मुंबई : आपल्या महाराष्ट्राला एकूण 720 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमधील समुद्र किनारे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहेत. या समुद्रकिनाऱ्यावरची शांतता, इथले खानपान केवळ देशातीलच नाहीतर देशाबाहेरील पर्यटकांचे देखील आकर्षण आहे. आता महाराष्ट्र सरकारने या किनारपट्टी भागातील रहिवाशांच्या रोजगारासाठी जहाज बांधणीचे विशेष धोरण तयार केले असून, जहाज बांधणी व जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर याचे धोरण तयार करण्यात आले आल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे. सोबतच याबाबतचे स्वतंत्र धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलेच राज्य असल्याचे देखील नितेश राणे यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्रात अडीच ते तीन हजार कोटींची गुंतवणूक : आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. त्यापैकीच एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे जहाज बांधणी व जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर याचे धोरण तयार करण्याचा आहे. आज मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे धोरण स्वीकारल्याचे आणि त्यावर स्वाक्षरी केल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली. याबाबतचे धोरण स्वीकारल्यामुळे महाराष्ट्रात आता गुंतवणूक वाढेल आणि किनारपट्टी भागातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. पुढे नितेश राणे म्हणाले की, जहाज बांधणी व जहाज दुरुस्ती आणि जहाज पुनर्वापर याचे धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य आहे. याच महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मंत्रिमंडळाने नेदरलँडचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान आम्ही तिकडे जहाज बांधणीचे सुरू असलेले काम पाहिजे आणि तिथल्या काही कंपन्यांशी चर्चा केली. या धोरणाला आज कॅबिनेट मान्यता मिळाल्याने, ECA फंडाच्या माध्यमातून अटल कंपनीद्वारे लवकरच महाराष्ट्रात अडीच ते तीन हजार कोटींची गुंतवणूक लवकरच येणार असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली.
स्थानिकांना रोजगार मिळणार : आजही आपल्या देशात जहाज बांधणीचे काम सुरू आहे. जुन्या जहाजांची विल्हेवाट लावण्याची कामे सुरू आहेत. त्यांची दुरुस्त देखील आज आपल्या देशात केली जाते. मात्र, याबाबतचे एकत्रित निश्चित असे धोरण आजपर्यंत कोणत्याच राज्याकडे नव्हते. ते पहिल्यांदाच आपल्या महाराष्ट्राने तयार केला आहे. त्यामुळे याआधी जी काही गुंतवणूक याची ती गुजरातमध्ये केली जायची अनेक कंपन्यांची गुजरातला पसंती दिसून येते. या धोरणामुळे आता महाराष्ट्रात देखील या क्षेत्रात गुंतवणूक वाढणार असून, किनारपट्टी भागाची प्रगती आणि स्थानिकांना रोजगार मिळणार आहे, असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. तसेच, सन 2030 पर्यंत जहाज दुरुस्तीचे एक तृतीयांश काम महाराष्ट्रात केले जाणार आहे. सोबतच सन 2030 पर्यंत 6 हजार 600 कोटी गुंतवणूक महाराष्ट्रात आणण्याचे सरकारचे उद्दिष्ट असून, त्यातून 40 हजार तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत. हेच प्रमाण सन 2047 म्हणजे अमृतकाळ वर्षात 18 हजार कोटी गुंतवणूक लक्ष 3 लाख 30 हजार तरुणान नोकऱ्या मिळणार असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :