ETV Bharat / state

महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही - बजेट भाषणात अजित पवार यांची घोषणा

उपमुख्यमंत्री तसंच राज्याचे अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये त्यांनी राज्याचा विकास थांबणार नाही असं सांगितलं.

अजित पवार बजेट भाषण करताना
अजित पवार बजेट भाषण करताना (ANI)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : March 10, 2025 at 2:27 PM IST

|

Updated : March 10, 2025 at 3:44 PM IST

3 Min Read
Choose ETV Bharat

मुंबई - राज्याचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प आज मांडण्यात आला. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत बजेट मांडलं. पाहूयात या बजेटमधील महत्वाचे मुद्दे.

  • दोन वाजून १ मिनिटांनी बजेट भाषणास सुरुवात
  • शिवाजी महाराज, संभाजी महाराज, जिजाऊ माता, म. फुले, आंबेडकर, आदींना प्रथम नमन, तेगबहाद्दूर यांनाही नमन करुन बजेट भाषणाला सुरुवात
  • अमलकी एकादशीच्या पवित्र दिवशी ११ वा अर्थ सादर करतोय...
  • केंद्रीय अर्थसंकल्पाचे कौतुक करताना महाराष्ट्र कुठेही मागे पडणार नाही
  • राज्याला केंद्राच्या अर्थसंकल्पाने बळ मिळणार आहे.
  • रेल्वे, कल्याणकारी योजना, पायाभूत योजना यासाठी मोदींचे आभार
  • लाडक्या बहिणी मिळाल्या धन्य झालो, विकासाची केली कामे म्हणून आम्ही पुन्हा आलो, पुन्हा आलो, पुन्हा आलो...
  • २०४७ पर्यंत विकसित भारतचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे
  • केंद्राच्या विकसित भारत या संकल्पात महाराष्ट्र हातभार लावण्यास कुठेही मागे पडणार नाही
  • विकासाला गती देणं आवश्यक आहे. त्यासाठी महाराष्ट्र आघाडीवर राहील
  • शश्वत विकासचा प्रयत्न राज्यातील विविध उपक्रमातून करत राहणार
  • कृषी, उद्योग अशा सर्वच बाबतीत विकास साधणार
  • महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही
  • विवि योजनांच्या माध्यमातून लोकांना मिळालेला पैसा खेळता राहिल्याने क्रयशक्ती वाढली आहे.
  • वस्तु, सेवा याच्या मागणीत क्रयशक्ती वाढल्यानं मोठी वाढ झालीय.
  • महाराष्ट्रात येणारी थेट परदेशी गुंतवणूक मोठी होत आहे. यात राज्य सर्वात आघाडीवर आहे
  • १५६ करार डाओसमध्ये करण्यात आले. १६ लाख कोटींच्या पेक्षा मोठ्या रकमेचे हे करार आहेत.
  • परदेशी गुंतवणुकीमुळे उद्योग वाढतील, रोजगार वाढतील
  • १०० दिवसांचा सात कलमी कृती आराखडा करुन, त्यानुसार विकासकामे सुरू आहेत.
  • १०० दिवसानंतरही हा विकास कार्यक्रम निरंतर सुरू ठेवणार.
  • राज्यासाठी लवकरच नवीन औद्योगिक धोरण आणणार आहे. त्याची लवकरच घोषणा होईल
  • राज्यात ४० लाख कोटींची गुंतवणूक करुन, ५० लाख रोजगार निर्मिती करणार
  • राज्याचा सर्वींगीण विकासाकरता अनेक आर्थिक विकासाची धोरणं जाहीर करणार
  • निर्यातीत वाढीसाठी निर्यात प्रोत्साहन धोरण २०२३ नुसार काम सुरू आहे
  • केंद्र राज्याची निर्यात तुलना करता महाराष्ट्र अग्रभागी आहे. एकूण निर्यातीत १५.४ टक्के राज्याचा निर्यात वाटा आहे.
  • आंतरराष्ट्रीय दर्जाची व्यापार केंद्रे - मुंबई आणि मुंबई परिसरात विकसित करणार
  • गडचिरोली स्टील हब म्हणून उदयास येत आहे. डाओसमध्ये त्याकरता गुंतवणूक करार झाला आहे.
