ETV Bharat / state

खोके सरकारनं अर्थसंकल्पात दाखवलं गाजर : आदित्य ठाकरेंची महायुती सरकारवर टीका - Aaditya Thackeray On budget

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 12, 2024, 6:23 PM IST

Aaditya Thackeray On Mahayuti : अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. अर्थसंकल्पात महायुती सरकारनं गाजर दाखवल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

MLA Aaditya Thackeray
आदित्य ठाकरे तसंच महायुतीतील नेते (Etv Bharat MH Desk)

मुंबई Aaditya Thackeray On Mahayuti : आज विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा समारोप होत आहे. येत्या तीन महिन्यात विधानसभा निवडणुका होणार असल्यानं हे शेवटचं अधिवेशन आहे. त्यानंतर सध्याची विधानसभा विसर्जित करून नवी विधानसभा अस्तित्वात येईल. त्यामुळं पावसाळी अधिवेशनाच्या शेवटचा दिवशी आमदार आदित्य ठाकरे यांनी महायुतीवर टीका केली आहे.

आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद (Etv Bharat Reporter)

महायुती सरकारवर टीका : "आज पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. तसंच विधान परिषदेच्या 11 जागांसाठी मतदान पार पडलं आहे. या निवडणुकीचा निकाल रात्री उशिरा लागण्याची शक्यता आहे. ह्या घटनाबाह्य सरकारचं हे शेवटचं अधिवेशन असून, खोके सरकारनं अर्थसंकल्पात फक्त गाजर दाखवलं आहे. 'हे' गाजर बजेट होत", अशी टीका आमदार आदित्य ठाकरे यांनी केली.

महायुतीची पोकळ आश्वासनं : या सरकारनं अर्थसंकल्पातून मुंबई, ठाणेसह राज्यातील अन्य भागातील जनतेला काहीही दिलं नाही. फक्त पोकळ आश्वासनं दिली. मुंबईसह अनेक भागात झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प रखडले आहेत. तिथं कंत्राटदार नेमून सरकारनं प्रश्न सोडवावा. तसंच अनेक ठिकाणी बहुमजली झोपडपट्ट्या आहेत, त्यांचाही पात्रता यादीत समावेश करावा. हिंमत असेल तर आमच्या मागण्या मान्य कराव्यात, असं आव्हान आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला दिलं आहे.

विरोधकांना वेगळा न्याय का : विधानपरिषद निवडणुकीतील मतदानासाठी भाजपा आमदार गणपत गायकवाड आज विधानभवनात दाखल झाल्यानंतर विरोधकांनी आक्षेप घेतला. नवाब मलिक, अनिल देशमुख तुरुंगात होते, तेव्हा न्यायालयानं त्यांना मतदान करण्याची परवानगी दिली नाही. मात्र, आता या सरकारनं सत्तेचा गैरवापर केल्याचं दिसतय. याचा जाब माध्यमांनी सत्ताधाऱ्यांना विचारायला हवा. राज्यकर्त्यांना वेगळा न्याय, विरोधकांना वेगळा न्याय हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. मग आज गणपत गायकवाड यांनी मतदान कसं केलं? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.

हे वाचलंत का :

  1. विधानसभेसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा प्रचार करणार; ममता बॅनर्जी यांची घोषणा - Mamata Banerjee in Mumbai
  2. तृतीयपंथीयांसाठी लाडकी बहीण योजना लागू करा; ॲड. यशोमती ठाकूर यांची मागणी - Yashomati Thakur demands
  3. विधानपरिषदेत कोणाला बसणार धक्का? 11 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात! थोड्याच वेळात होणार फैसला - MLC ELECTION 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.