मुंबई : मुंबईतील खासगी विहिरी आणि बोअरवेल मालकांना केंद्रीय भूजल प्राधिकरणाची परवानगी सादर करण्याबाबत मुंबई महापालिकेने नोटीस बजावल्याच्या विरोधात टँकर मालकांच्या संघटनेने गुरुवारपासून संप पुकारला होता. त्यामुळे या संपाचा परिणाम म्हणजे मुंबईतील गृहनिर्माण सोसायटी, कार्यालयं बांधकाम व्यावसायिक या सर्वांवर जाणवला. तर पाण्याविना मुंबईकरांचे मोठ्या प्रमाणात हाल होताना पाहायला मिळाले. काही कार्यालयांमध्ये पाणी नसल्यामुळे कर्मचाऱ्यांवर वर्क फ्रार्म होम करण्याची वेळ आली. मात्र, आता टँकर चालक असोसिएशन आणि मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्या बैठकीनंतर संप मागे घेण्यात आला आहे.
आयुक्तांनी सांगितली पालिका प्रशासनाची भूमिका : सोमवारी टँकर चालक असोसिएशन आणि मुंबई पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्यात संपावर तोडगा काढण्यासाठी बैठक पार पडली. या बैठकीत टँकर असोसिएशनने आपले म्हणणे मांडले आहे. त्यानंतर आयुक्तांनीही पालिका प्रशासनाची भूमिका सांगितली. यानंतर आज दुपारी टँकर असोसिएशनच्या सदस्यांची बैठक झाली. यानंतर संपाबाबत या बैठकीतून तोडगा निघाला आणि संप मागे घेण्यात आला.
आज रात्रीपासून सेवा पूर्ववत : दरम्यान, आज रात्रीपासून सेवा पूर्ववत करून रात्रभर पाणी पुरवठा करण्यात येईल. संपावर तोडगा निघाला असल्यामुळे पाणी पुरवठा व्यवस्थित होईल, तसेच संप मागे घेतल्यानंतर जिथे लोकांना पाण्याची गरज आहे. त्या ठिकाणी पाणी पुरवठा केला जाईल, असं टँकर चालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पाण्याविना मुंबईकरांच हाल झाले आहेत. यानंतर चार दिवसानंतर संप मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे मुंबईकरांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.
बैठक अगदी सकारात्मक झाली : दरम्यान, दुपारी झालेल्या बैठकीला शिवसेनेचे नेते देखील उपस्थित होते. यावेळी, टँकर असोसिएशनचे शिष्टमंडळ यांनी ज्या आपल्या मागण्या होत्या, त्या आयुक्तासमोर ठेवल्या. आयुक्तांनी याला सकारात्मक प्रतिसाद दिला. बैठक अगदी सकारात्मक संपन्न झाली. परंतु आता टँकर चालक असोसिएशन पुन्हा यावर एकत्र बसून चर्चा करतील आणि निर्णय घेतील. आज पुन्हा एकदा सायंकाळी बैठक होणार आहे, त्यातून ते संपाबाबत निर्णय जाहीर करतील, अशी माहिती बैठकीनंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार मुरजी पटेल यांनी दिली होती.
हेही वाचा -