ETV Bharat / state

गणवेशाविना विद्यार्थ्यांचा स्वातंत्र्यदिन साजरा; मंत्री म्हणतात, महिना अखेर गणवेश मिळणार - School Uniform

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 15, 2024, 7:51 AM IST

Updated : Aug 15, 2024, 9:07 AM IST

Deepak Kesarkar On School Uniform : स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेच्या पटांगणावर शाळेच्या गणवेशात तिरंग्याला वंदना करताना विद्यार्थ्यांचा उत्साह वेगळाच असतो. मात्र, यंदा हजारो विद्यार्थी अद्यापही गणवेशापासून वंचित असून त्यांना यंदाचा स्वातंत्र्यदिन गणवेशा विनाच साजरा करावा लागला. याबाबत निश्चितच विलंब झाल्याची कबुली देत ऑगस्ट महिन्याच्या अखेरीपर्यंत गणवेश शाळांमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचा दावा, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना केला आहे.

School Uniform
शाळांचा नियमित गणवेश (File Photo)

मुंबई Deepak Kesarkar On School Uniform : राज्यातील जिल्हा परिषदा, नगरपालिका आणि महापालिकांच्या शाळांमधील 48 लाख विद्यार्थ्यांना एकच गणवेश देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. या निर्णयाची तातडीनं अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही दिल्या. त्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत शाळेचा नियमित गणवेश शिलाई करून दिला जाणार होता. मात्र, काही लाख विद्यार्थ्यांचे कापड मायक्रो कटिंग करून मआविमला देण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी केवळ दोन लाख गणवेश विद्यार्थ्यांना देण्यात आले तर आतापर्यंत काही लाख गणवेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले आहेत. अद्यापही पुणे, अहमदनगर, रायगड, नाशिक, हिंगोली, नागपूर, सोलापूर, पालघर, जळगाव, लातूर या जिल्ह्यांसह अन्य काही ठिकाणी गणवेश पोहोचलेले नाहीत.

प्रतिक्रिया देताना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Etv Bharat Reporter)

गणवेशाशिवाय स्वातंत्र्यदिन साजरा : दरवर्षी शालेय स्तरावर होणारी गणवेश खरेदीची पद्धत मोडीत काढून राज्याच्या पातळीवर एकच गणवेश लागू करण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता. सरकार अनेक ठिकाणी स्वस्तात गणवेश शिवून देणाऱ्या बचत गटांच्या शोधात होते, तर काही ठिकाणी एकाच गटाला अनेक गणवेशांचं काम दिल्यानं ही काम रखडली. विद्यार्थ्यांना दोन गणवेश त्यापैकी एक गणवेश स्काऊट आणि गाईडचा देण्यात येणार होता. मात्र, स्काऊट गाईडचा गणवेश अद्याप मिळालेलाच नाही. त्यामुळं स्वातंत्र्यदिना दिवशी विद्यार्थ्यांना स्काऊट गाईडच्या गणवेशाशिवाय स्वातंत्र्यदिन साजरा करावा लागणार आहे.

८ ते १५ दिवसांत गणवेश देण्याचा प्रयत्न : यासंदर्भात मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, हे पहिलंच वर्ष आहे आणि या वेळेला स्काय ब्ल्यू कलरचा युनिफॉर्म राहील असं आम्हाला स्काऊट गाईड यांनी सांगितलं होतं. नंतर काही काळानं स्काऊट गाईडने तो स्टील ग्रे तसाच आहे असं कळवलं. त्याच्यामुळं मध्यंतरीच्या काळामध्ये गणवेश तयार करण्यात काही खंड पडला. कारण हे अत्यंत दर्जेदार कपडे आहेत आणि याचं जे परीक्षण असतं हे केंद्र शासनाची जी समिती आहे त्याच्याकडून केलं जातं. त्याच्यामुळं हा जो काय विलंब झालेला आहे तो येत्या आठ पंधरा दिवसात भरून निघेल.

