding postponement of State Services Mains Exam
राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन (Source- ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 16, 2025 at 12:59 PM IST

1 Min Read

पुणे- राज्यसेवा मुख्य परीक्षा 45 दिवस पुढे ढकलावी आणि कम्बाईन परीक्षेच्या पीएसआय, एसटीआय, एएसओ, एसआर या पदांमध्ये वाढ करण्यात यावी, या मागणीसाठी आज एमपीएससी विद्यार्थ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन सुरू करण्यात आलंंय. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय येथे एमपीएससी विद्यार्थ्यांकडून या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत असून, या आंदोलनाला मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या (राज्यसेवा) निकालातील गोंधळ आणि प्रक्रियेमधील पारदर्शकतेच्या अभावामुळे विद्यार्थी हे नाराज झाले असून, आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येत आहे.

‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गातील अनेक विद्यार्थी अपात्र : यावेळी आंदोलक विद्यार्थ्याने सांगितलं की, राज्यसेवा मुख्य परीक्षा 45 दिवस पुढे ढकलावी आणि कम्बाईन परीक्षेच्या पीएसआय, एसटीआय, एएसओ, एसआर या पदांमध्ये वाढ करण्यात यावी, या मागणीसाठी आमचं हे आंदोलन सुरू आहे. तसेच राज्यसेवा परीक्षा एक डिसेंबर 2024 रोजी झाली असून, 12 मार्च रोजी निकाल जाहीर झालाय. त्यात मराठा समाजासाठी ‘सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचे (एसईबीसी) आरक्षण लागू असतानाही काही मराठा विद्यार्थ्यांना ‘आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक’ (ईडब्ल्यूएस) यादीत समाविष्ट करण्यात आलंय. यामुळे मूळ ‘ईडब्ल्यूएस’ प्रवर्गातील अनेक विद्यार्थी अपात्र ठरलेत. परिणामी त्यांना मुख्य परीक्षेसाठी बसण्याची संधी मिळाली नाही. सरकारने आमच्या या मागण्या मान्य कराव्यात यासाठी आजपासून हे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात येत असल्याची माहिती यावेळी विद्यार्थ्यांनी दिली.

हेही वाचा :

  1. पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरण; ससूनमध्ये तज्ज्ञांच्या समितीची बैठक सुरू
  2. तनिषा भिसे मृत्यू प्रकरण; दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गुन्हा दाखल झाला पाहिजे - सुप्रिया सुळे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.