ETV Bharat / state

देवदर्शन बेतलं जीवावर: विश्वगंगा नदीत बुडून मायलेकींचा मृत्यू - MOTHER DAUGHTER DIED IN BULDHANA

देवदर्शनाला गेलेली महिला तिच्या चिमुकलीसह नदीत बुडाल्यानं मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पतीच्या समोरच पत्नी आणि चिमुकली नदीत बुडाली आहे.

MOTHER DAUGHTER DIED IN BULDHANA
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 15, 2025 at 8:46 PM IST

1 Min Read

बुलडाणा : देवदर्शनासाठी गेलेल्या मायलेकीचा विश्वगंगा नदीमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना 15 जून रोजी सकाळी मलकापूर तालुक्यातील निंबा देवी इथं उघडकीस आली. या घटनेनं खामगाव शहरातील सुटाळपुरा भागातील जामोदे परिवारावर काळानं घाला घातला आहे.

Mother Daughter Died In Buldhana
आई आणि चिमुकली (Reporter)

निंबा देवीच्या दर्शनाला गेलं होतं कुटुंब : स्थानिक सुटाळपुरा भागातील गढीजवळ राहणारे मयूर जामोदे हे त्यांची पत्नी पुनम मयूर जामोदे ( वय वर्ष 32 ) आणि चिमुकली आर्वी जामोदे ( वय वर्ष 5 ) यांच्यासह आज 15 जून रोजी सकाळी मलकापूर तालुक्यातील निंबा देवी संस्थान इथं देवीच्या दर्शनासाठी गेले होते. या ठिकाणी विश्वगंगा नदी पात्राजवळ पुनम जामोदे आणि चिमुकली आर्वी हे दोघं पाय धुण्यासाठी गेले होते. यावेळी पाण्यात खेळताना चिमुकली आर्वी हिचा पाय खोलात गेला आणि ती पाण्यात बुडाली. त्यामुळे मुलीला वाचवण्यासाठी आई पूनम हिने सुद्धा पाण्यात उडी घेतली. मात्र चिमुकलीला वाचवताना आई सुद्धा पाण्यामध्ये बुडून वाहून गेली. बघता बघता दोघी मायलेकी पाण्यामध्ये बुडाल्या.

पतीसमोर पत्नी आणि चिमुकली बुडाली नदीत : यावेळी जवळ उपस्थित असलेले मयूर जामोदे आणि नागरिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु दोघीही खोल पाण्यात बुडाले होते. काही वेळानं दोघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आले. घटनेची माहिती मिळताच मलकापूर येथील ग्रामीण पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तसेच शिवसेनेचे पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच बचावकार्य सुद्धा केले, परंतु त्यांना यश आलं नाही. या दुर्दैवी घटनेमुळे खामगाव शहरातील सुटाळपुरा भागांमध्ये नागरिकांकडून एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. मयूर जामोदे ( वय वर्ष,25 ) राधा जामोदे आणि संध्या सागर जामोदे यांच्यावर मलकापूर सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हेही वाचा :

  1. पुण्यात मावळमध्ये इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; दोघांचा मृत्यू, 32 जण जखमी
  2. राजस्थानच्या टोंकमध्ये मोठी दुर्घटना, बनास नदीत आंघोळीसाठी गेलेले १० जण बुडाले, ८ मुलांचा मृत्यू
  3. तापी नदीत पोहायला गेलेल्या शाळकरी मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू, बेपत्ता मुलाचा शोध सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.