ETV Bharat / state

महिला डॉक्टरांशी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी KEM मधील डॉक्टर निलंबित, पोलिसांत तक्रार दाखल - CRIME NEWS

याप्रकरणी केईएम रुग्णालयाच्या डीन डॉ. संगीता रावत यांनी डॉ. देवकर यांना निलंबित केले आहे.

KEM Hospital
केईएम रुग्णालय (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 19, 2025 at 8:22 PM IST

1 Min Read

मुंबई : केईएम रुग्णालयातील फॉरेन्सिक मेडिसिन अ‍ॅण्ड टॉक्सिकोलॉजी विभागात असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉ. रविंद्र देवकर यांच्यावर महिला डॉक्टरांनी अश्लील वर्तन, मानसिक त्रास व शारीरिक गैरवर्तणुकीचे आरोप केले आहेत. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणाची गंभीर दाखल घेत वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालय संचालकांकडून त्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच त्यांना महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कार्यरत राहण्यापासून मनाई करण्यात आली आहे.

भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार : याबाबत केईएम रुग्णालयातील महिला डॉक्टरांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत महिला डॉक्टरांनी २०२२ पासून आतापर्यंत डॉ. देवकर यांनी विविध महिला सहकाऱ्यांशी अश्लील शब्द वापरणे, शरीराला हात लावणे, सेल्फीच्या नावाखाली जबरदस्तीने स्पर्श करणे अशा प्रकारचे वर्तन केले असल्याचे नमूद केले आहे. तसेच, हे वर्तन केईएम रुग्णालयाच्या आवारात व बाहेर देखील सुरु होते, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याचबरोबर, काही प्रसंगी डॉ. देवकर यांनी महिला डॉक्टरांना त्यांच्या केबिनमध्ये बोलवून पाठीवर हात फिरवणे, तर एका प्रकरणात त्यांनी महिला डॉक्टरला दुचाकीवरून चला, असे बोलले, असे तक्रारीत आरोप आहेत.

याप्रकरणी डॉ. देवकर यांना निलंबित केलंय : दरम्यान, ही माहिती मिळाल्यानंतर काही महिला डॉक्टरांनी एकत्र येऊन ही बाब वरिष्ठांना सांगितली. त्यानंतर विभागप्रमुख डॉ. हरीश पाठक आणि डीन डॉ. संगीता रावत यांना लेखी तक्रार देण्यात आली. तक्रारकर्त्या महिला डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, डॉ. देवकर यांचे वर्तन केवळ एकट्याच व्यक्तीशी मर्यादित नसून, विविध महिला सहकाऱ्यांनी त्यांच्याविषयी अशाच प्रकारचे अनुभव त्यांना सांगितले आहे. यानंतर याप्रकरणी केईएम रुग्णालयाच्या डीन डॉ. संगीता रावत यांनी डॉ. देवकर यांना निलंबित केले आहे. तसेच, हे प्रकरण सावित्रीबाई फुले महिला कर्मचारी संरक्षण समितीकडे सोपवले आहे. त्याबाबत सावित्रीबाई फुले महिला कर्मचारी संरक्षण समिती आणि पोलिसांमार्फत चौकशी सुरू आहे, असे डीन डॉ. संगीता रावत यांनी सांगितले.

हेही वाचा :

"आमच्यातले वाद, भांडण छोटी", राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंना युतीसाठी पुन्हा टाळी ?

महायुतीत अजित पवारांचं वजन वाढल्यानं एकनाथ शिंदे नाराज? पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीतील 'इनकमिंग' वाढलं!

'औरंगजेबानं नागरिकांवर अत्याचार केले, मात्र काही लोक त्याला नायक मानतात': राजनाथ सिंहांचा हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.