मुंबई : सर्वोच्च न्यायालयानं राज्यातील चार महिन्यात स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका घ्या, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळं राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या प्रभाग रचना निश्चित करा, असे आदेश राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागानं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीना दिले आहेत.
निवडणूक आयोगाचं राज्य सरकारला पत्र : 32 जिल्हा परिषद, 336 पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. या दरम्यान, काही दिवसांपूर्वी राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याबाबत राज्य निवडणूक आयोगानं राज्य सरकारला पत्र लिहिलं होतं. यानंतर आता राज्यातील 32 जिल्हा परिषदा आणि 336 पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना आणि सदस्य संख्या याचं प्रारुप तयार करण्यासाठी ग्राम विकास विभागानं अधिसूचना जारी केली आहे. राज्य शासनाच्या ग्राम विकास विभागानं जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांना प्रभाग रचना करण्यासाठी आदेश दिले आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती प्रभाग रचना निश्चित करण्याचे राज्य सरकारनं आदेश दिल्यानं आता राजकीय पक्षांच्या नेत्यांनी निवडणुकीची तयारी जोरात सुरू केली आहे.
प्रभाग रचना, हरकतीची तारीख काय? :
- दिनांक १४/०७/२०२५ पर्यंत प्रारुप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिद्ध करणे
- दिनांक २१/०७/२०२५ पर्यंत जिल्हाधिकारी यांच्याकडे हरकती व सूचना सादर करणे
- दिनांक २८/०७/२०२५ पर्यंत प्राप्त हरकतीच्या आधारे अभिप्रायासह विभागीय आयुक्त यांना प्रस्ताव सादर करणे
- दिनांक ११/०८/२०२५ पर्यंत विभागीय आयुक्तांनी प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी देऊन निर्णय देणे
- दिनांक १८/०८/२०२५ पर्यंत जिल्हाधिकारी यांनी अंतिम प्रभाग रचना मान्यतेसाठी राज्य निवडणूक आयोग किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्याकडे सादर करणे
हेही वाचा :
- गुगल अर्थच्या सहाय्याने केली जाणार प्रभागांची मार्किंग, मुंबईत वॉर्डनिहाय अन् राज्यभरात प्रभागनिहाय रचना होणार
- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हालचालींना वेग, प्रभाग रचना करण्याचे आयोगाचे सरकारला आदेश
- Raju Pednekar: मुंबईच्या वार्ड रचना कमी करण्याच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; 18 मे रोजी सुनावणी