ETV Bharat / state

जय पवार यांच्या साखरपुड्याबाबत सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या "कुटुंबातील गोष्टी..." - MP SULE ON JAY PAWAR ENGAGEMENT

खासदार सुप्रिया सुळे यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त फुले वाड्यात महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केलं. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.

MP SULE on JAY PAWAR ENGAGEMENT
माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 11, 2025 at 2:08 PM IST

2 Min Read

पुणे - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धाकटा मुलगा जय पवार याचा ऋतुजा पाटील यांच्यासोबत साखरपुडा झाला. या साखरपुड्याला सर्व पवार कुटुंब एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या, "कुटुंबाच्या गोष्टी या कुटुंबातच राहिल्या पाहिजेत. कुटुंब आणि राजकारण यांच्यात गफलत करू नये. काल जय आणि ऋतुजा यांचा साखरपुडा पार पडला. आम्हाला मनापासून आनंद होत आहे की, आमच्या घरात आणखी एक लेक येत आहे. सर्वांनी एकत्र येत आल्यानंतर आनंदसोहळा पार पाडला."

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा विचारांचा वारसा पुढं नेण्यासाठी कटिबद्ध : आज महात्मा ज्योतिबा फुले यांची १९८ वी जयंती आहे. या निमित्तानं खासदार सुप्रिया सुळे यांनी महात्मा फुले वाड्यातील महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन केलं. "महाराष्ट्राची सामाजिक चळवळ आणि भारताला वेगळी दिशा देण्याचं काम महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केलं आहे. त्यांनी दिलेल्या विचाराचा वारसा पुढं नेण्याचं काम, तसंच त्या विचारांशी आम्ही कटिबद्ध आहे, अशी भावना खासदार सुप्रिया सुळेंनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

पुस्तकाच्या माध्यमातून फुलेंचे विचार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचणं गरजेचं : "मला या सिनेमाबाबत पुष्कळ माहिती नाही. पवार साहेब मुख्यमंत्री असताना महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित ज्या पुस्तकाच प्रकाशन झालं होत, ते पुस्तक आज पुन्हा काढण्यात आलंय. या पुस्तकाच्या माध्यमातून महात्मा फुले यांचा विचार सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचणं गरजेचं आहे," अस मत सुप्रिया सुळेंनी महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित असलेल्या 'फुले' चित्रपटाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केलं.

मी सरकारचे आभार मानते : "बाणेश्वर मंदिराच्या रस्त्याचा विषय राजकीय नाही. हा आमच्या श्रद्धेचा विषय आहे. सरकारनं सकारात्मक भूमिका घेतल्यानं मी सरकारचे आभार मानते." पुढे बोलताना त्या म्हणाल्या, "माझी सरकारला विनंती आहे की, गरीब, कष्टकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे. कष्ट करणाऱ्या लोकांना त्यांच्या हक्काच्या पगारासाठी आंदोलन करू देऊ नये," असं स्पष्ट मत त्यांनी एस.टी. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत व्यक्त केलं.

अतिथि देवो भव : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्याबाबत बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "एका सशक्त लोकशाहीत कोणालाही कुठंही जायचा अधिकार आहे. ते, जर महाराष्ट्रात येत असतील तर 'अतिथि देवो भव'. पाहुण्यांचा सत्कार करणं आपली संस्कृती आहे. "महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. मी गेल्या अनेक दिवसांपासून मागणी करत आहे की, राजकारण बाजूला ठेऊन राज्याच्या हिताच्यासाठी एकत्र येऊन काही तर केलं पाहिजे," अशी अपेक्षा त्यांनी बारामतीमध्ये झालेल्या आत्महत्येबाबत बोलताना व्यक्त केलं.

केंद्र सरकारला पत्र लिहणार : "महागाईसंदर्भात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. देशात महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार वाढत आहे. याबाबत मी केंद्र सरकारला पत्र लिहिणार आहे. ग्लोबल ऑईलच्या किंमती कमी झाल्या आहेत. यामुळं भारतात पेट्रोल, डिझेल तसंच गॅसच्या किंमती कमी व्हायला पाहिजेत," अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली.

हेही वाचा :

  1. पवार कुटुंब पुन्हा एकत्र; कोण आहे सुनबाई ऋतुजा पाटील?
  2. अमित शाह सुनील तटकरेंच्या घरी करणार 'लंच', अजित पवारांनी मारला 'पंच'; म्हणाले, "पालकमंत्री नसला तरी..."
  3. "मुलींची पहिली शाळा महात्मा फुले यांनी नव्हे तर..."; उदयनराजे भोसले यांनी फोडलं नव्या वादाला तोंड

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.