ETV Bharat / state

पत्नीच्या दीर्घायुष्यासाठी कुडाळमध्ये चक्क पुरुषांकडून वटपौर्णिमा, गेल्या 16 वर्षांपासून व्रत - VAT PURNIMA

वटपौर्णिमेचं औचित्य साधून श्री गवळदेव येथे उमेश गाळवणकर आणि मित्रमंडळींनी उत्साहात वटपौर्णिमा साजरी करत आपल्या पत्नीसाठी दीर्घायुष्याची कामना केली.

kudal
कुडाळमध्ये चक्क पुरुषांकडून वटपौर्णिमा साजरी (ETV Bharat Reporter)
author img

By

Published : June 10, 2025 at 10:10 PM IST

2 Min Read

सिंधुदुर्ग: गेली सोळा वर्षे कुडाळमधील पुरुष मंडळी आपल्या पत्नीसाठी वटपौर्णिमा साजरी करत आहेत. आज देखील वटपौर्णिमेचं औचित्य साधून श्री गवळदेव येथे उमेश गाळवणकर आणि मित्रमंडळींनी उत्साहात वटपौर्णिमा साजरी करत आपल्या पत्नीसाठी दीर्घायुष्याची कामना केली. सावित्रीनं यमराजाकडून आपल्या पतीचे म्हणजे सत्यवानाचे प्राण परत आणले. म्हणून दरवर्षी ज्येष्ठ पौर्णिमेला वटपौर्णिमा सण साजरा केला जातो. खरंतर हा महिलांचा सण. जसं वटवृक्षाला मोठं आयुष्य असतं तसंच आयुष्य आपल्या पतीला मिळावं म्हणून सुवासिनी हा सण साजरा करतात. वडाची पूजा करतात.

यंदाचं सोळावं वर्ष : दरम्यान, स्त्री आणि पुरुष ही संसार रथाची दोन चाकं आहेत. म्हणून जसं एखादी स्त्री आपल्या पतीसाठी दीर्घायुष्याची कामना करते, तसं मग पुरुषांनी आपल्या पत्नीसाठी का करू नये? असा विचार करत कुडाळमध्ये बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर, डॉ. संजय निगुडकर आणि मित्रमंडळी गेली अनेक वर्षे आपल्या पत्नीसाठी वट पौर्णिमा व्रत साजरं करत आहेत. या व्रताचं यंदाचं हे सोळावं वर्ष आहे.

वडाची यथोचित पूजा : आज सुद्धा वट पौर्णिमेच्या निमित्ताने कुडाळ शहरातल्या श्री गवळदेव मंदिरात ही सर्व पुरुष मंडळी वडाच्या पूजेसाठी जमली होती. श्री गवळदेवाला सांगणं करून सर्वांच्या वतीनं उमेश गाळवणकर यांनी वडाची यथोचित पूजा केली. त्यानंतर सर्व पुरुष मंडळींनी वडाला फेऱ्या मारत दोरा गुंडाळला. "आपली पत्नी दरवर्षी आपल्या दीर्घायुष्यासाठी वट वृक्षाची पूजा करते. मग आपण देखील तिच्यासाठी हे व्रत का करू नये, असा विचार करून गेली १६ वर्ष आम्ही सर्व पुरुष मंडळी वटपौर्णिमा साजरी करत आहे," असं प्रा. अरुण मर्गज यांनी सांगितलं. तसंच, ही परंपरा बाकीच्यांनी सुद्धा सुरु करावी. आपल्या चांगल्या परंपरा जपाव्या अशी अपेक्षा प्रा. अरुण मर्गज यांनी व्यक्त केली.

स्त्री-पुरुष समानतेचा संदेश : "महिला नेहमीच वटपौर्णिमा साजरी करतात, पण कुडाळमधील पुरुष गेली १६ वर्ष हे व्रत आपल्या पत्नीसाठी करतायेत, ते तेवढंच कौतुकास्पद आणि सर्वांनी आदर्श घेण्यासारखं आहे," असं सौ. अमृता गाळवणकर यांनी सांगितलं. यावेळी उमेश गाळवणकर आणि सौ. अमृता गाळवणकर यांनी एकत्र वट वृक्षाला फेऱ्या मारून स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला. या सोहळ्यात उमेश गाळवणकर, प्रा. अरुण मार्गज, राजू कलिंगण, प्रसाद कानडे, प्रा. परेश धावडे, सुनील गोसावी, ज्ञानेश्वर तेली, ओंकार कदम, महादेव परब, बळीराम जांभळे, अजय भाईप, सुरेश वरक सहभागी झाले होते.

हेही वाचा :

  1. दादांची आठवण मला रोजच येत असते; सुप्रिया सुळे भावुक
  2. गुगल मॅपची मदत करणं पडलं महागात, अपूर्ण बांधकाम झालेल्या उड्डाणपुलावर अडकली कार!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.