  • गडचिरोलीमध्ये त्यासाठी रस्त्याच्या सुविधा निर्माण केल्या जात आहेत.
  • हरित उर्जेसाठी राज्य कटीबद्ध आहे. त्यानुसार येत्या पाच वर्षात १ लाख १३ हजार कोटी रुपयांची वीज खरेदीत कपात अपेक्षित.
  • राज्याला वस्त्रोद्योग केंद्र म्हणून विकसित करणार, विदर्भातील कापूस उत्पादक तसंच हातमाग उद्योगांना चालना मिळणार आहे.
  • नागपूर विमानतळावर लवकरच नाईट लँडिंग सुविधा करण्यात येणार
  • शिर्डी विमानतळावर लवकरच नाईट लँडिंग सुविधा सुरू करण्यात येणार
  • ३ हजार ६१० कोटी परिवहन विभागासाठी देणार
  • कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धीमत्ता वापरण्यास प्रोत्साहन
  • शेतमालाला हक्काची बाजारपेठ मिळवून देणार
  • पहिल्या टप्प्यात त्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद
  • दीड हजार किलोमीटरचे रस्ते बांधण्याचा संकल्प
  • वाढवण बंदराजवळ मुंबई भागातील तिसरे विमानतळ बांधणार
  • नार-पार नदीजोड प्रकल्पाला चालना देणार
  • मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ६४ हजार कोटीच्या कामांना मंजूरी प्रस्तावित
  • पुण्यात २ नवीन मेट्रोमार्ग सुरू करण्याचे काम हाती घेणार
  • प्रक्रिया केलेल्या पाण्याचा वापर उद्योगांसाठी करणार
  • राज्यात ४५ लाख कृषी पंपांना मोफत वीज दिली जात आहे
  • राज्यातील बांबू लागवड क्षेत्राला चालना देणार
  • शेतीच्या विकासाकरता ९७१० कोटी रुपयांची कृषी विभागासाठी तरतूद करणार
  • अन्न व नागरी पुरवठा विभागाकरता ५२६ कोटी रुपये तरतूद
  • राज्यासाठी नवीन गृहनिर्माण धोरण लागू करणार
  • राज्यात प्रथानमंत्री घरकूल योजनांची उत्तम अंमलबजावणी करणार
  • गाव खेड्यांचे शंभर टक्के सौरविद्युतीकरण करण्यासाठी प्रयत्न करणार
  • ० ते १०० युनीट वीज वापरणाऱ्यांसाठी सौर ऊर्जा प्रकल्पासाठी अनुदान योजना
  • एक तालुका एक बाजार समिती योजना राबवणार
  • आदिवासी, भटक्या जमाती, मागासवर्गियांच्या विकासाकरता विविध योजना
  • १८ महामंडळे स्थापन करण्यात आली. सर्वच महामंडळांच्या सर्वच योजना एकाच वेबसाईटवर आणणार
  • २४ लाख महिलांना लखपती दीदी योजनेचा लाभ मिळवून देणार
  • लाडकी बहीण योजनेसाठी ३६ हजार कोटींची तरतूद
  • राज्याच्या आरोग्य विभागासाठी ३८२७ कोटी रुपयांची तरतूद
  • मुंबईतील गुन्हेगारी कमी करण्यासाठी हायटेक कंट्रोल कमांड सुविधा उभारणार
  • राज्य सरकार पर्यटन क्षेत्रात १ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवण्यासाठी प्रयत्न करणार
  • संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक उभारणार
  • पानिपतमध्ये मराठ्यांच्या शौर्याचं प्रतिक उभारणार
  • कोयनानगर येथील जल पर्यटन प्रकल्पाला मान्यता
  • ३-९ ऑक्टोबर दरम्यान अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करणार
  • आगामी नाशिक कुंभ मेळ्यासाठी नमामी गोदावरी विकास आराखडा
  • ३,६७,४६७ कोटी रुपये महसूल आवकेचे नियोजन
  • चारचाकी वाहनांसाठी १ टक्के करवाढ प्रस्तावित
  • का आम्हा सत्ता मिळाली जाण आहे, काय आम्हा करावयाचे याचे भान आहे
  • बजेट भाषणाच्या शेवटी सभापतींकडून उद्यापर्यंत सभागृह तहकूब करण्यात आलं.
  • सभागृहात बजेट भाषण संपताच सभापती पुढील घोषणा करताना विरोधकांची घोषणाबाजी
Last Updated : March 10, 2025 at 3:44 PM IST