ETV Bharat / state

कोल्हापुरात थरार: लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीनं लग्नास दिला नकार, प्रियकरानं केला खून - LIVE IN PARTNER KILLED IN KOLHAPUR

लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या तरुणीचा प्रियकरानं खून केल्यानं मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी पोलीस संशयित तरुणाचा शोध घेत आहेत.

Live In Partner Killed In Kolhapur
संपादित छायाचित्र (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 4, 2025 at 1:04 PM IST

Updated : June 4, 2025 at 2:40 PM IST

3 Min Read

कोल्हापूर : लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून देखील लग्नाला नकार देणाऱ्या तरुणीवर प्रियकरानं धारदार शस्त्रानं वार करुन अमानुषपणे खून केला आहे. मंगळवारी दुपारी ही घटना उघडकीस आली असून यामुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना करवीर तालुक्यातील सरसोबतवाडी इथं घडली आहे. समीक्षा भारत नरसिंगे उर्फ बागडी (वय 23, रा. जयभवानी गल्ली) असं खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर संशयित आरोपी सतिश मारूती यादव ( वय 25, रा. शिवाजीपेठ, कोल्हापूर) हा पसार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिली आहे.

Live In Partner Killed In Kolhapur
मृत समीक्षा (Reporter)

संशयित सतीश यादव याला शोधण्यासाठी पोलिसांची दोन पथक रवाना झाली आहेत. तांत्रिक शोधासाठी सायबर पोलिसांची मदत देखील घेण्यात येत असून वेगानं तपास सुरू आहे. - अनिल तनपुरे, पोलीस निरीक्षक, गांधीनगर पोलीस ठाणे

पतीसोबत पटत नसल्यानं राहत होती माहेरी : कोल्हापुरातील कसबा बावडा येथील जय भवानी गल्ली परिसरात मृत समीक्षा ही आपली आई आणि लहान बहीण भावासोबत राहत होती. 2018 साली समीक्षाचं लग्न लक्षतीर्थ वसाहत परिसरातील मुलासोबत झालं होतं. लग्नानंतर तीन महिन्यात नवऱ्याशी पटत नसल्यानं नवऱ्याला सोडून ती आपल्या आई, बहीण, भावासोबत कसबा बावड्यातील जय भवानी गल्ली इथं राहायला गेली.

Live In Partner Killed In Kolhapur
घटनास्थळी दाखल झालेले पोलीस (Reporter)

सतीश यादवसोबत राहत होती लिव्ह इनमध्ये : घरची परिस्थिती हालाखीची असल्यानं समीक्षा हिची आई मासे विकून उदरनिर्वाह करत होती. तर समीक्षा देखील इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करत होती. हे काम करताना तिची ओळख कोल्हापुरात कामानिम्मित आलेली तेलंगणा इथली तरुणी आयशू आंपले आणि कोल्हापुरातील शिवाजी पेठ इथं राहणारा संशयित सतीश यादव यांच्याशी झाली. या दरम्यान समीक्षा आणि सतीश दोघं लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. यासाठी सतीश यादव यानं सरनोबतवाडी इथं टू बीएचके फ्लॅट घेतला. इथं गेल्या तीन महिन्यांपासून ते राहत होते. तर त्यांच्यासोबत तिची मैत्रीण आयशू देखील राहत होती. मात्र गेल्या महिन्याभरापासून समीक्षा आणि सतीश यांच्यात वारंवार वाद होत होता. आठ दिवसांपूर्वी या वादाला कंटाळून समीक्षा आणि तिची मैत्रीण आयशू या दोघी कसबा बावडा इथल्या आईच्या घरी राहण्यास गेल्या. तर संशयित आरोपी सतीश यादव हा समीक्षाला वारंवार फोन करून भेटण्यासाठी आग्रह करत होता.

समीक्षावर चाकू हल्ला करुन प्रियकर मारेकरी फरार : मंगळवारी दुपारी समीक्षा आणि तिची मैत्रीण आयशू दोघी आपलं सामान आणण्यासाठी फ्लॅटवर गेल्या. यावेळी दोघी फ्लॅटवर आल्याची माहिती संशयिताला मिळताच तो फ्लॅटवर आला. रागाच्या भरात त्यानं समीक्षाला एका खोलीत नेऊन तिच्यावर चाकूनं वार केला. या हल्ल्यात समीक्षा जागेवरच कोसळली. हा हल्ला इतका भीषण होता की चाकू तरुणीच्या बरगड्यात अडकला. तर संशयित सतिश यादव यानं खोलीला बाहेरून कडी लावून दुचाकीवरून पसार झाला, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मित्राला फोन करुन दिली चाकू हल्ल्याची माहिती : यावेळी घाबरलेल्या आयशूनं दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र बाहेरून दरवाजा बंद असल्यानं तिला दरवाजा उघडता आला नाही. यानंतर आयशूनं वसगडे इथला तिचा मित्र अभिषेक सोनवणे याला फोन करून घडलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानंतर अभिषेक घटनास्थळी दाखल होत त्यानं दरवाजा उघडला. यावेळी समीक्षा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, तर आयशू रडत होती. अभिषेकनं त्वरित एका ऑटो रिक्षातून समीक्षाला जवळील खासगी रुग्णालयात नेलं. समीक्षाची प्रकृती गंभीर असल्यानं तिला सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्यानं समीक्षाचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

लेकीचा खून झाल्याचं कळताच आईचा आक्रोश : प्रियकरानं खून केल्याची माहिती वाऱ्यासारखी शहरभर पसरली. समीक्षाचे नातेवाईक आणि मित्र परिवार सीपीआर रुग्णालय परिसरात दाखल झाले. लेकीचा खून झाल्याचं कळताच समीक्षाच्या आईचा आक्रोश पाहून अनेकांचं हृदय पिळवटून निघालं. या घटनेची माहिती मिळताच लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनी पोलिसांचा फौजफाटा घेऊन रुग्णालयात धाव घेतली. तसेच करवीर पोलीस ठाणे, गांधीनगर आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. घटनेचं गांभीर्य ओळखत गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पसार झालेल्या संशयित आरोपी सतिश यादव याचा शोध पोलिसांनी सुरू केलाय, अशी माहिती गांधीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिली.

हेही वाचा :

  1. पॅरोलवर असलेल्या प्रियकराची 'लिव्ह इन रिलेशन'मध्ये असणाऱ्या प्रेयसीसोबत आत्महत्या
  2. लिव्ह इन पार्टनरची हत्या करून दिली हरविल्याची तक्रार, पोलिसांनी गुन्ह्याचा 'असा' लावला छडा
  3. लिव्ह इन पार्टनरचा खून करुन तरुणानं स्वतःचा चिरला गळा : आठ वर्षापासून होते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये

Last Updated : June 4, 2025 at 2:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.