ETV Bharat / state

कोपरगाव डेपोच्या ताफ्यात नवीन एसटी बस; 'या' मार्गावर धावणार, 'ईटीव्ही'च्या बातमीची एसटी प्रशासनाकडून दखल - KOPARGAON DEPOT NEW ST BUS

कोपरगाव डेपोला पाच नवीन एसटी बस मिळाल्या आहेत. या बस पुणे, गाणगापूर मार्गावर चालवल्या जाणार आहेत.

Kopargaon depot New ST Bus
कोपरगाव डेपोच्या ताफ्यात नवीन एसटी बस (ETV Bharat GFX)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 19, 2025 at 5:49 PM IST

2 Min Read

अहिल्यानगर (शिर्डी) : सर्वसामान्यांची जीवनवाहिनी म्हणून लालपरीकडं बघितलं जातं. लाखो नागरिक लालपरीतून रोज प्रवास करत असतात. काळानुसार एसटीतही अनेक बदल करण्यात आले. विविध प्रकारच्या नवनवीन गाड्या एसटीच्या ताफ्यात दाखल होत असतात. मात्र, तरीही अशा जुन्या अनेक एसटी गाड्या आहेत ज्या आजही मार्गावर चालवल्या जातात व त्या मार्गातच बंद पडत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशातच कोपरगाव डेपोची शिर्डी - हैदराबाद एसटी बस मार्गातच अनेकवेळा बंद पडल्याचे प्रकार घडले होते. याबाबतचे वृत्त 'ईटीव्ही भारत'नं प्रसिद्ध केलं होतं. याची गंभीर दखल खुद्द परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली होती.

कोपरगाव डेपोच्या ताफ्यात पाच नवीन बस : 'ईटीव्ही भारत'च्या बातमीनंतर अखेर आता कोपरगाव डेपोला पाच नवीन एसटी बस मिळाल्या आहेत. तसं आश्वासनही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलं होतं. शिर्डी - हैदराबाद एसटी मार्गातच बंद पडल्याची बातमी दाखवल्यानंतर एसटी प्रशासनानं गंभीर दखल घेत कोपरगाव डेपोला नवीन बस देण्याच्या हालचालींना गती दिली होती. अखेर आता पाच नवीन एसटी बस कोपरगाव डेपोच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत.

नवीन स्लीपर एसटी बसची बांधणी बंद? : लांब पल्ल्याच्या मार्गावर स्लीपस बस प्रवाशांसाठी आरामदायी असतात. नवीन आलेल्या बस ह्या सीटर पूश बॅक सीटच्या आहेत. त्यामुळं या पाच बस सध्यातरी पुणे आणि गाणगापूर या मार्गावर चालवल्या जाणार असल्याची माहिती कोपरगाव डेपो मॅनेजर अमोल बनकर यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली. तसंच शिर्डी - हैदराबाद ही स्लीपर एसटी सुरळित सुरू असल्याचंही बनकर यांनी सांगितलं. दरम्यान, लांब पल्ल्याच्या मार्गासाठी स्लीपर एसटी बस असणं गरजेचं आहे. मात्र, नवीन स्लीपर एसटीची बांधणी बंद करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

'ई टीव्ही भारत'च्या बातमीची दखल : शिर्डी - हैदराबाद स्लीपर एसटी अनेकदा मार्गातच बंद पडल्याचे प्रकार घडले होते. ही जुनी बस असून याचे पार्ट देखील लवकर मिळत नसल्याची माहिती काही चालकांनी दिली होती. याबाबतचे वृत्त 'ईटीव्ही भारत'नं प्रसिद्ध केलं होतं. या प्रकारावर योग्य ती कार्यवाही करुन डेपोला नवीन बस देण्याचं आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलं होतं. तसंच एसटीचे मुख्य जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनीही याबाबत कार्यवाही करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार आता कोपरगाव डेपोला पाच नवीन बस मिळाल्या आहेत.

शिर्डी - हैदराबाद एसटीला चांगला प्रतिसाद : कोपरगाव डेपोची शिर्डी ते हैदराबाद ही स्लीपर बस सायंकाळी साडेचार वाजता कोपरगाववरुन निघते पुढे शिर्डी, अहिल्यानगर, आष्टी, जामखेड, धाराशिव, तुळजापूर मार्गे पुढे हैदराबादच्या MGBS स्टँडला दुसऱया दिवशी सकाळी आठ ते नऊच्या दरम्यान पोहचते. ही बस पुन्हा सायंकाळी सहा वाजता हैदराबादच्या स्टँडवरुन निघते व दुसऱया दिवशी सकाळी नऊच्या दरम्यान कोपरगावला पोहचते. महिला, वृद्धांसाठी एसटी महामंडळानं आणलेल्या विविध योजनांमुळं या एसटीला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसंच शिर्डी देवस्थानामुळं भाविकही या बसचा वापर मोठ्या प्रमाणात करत असतात.

'ईटीव्ही भारत'ची संबंधित बातमी :

डबघाईला आलेल्या एसटी बस चालवल्या जातात शिर्डी-हैदराबाद मार्गावर, कोपरगाव डेपोचा हलगर्जीपणा, लालपरीला कधी येणार अच्छे दिन?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.