ETV Bharat / state

मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्याचा राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय, मंत्रिमंडळ बैठकीत आठ महत्त्वाचे निर्णय - MAHARASHTRA CABINET MEETING

विशेष म्हणजे आज मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रांसारखा दर्जा देण्याचा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय महायुती सरकारने घेतला आहे.

cabinet meeting
राज्य मंत्रिमंडळाची बैठक (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 22, 2025 at 4:19 PM IST

Updated : April 22, 2025 at 4:44 PM IST

2 Min Read

मुंबई : आज (मंगळवारी) राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकूण आठ महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. विशेष म्हणजे आज मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रांसारखा दर्जा देण्याचा ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय महायुती सरकारने घेतला आहे.

आजच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय कोणते?

  1. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात मौजे नायगाव येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक आणि महिला प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा निर्णय. स्मारकासाठी 142.60 कोटी तर महिला प्रशिक्षण केंद्रासाठी 67.17 लाख रुपयांच्या तरतूदीस मंजूरी. (ग्रामविकास विभाग)
  2. गोसीखुर्द राष्ट्रीय प्रकल्प, ता. पवनी, जि.भंडारा या प्रकल्पाच्या 25 हजार 972 कोटी 69 लाख रुपयांच्या तरतूदीस सुधारित प्रशासकीय मान्यता. (जलसंपदा विभाग)
  3. राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार करणार (कामगार विभाग)
  4. विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयात नियुक्त कंत्राटी विधी अधिकारी यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय, 35 हजार रुपयांऐवजी 50 हजार रुपये मानधन मिळणार (महसूल विभाग)
  5. 14 व्या वित्त आयोगामार्फत राज्यात तात्पुरत्या स्वरुपात स्थापन करण्यात आलेल्या 16 अतिरिक्त न्यायालयांना व 23 जलदगती न्यायालयांना आणखी 2 वर्षे मुदतवाढ देण्यास व त्यासाठी येणाऱ्या खर्चास मान्यता (विधी व न्याय विभाग)
  6. मत्स्यव्यवसायास चालना देण्यासाठी कृषी क्षेत्रा सारखाच दर्जा देण्याचा निर्णय. मच्छिमारी, मत्स्य व्यावसायसाठी आवश्यक पायाभूत सुविधा, सवलतीचा लाभ होणार (मत्स्यव्यवसाय विभाग)
  7. पायाभूत सुविधांच्या अमंलबजावणीत बाधित झोपडपट्टी पुनर्वसनाच्या योजनेतील घरांची निर्मिती व त्यांच्या वितरणासाठीच्या धोरणात सुधारणा (गृहनिर्माण विभाग)
  8. पुणे जिल्ह्यातील तळेगाव-चाकण-शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गावरील तळेगाव ते चाकण यावर चार पदरी उन्नत मार्ग व जमिनीस समांतर चार पदरी रस्ता तसेच चाकण ते शिक्रापूर यावर जमिनीस समांतर सहा पदरी रस्ता तयार करण्याचा निर्णय (सार्वजनिक बांधकाम विभाग)

३ दिवसानंतर शिंदेंचा शासकीय कामकाजात सहभाग...
दुसरीकडे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मागील तीन दिवसांपासून ते साताऱ्यातील दरे या आपल्या मूळ गावी गेले होते. तिथे त्यांनी शेतीत काम केल्याचे सर्वांनी पाहिले. शेतीत झाडांची लागवड केल्याचं व्हिडिओ एकनाथ शिंदेंचा समोर आला होता. परंतु ते मागील तीन दिवसांपासून कोणत्याही शासकीय कामकाजात किंवा कार्यक्रमात सहभाग घेतला नव्हता. मात्र गेल्या तीन दिवसांनंतर आज पहिल्यांदाच राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकनाथ शिंदेंनी सहभाग घेतला. दरम्यान, एकनाथ शिंदे नाराज असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.

हेही वाचा :

  1. "मला डी कंपनीकडून मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी": बाबा सिद्दीकींचा मुलगा झीशान सिद्दीकी यांची माहिती
  2. "महायुतीतील मंत्र्यांना तुडवून हाणलं पाहिजे, तरच तुमचा सातबारा कोरा होणार" - राजू शेट्टी
  3. अनैतिक संबंधातून नागपुरात क्रूर हत्येचा थरार; प्रेयसीच्या नवऱ्यावर कोयत्याने केले सपासप वार

Last Updated : April 22, 2025 at 4:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.