ETV Bharat / state

राज-उद्धव एकत्र येण्यावर बाळा नांदगावकर यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले "राज ठाकरेंच्या..."

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याबाबत राज्यात चर्चा सुरू आहे. याबाबत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सोलापुरात भाष्य केलंय.

RAJ UDDHAV THACKERAY ALLIANCE
मनसे नेते बाळा नांदगावकर (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 20, 2025 at 8:38 PM IST

1 Min Read
Choose ETV Bharat

सोलापूर : ठाकरे बंधू एकत्र येणार का? असा प्रश्न राज्यातील अवघ्या जनतेला पडला आहे. "जे जनतेच्या मनात असेल तेच होईल" असं विधान उद्धव ठाकरे यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात केलं होतं. याबाबत आता मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सोलापुरात भाष्य केलंय.

मनसे कार्यकर्त्यांकडून बाळा नांदगावकर यांचं जल्लोषात स्वागत : मनसे नेते आणि राज्याचे माजी गृहराज्यमंत्री बाळा नांदगावकर हे शुक्रवारी सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. सोलापुरात मनसे नेते बाळा नांदगावकर यांचं कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केलं. माध्यमांशी बोलताना माजी गृहराज्य मंत्री नांदगावकर यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्र येण्याबाबत महत्वपूर्ण भाष्य केलं. यामुळं राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नवा ट्विस्ट आला आहे. खाजगी कामानिमित्त सोलापूरला आलो होतो असं बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केलं.

जे त्यांच्या मनात, तेच माझ्या मनात : "ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत राज ठाकरे यांच्या मनात जे आहे, तेच माझ्या मनात आहे. बाळासाहेब ठाकरे हयात असताना तो काळ होता. त्यावेळी उद्धव आणि राज यांना एकत्र करण्याचा प्रयत्न मी केला होता. एखादी गोष्ट झाली तर राजकारणामध्ये चांगलं-वाईट घडत असतं. पण पुढं काय होईल याची मला कल्पना नाही. राजकारणात वेळ नेहमीच येत असते. मात्र, कुठलीच वेळ कधी वाईट नसते. महाभारतात एक वाक्य आहे समय बडा बलवान होता है." बाळा नांदगावकर यांच्या या वक्तव्यामुळं अनेक तर्क वितर्क लावले जात आहे.

उद्धव ठाकरे यांनी दिले संकेत : सध्या राज ठाकरे, उद्धव ठाकरे एकत्र येणार का? यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगत आहे. बुधवारी माजी नगरसेवकांची बैठक झाली. त्या बैठकीत तुम्हाला काय वाटते? असं मनसेसोबतच्या युतीबाबत उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांना विचारलं होतं. त्याबाबत उद्धव ठाकरे म्हणाले, " आज जे शिवसैनिकांच्या आणि राज्याच्या मनात आहे, तेच होईल. मराठी माणसाच्या भल्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी आम्ही एक पाऊल पुढे येऊ शकतो," असे सकारात्मक संकेत उद्धव ठाकरे यांनी मनसेबरोबरच्या युतीबाबत दिले आहेत.

हेही वाचा :

  1. "महाराष्ट्रातून ठाकरे नावाचा ब्रँड तुम्ही संपू शकत नाही, मी छाताडावर बसून तुम्हाला गाडेल"-उद्धव ठाकरे
  2. मनसेसोबतच्या युतीला ठाकरेंच्या माजी नगरसेवकांकडून ग्रीन सिग्नल; बैठकीत काय झाली चर्चा?
  3. दोन शिवसेना दोन वर्धापन दिन! बाळासाहेबांची शिवसेना 59 वर्षांची झाली पण…; कसा आहे शिवसेनेचा इतिहास? वाचा सविस्तर...