मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मराठी माणसांना सन्मानपूर्वक वागणूक मिळत नसल्याचा घटना घडताहेत. गेल्या काही महिन्यांपूर्वी दक्षिण मुंबईतील एका दुकानात मराठी कुटुंबाला हिंदीत बोला, मराठीत बोलू नका, असं सांगण्यात आलं होतं. यानंतर घाटकोपरमध्येच "तुम मराठी लोग गंदा है, मच्छी, मटण खाता है", असं म्हणत एका सोसायटीमध्ये गुजराती व्यक्तीकडून मराठी कुटुंबाला अपमानास्पद वागणूक देण्याच आली होती. या घटनेनंतर मनसे कार्यकर्त्यांनी या गुजराती कुटुंबाला जाब विचारला होता. विशेष म्हणजे अशा अनेक घटना ताज्या असताना आता मुंबईतील घाटकोपरमध्ये पुन्हा एकदा मराठी गुजराती वाद उफाळून आलाय. मराठी कुटुंबाला गुजराती कुटुंबातील तीन भावांनी घरात घुसून मारहाण केल्याची घटना समोर आलीय.
कोणत्या कारणावरून मारहाण?- दरम्यान, घाटकोपरमध्ये एप्रिल महिन्यात मांसाहार करीत असल्यावरून मराठी कुटुंबाला गुजराती व्यक्ती खालच्या पातळीवर जाऊन बोलला होता. ही घटना ताजी असताना आता घाटकोपरमधीलच रायगड चौक या परिसरातील एका सोसायटीत मराठी कुटुंबाने घरी कुत्रा पाळला. घरी कुत्रा का पाळला, या कारणावरून गुजराती तीन भावांनी मराठी कुटुंबाच्या घरात घुसून मारहाण केली. मारहाण केल्याची दृश्ये सीसीटीव्हीत दिसताहेत. आपणाला मारहाण केल्याचा दावा मराठी कुटुंबाने केला आहे. मात्र या घटनेनंतर संतप्त प्रतिक्रिया येत असून, महाराष्ट्र आणि मुंबईत हे चालू देणार नाही, मारहाणीचे हे कृत्य अत्यंत चुकीचे आहे, याबाबत आम्ही गुजराती कुटुंबाला जाब विचारू, असं मनसेच्या नेत्यांनी म्हटलंय.
फटाका वाजणारच... - डॉ. बाबासाहेबांच्या संविधानानुसार या घटनेनंतर एक मिनिटात गुन्हा दाखल झाला पाहिजे होता. पण मी एकच सांगतो याचा फटाका वाजणार, अशी प्रतिक्रिया मनसे नेते कर्णबाळा दुनबळे यांनी दिलीय. महाराष्ट्रात, मुंबईत राहून हे लोक आमच्या मराठी बांधवांवर, मराठी भावाला जर मारहाण करत असतील तर आम्ही हे खपवून घेणार नाही, याचा जाब विचारला जाणार आणि फटाका वाजणार, माझा जो भाऊ आहे. बहीण आहे. माझी मुलगी आहे, तिचं जर मी संरक्षण करत नसेन, तर माझ्या जगण्याला काय अर्थ आहे, त्यापेक्षा मी आत्महत्या केलेली बरी, जर आत्महत्या करायची नाही तर माझ्या बांधवांच्या संरक्षणासाठी फटाका तर वाजणारच आहे. त्यामुळे या घटनेचा जाब विचारणारच, अशी प्रतिक्रिया मनसे नेते कर्णबाळा दुनबळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिलीय.
हेही वाचा-
रेल्वेमधून पडून पाच प्रवाशांचा मृत्यू, लोकल की एक्सप्रेस याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था