ETV Bharat / state

सभापती राम शिंदेंकडून कर्जत जामखेडच्या राजकारणासाठी पदाचा वापर, रोहित पवारांचा निशाणा - ROHIT PAWAR

कर्जत जामखेडमधील सुरू असलेल्या विकास कामांवर देखील आमदार रोहित पवार यांनी भाष्य केले.

Rohit Pawar
आमदार रोहित पवार (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 24, 2025 at 2:06 PM IST

Updated : April 24, 2025 at 3:21 PM IST

2 Min Read

अहिल्यानगर : काही दिवसांपूर्वी कर्जत नगरपंचायतीच्या १२ नगरसेवकांनी आपल्याच नगराध्यक्षांविरोधात बंड पुकारला होता. या नगरसेवकांनी नगराध्यक्षा उषा राऊत यांच्याविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठरावाचा अर्ज दाखल केला होता. तर नगराध्यक्षांनी अविश्वास ठरावाच्या बैठकीच्या दिवशी सकाळीच जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने सभापती राम शिंदेंची चाणक्यनिती यशस्वी झाल्याचे बोलले जात आहे. येत्या २ मे रोजी कर्जत नगरपंचायतीत नवीन नगराध्यक्षाची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांना प्रसार माध्यमांनी विचारले असता, त्यांनी सभापती राम शिंदेंवर टीकास्त्र डागले. त्यामुळे कर्जत जामखेडमधील राजकीय घमासाम अजूनही शमलेला नसल्याचे यातून दिसून येते.

संविधानिक पदाचा वापर राजकीय ताब्यासाठी : एका संविधानिक पदाचा वापर हा राजकीय ताबा व इतर पक्षातील लोकांना वळवण्यासाठी करत असल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी सभापती राम शिंदे यांच्यावर केला आहे. पुढे बोलताना म्हणाले की, जसे राज्य पातळीवर दाबवतंत्र वापरून पक्ष फोडले त्याचप्रमाणे कर्जतमध्ये देखील करण्यात आले. या सरकारच्या काळामध्ये लोकशाहीला किंमत राहिलेली नाही. तुमच्याकडे आलेल्या पदाचा वापर लोकहिताऐवजी राजकीय ताबा आणि इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी केला जात आहे. कर्जत जामखेडमध्ये पिण्यासाठी तसेच शेतीसाठी पाणी नाही, त्यासाठी राम शिंदे हे कुठेही प्रयत्न करताना दिसत नाहीत, असे रोहित पवार यांनी सांगितले.

आमदार रोहित पवार (ETV Bharat Reporter)

पीडब्ल्यूडीच्या कामांना निधीविना कामे खोळंबली : कर्जत जामखेडमधील सुरू असलेल्या विकास कामांवर देखील आमदार रोहित पवार यांनी भाष्य केले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू असलेल्या विकासकामांना निधी नसल्याने कामे खोळंबल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. तसेच, अहिल्यानगर जिल्ह्याचा सार्वजनिक बांधकाम विभागाचा ६५० ते ७०० कोटींचा फंड अडकला आहे. तर सरकारकडून मात्र दहा ते वीस कोटींचा निधी प्राप्त होतो, यासाठी सभापती राम शिंदे सर प्रयत्न करताना कुठेही दिसून येत नाही. जामखेड शहरात अनेक प्रश्न प्रलंबित आहे. तेथील मुख्य कार्यकारी अधिकारी यांची वागणूक योग्य नाही. काही लोकांना हाताशी धरून ती स्वतःच कॉन्ट्रॅक्ट देत असल्याचा संशय तेथील नागरिकांना येत आहे. जामखेडमध्ये देखील पाण्यासह कचऱ्याच्या योग्य नियोजन नाही, याकडे तुम्ही दुर्लक्ष करता आणि तुम्ही पदाचा वापर मिरवण्यासाठी आणि राजकीय भूमिका घेण्यासाठी करत आहात, असे रोहित पवार यांनी सांगितले.

तालुक्यातील धार्मिक स्थळांसाठी निधीची गरज : दरम्यान, रोहित पवार यांनी तालुक्यातील धार्मिक स्थळांच्या विकासकामांबाबतही भाष्य केले. तसेच, विकासकामऐवजी फोडाफोडीच्या राजकारणाला राम शिंदे महत्व देत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे. ते म्हणाले की, तालुक्यातील संत गीते बाबा, संत सीताराम बाबा, संत गोदड महाराज, चौंडी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विकास आराखडा यांसह तालुक्यातील धार्मिक स्थळांच्या विकास कामासंदर्भात निधीची मागणी करत आहे. मात्र यासाठी राम शिंदे सर प्रयत्न करत नाहीत. तर फोडाफोडीचे राजकारण करण्यासाठी राम शिंदे सर पदाचा वापर करत आहेत आणि हे सर्व लोक उघड्या डोळ्यांनी पाहत आहेत, असा घणाघात आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

हेही वाचा :

  1. राजकोट किल्ल्यावरील पुतळा उभारणार, छत्रपतींचा पुतळा ताशी 200 किमी वाऱ्याचा वेगही भेदणार; ऑस्ट्रेलियामध्ये झाली चाचणी
  2. ब्रिटिशकालीन प्रभादेवी पूल 25 तारखेपासून होणार बंद, पोलिसांकडून वाहतूक मार्गात बदल
  3. नवीन संचमान्यतेविरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची उच्च न्यायालयात धाव

Last Updated : April 24, 2025 at 3:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.