गारमेंट कंत्राटदारांचा कांगावा : याबाबत जे काही एकंदरीत बोललं जातं त्यामागे एक मोठ्या प्रमाणात रेडिमेड गारमेंट्सची लॉबी आहे. जे कमी दर्जाचे कापड शाळांना देत होते. हे मुख्यमंत्री यांनी प्रत्यक्ष विधानसभेमध्ये सुद्धा दोन्ही दर्जाचे कपडे दाखवले होते. म्हणजे अशा तऱ्हेची जर सिंथेटिक कपडे मुलांनी घातले तर घाम येणं, पुरळ येणं ह्या सगळ्या गोष्टी घडतात. शेवटी व्यवसाय म्हणून त्याच्याकडं बघून चालणार नाही. जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये टेंडर निघत त्याला टेंडरमध्ये जवळजवळ 12 कोटी रुपयांची बचत ही शासनाची झालेली आहे.

मआविमला पुरेसा वेळ मिळत नाही : याविषयी पॉलिसी डिसिजन घेतोय. मार्च महिन्यामध्ये जर हे टेंडर काढलं म्हणजे निधीची तरतूद असतेच मग पुढच्या वर्षी याची अंमलबजावणी होते. त्यामुळं पुरेसा वेळ हा मआविमला मिळत नाही. कारण मआविम आणि जिल्हा परिषदेची यंत्रणा दोघांच्या माध्यमातून हे ड्रेस शिवले जातात, तर हे लक्षात घेऊन यावर्षीपासून आम्ही अगोदर त्याचा टेंडर काढता येतं का त्याच्याबद्दल मी विभागाला चौकशी करायच्या सूचना दिल्या आहेत. शालेय स्तरावर जेव्हा खरेदी केली जात होती, तेव्हा साधारण सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत सुद्धा शाळांनी ड्रेस खरेदी केले आहेत. आता शासन करत असताना कशासाठी याचा बाऊ केला जातोय, हे का घडतं? मला याच्याबद्दल काय बोलायचं नाही असं केसरकर म्हणाले.

पहिलीचे गणवेश आधी तयार करणार : पुढच्या वर्षी सुद्धा गणवेश देत असताना अगोदर पहिलीचे गणवेश सगळे देऊन टाकायचे, जेणेकरून कुठली अडचण विद्यार्थ्यांना येता कामा नये असा आमचा मानस आहे. याच्या मागची जी भूमिका आहे ती समजून घेतली पाहिजे. स्काऊट अँड गाईडला ड्रेस असेल तर उद्या ती मुलं कवायत करायला लागतील, त्यांना सामाजिक काम कसं करायचं याची जाणीव राहील, ते स्वावलंबी होतील अशा अनेक गोष्टी आम्ही नव्याने एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये आणतं आहोत, 'एक राज्य एक गणवेश' हा त्याचा एक भाग आहे.

लवकरच गणवेश पोहोचतील : या महिन्याच्या अखेरीपर्यंत सगळ्यांना गणवेश पोहचेल अशी अपेक्षा आहे, खरं तर मी यासंदर्भात मीटिंग घ्यायला सांगितली होती. परंतु काही कारणामुळं ती मीटिंग होऊ शकली नाही. तर आता विभागाचे अधिकारी मीटिंग घेतील, टार्गेट सेट करतील. तसेच दुसरी एक सूचना अशी दिली आहे की, कपडा घेत असताना विभागनिहाय घ्यावा. म्हणजे सहा विभाग असेल तर सहा वेगवेगळ्या कंपन्याकडून घेतला तर वेळेवर काम होऊ शकेल. कारण आमचा हा पहिला अनुभव आहे. आतापर्यंत आम्ही शाळांनाच थेट पैसे पाठवत होतो. यापुढे काम विभागून देऊन दर्जेदार सुती कापडाचे गणवेश विद्यार्थ्यांना वेळेत मिळतील, असा दावा केसरकर यांनी केलाय.

हेही वाचा -

  1. देशभरात साजरा होतोय 78 वा स्वातंत्र्यदिन; 'प्रजासत्ताक दिनी' आणि 'स्वातंत्र्य दिनी' राष्ट्रध्वज फडकवण्यात 'हा' फरक - Independence Day 2024
  2. दारूबंदी ते कृषी क्रांती: हिरकणी पुरस्कारानं सन्मानित ममता ठाकूर यांना स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी दिल्लीतून खास निमंत्रण - Independence Day Invitation
  3. अप्पर वर्धा धरण: स्वातंत्र्यदिनानिमित्त धरणाचा खास 'नजारा' - Amravati Upper Wardha Dam

Last Updated : Aug 15, 2024, 9:07 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.