नंदुरबार- जिल्ह्यातील पेसा आणि पेसा क्षेत्राबाहेरील 639 ग्रामपंचायतींपैकी 322 ग्रामपंचायतींचे सरपंचपद महिलांसाठी आरक्षित झालंय. नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात वर्ष 2025 ते 2030 मध्ये होणार्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. त्यात नंदुरबार तालुक्यातील पेसा क्षेत्रातील 97 ग्रामपंचायतींपैकी 49 ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनुसूचित जमातींच्या स्त्री राखीव पदासाठी तर शहादा-नवापूर तालुक्यातील पेसा क्षेत्रातील 232 ग्रामपंचायतींपैकी 116 ग्रामपंचायती महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्यात. तळोदा तालुक्यातील 67 पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींपैकी 34 ग्रामपंचायती, अक्कलकुवा तालुक्यातील 79 पैकी 40 ग्रामपंचायती, अक्राणी तालुक्यातील 88 पैकी 44 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी महिला आरक्षण निश्चित झालंय.
पाच वर्षांसाठी महिला आरक्षण सोडत : वर्ष 2025 ते 30 या कालावधीसाठी जिल्ह्यातील 639 ग्रामपंचायतींसाठी महिला आरक्षण प्रक्रिया पार पडलीय. सात वर्षीय लावण्या प्रवीणकुमार महाजन या बालिकेने चिठ्ठ्या काढल्या. त्यानुसार महिला आरक्षण ठरविण्यात आले. यामध्ये पेसा क्षेत्रातील 563 ग्रामपंचायती आहेत. यामध्ये नंदुरबार तालुक्यातील 97 पैकी 49 ग्रामपंचायतींवर महिला आरक्षण असणार आहे, तर शहादा तालुक्यातील 116 पैकी 58, नवापूर तालुक्यातील 116 पैकी 58, तळोदा तालुक्यातील 68 पैकी 34, अक्कलकुवा तालुक्यातील 79 पैकी 40 तर अक्राणी तालुक्यातील 88 पैकी 44 ग्रामपंचायतींवर महिला आरक्षण असणार आहे.
ग्रामपंचायतींवर महिला राज असणार : नॉन पेसा क्षेत्रातील 76 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यामध्ये नंदुरबार तालुक्यातील 41 ग्रामपंचायतींपैकी 22 तर शहादा तालुक्यातील 35 पैकी 17 ग्रामपंचायतींवर महिला राज असणार आहे. यामुळे एकूण ग्रामपंचायतींमध्ये सुमारे 50 टक्क्यांपेक्षा अधिक ग्रामपंचायतींवर महिला राज राहणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी दिलीय. यात नंदुरबार तालुक्यातील पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायत सरपंचपद अनुसूचित जमाती स्त्रीसाठी राखीव करण्यात आलंय. त्यात शिंदे, कोळदे, दहिंदुले बु., राकसवाडे, नंदपूर, सुंदरदे, फुलसरे, इंद्रीहट्टी, आष्टे, अंबापूर, उमर्दे बु., हरीपूर, ठाणेपाडा, वासदरे, धमडाई, पथराई, नांदर्खे, विरचक, नागसर, नळवे बु., कोठली खु., निमगाव, रनाळे खु., नवागाव, काळंबा, निंबोणी, मंगरुळ, घोगळगाव, होळतर्फे हवेली, वसलाई, शिरवाडे, श्रीरामपूर, राजापूर, ढंढाणे, खैराळे, चौपाळे, कोठळे, उमर्दे खु., आडछी, गुजरभवाली, खामगाव, देवपूर, सुतारे, करजकुपे, भांगडा, खोडसगाव, भवानीपाडा, लहान शहादे, शेजवे या ग्रामपंचायतींच्या समावेश आहे.
ग्रामपंचायत अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव : तर पेसा क्षेत्राबाहेरील जुनमोहिदा अनुसूचित जाती महिलेसाठी तर काकरदे ग्रामपंचायत अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव करण्यात आलीय. तर तिसी, विखरण, घोटाणे, नामाप्र. महिलेसाठी सरपंचपद आरक्षित करण्यात आलंय. तसेच सर्वसाधारण महिलेसाठी हाटमोहिदा, आराळे, रजाळे, कंढरे, मांजरे, शनिमांडळ, कानळदे, निंभेल, बलवंड, बह्याणे, सैताणे, तलवाडे खु., बलदाणे, भादवड, नगाव, वैंदाणे, खर्दे-खुर्दे ग्रामपंचायतीचे सरपंचपद आरक्षित करण्यात आलंय. तर शहादा तालुक्यातील पेसा क्षेत्रातील ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जमाती स्त्रीसाठी सरपंचपद आरक्षित करण्यात आले. त्यात आमोदा, औरंगपूर, अंबापूर, कलमाडी तबो., कलसाडी, काथर्दे खु., कोंढावळ, कानडीतह, कोचरा, खेडदिगर, खापरखेडा, चिखली बु., जावदेतह, टुकी, टेंबली, तर्हाडी त.बो., तलावडी, दुधखेडा, पिंगाणे, बुढीगव्हाण, भोंगरा, भुलाणे, म्हसावद, मोहिदे त. ह.,मलगांव, मानमोड्या, मडकाणी, राणीपूर, लोहारे, होळ, उंटावद, पाडळदे बु., बहिरपूर, निंभोरा, आडगांव, कमरावद, कुढावद, कर्जोत, गोगापूर, जयनगर, पिंप्री, लक्कडकोट, विरपूर, न्यु असलोद, कोटबांधणी, शोभानगर, जीवननगर, पिंपळोद, कवळीथ, जाम, जुनवणे, गोदीपुर, बोराळे, रायखेड, नागझिरी, भागापूर, ओझटे, असलोद, पिंप्राणी यांचा समावेश आहे. याबाबत जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी आरक्षण सोडत जाहीर केलीय.
हेही वाचा -