ETV Bharat / state

काँग्रेसनगर अमरावतीचं भूषण ; माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्यासह भावी सरन्यायाधीशांचं याच भागात आहे घर - JUSTICE BHUSHAN GAVAI NEWS

देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभा पाटील ते आगामी सरन्यायाधीश भूषण गवई हे अमरावतीमधील आहेत. विशेष म्हणजे शहरामधील काँग्रेसनगरमधील एकाच भागात त्यांची घरे आहेत.

Justice Bhushan Gavai news
काँग्रेसनगर अमरावतीचं भूषण (Source- ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 15, 2025 at 8:31 PM IST

Updated : April 16, 2025 at 1:26 PM IST

3 Min Read

अमरावती- विदर्भाची सांस्कृतिक नगरी अशी ओळख असणारं अमरावती शहर हे देशाच्या राजकारणातही महत्त्वाचं केंद्र बिंदू राहिलंय. विशेष म्हणजे अमरावती शहरातील काँग्रेस नगर या परिसरात वास्तव्य असणाऱ्या प्रतिभा पाटील या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या. तर त्यांच्या घराजवळ मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश प्रवीण पाटील यांचं निवासस्थान आहे. तिथून पुढे दहावं घर हे केरळ आणि बिहारचे माजी राज्यपाल रा. सू. गवई यांचं निवासस्थान आहे. विशेष म्हणजे देशाचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून भविष्यात जबाबदारी स्वीकारणारे न्या. भूषण गवई हेदेखील काँग्रेस नगरचेचं आहेत. एकूणच राष्ट्रीय पातळीवर ओळख निर्माण केलेले अमरावतीकर मंडळी ही काँग्रेस नगरची रहिवासी आहे. काँग्रेस नगर हे अमरावती शहराचं भूषणच अशी आता या परिसराची ओळख निर्माण झाली.

प्रतिभा पाटील राष्ट्रपती होताच काँग्रेसनगर चर्चेत- प्रतिभा पाटील यांनी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघाचं 1967 ते 1985 पर्यंत प्रतिनिधित्व केल्यावर 1985 त्या राज्यसभेवर निवडून गेल्या होत्या. 1991 मध्ये अमरावती लोकसभा मतदार संघातून त्या विजयी झाल्या होत्या. प्रतिभा पाटील यांच्या 1991 च्या विजयपासून काँग्रेस नगर हे चर्चेत आलं. विशेष म्हणजे अमरावतीच्या राजकारणात काँग्रेस नगरचं महत्व वाढलं. तेव्हापासून आजपर्यंत अनेक चांगल्या घटना, घडामोडीनासाठी काँग्रेसनगर हे चर्चेत राहिलं.

काँग्रेसनगर अमरावतीचं भूषण (Source- ETV Bharat Reporter)

अमरावतीचे पहिले महापौर काँग्रेसनगरचे- अमरावती महापालिकेची स्थापना 1983 मध्ये स्थापना झाली. महापालिकेची पहिले निवडणूक 1992 मध्ये झाली. त्यावेळी प्रतिभा पाटील यांचे यजमान दिवंगत प्रा. डॉ. देवीसिंह शेखावत हे अमरावतीचे पहिले महापौर म्हणून निवडून आले. 2009 मध्ये झालेल्या विधानाभा निवडणुकीत प्रतिभा पाटील यांचे पुत्र रावसाहेब शेखावत हे अमरावती विधानसभा मतदार संघातून निवडून आले.

रिपब्लिकन विचारांचा केंद्रबिंदू- काँग्रेसनगरमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवईचे प्रमुख रा. सू. गवई यांचे निवासस्थान काँग्रेस नगरमध्येच आहे. त्यामुळं रिपब्लिक विचारांचं अनेकवर्ष काँग्रेसनगर हे केंद्रबिंदू राहिलं आहे. रा. सू.गवई हे महाराष्ट्र विधानपरिषदेचे 1964 ते 1994 अशी सलग 30 वर्ष सदस्य होते. 1998 मध्ये लोकसभा निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघात ते विजयी झाले. 3 एप्रिल 2000 ते 2 एप्रिल 2006 दरम्यान ते राज्यसभा सदस्य होते. पुढे 2006 मध्ये सिक्कीमचे राज्यपाल झाले. पुढे 2006 ते 2008 दरम्यान बिहारचे राज्यपाल आणि 11 जुलै 2008 ते 7 सप्टेंबर 2011 दरम्यान ते केरळचे राज्यपाल होते.

विधानपरिषदेचे माजी उपाध्यक्ष काँग्रेसनगरचे- 28 मार्च 1991 ते 15 जुलै 1999 या काळात महाराष्ट्र विधान परिषद उपाध्यक्ष अंतर शरद तसरे हेदेखील अमरावतीच्या काँग्रेस नगरचे रहिवासी आहे. प्रतिभा पाटील आणि रा. सू. गवई यांचं घर एकच रांगेत आहे. तर शरद तसरे यांचं घर प्रतिभा पाटील यांच्या घरच्या मागच्या बाजूला असणाऱ्या रांगेत आहे. शरद तसरे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात आहेत.

  • उच्च न्यायालयाचे न्यायाधीश काँग्रेसनगरचे- डिसेंबर 2024 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदी नियुक्त झालेले अधिवक्ता प्रवीण पाटील यांचं घरही काँग्रेसनगरमध्ये आहे. त्यांचे घर प्रतिभा पाटील यांच्या घराजवळच आहे.

न्या. भूषण गवईंमुळे पुन्हा काँग्रेसनगर चर्चेत- भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे 52 वे सरन्यायाधीश म्हणून 14 मे 2025 पासून काम पाहणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांना राष्ट्रपती भवनात सरन्यायाधीश पदाची शपथ देतील. न्यायमूर्ती भूषण गवई यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 ला अमरावतीत झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण अमरावतीत झालं. पुढे माध्यमिक, महाविद्यालयीन आणि कायद्याचं शिक्षण त्यांनी मुंबईत घेतलं. माजी न्यायाधीश राजा भोसले यांच्यासोबत त्यांनी 1987 ते 1990 दरम्यान मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली. 1992 ते 1993 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सहायक सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 17 जानेवारी 2000 ला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात सरकारी वकील म्हणून त्यांची निवड झाली. 14 नोव्हेंबर 2003 रोजी उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांना पदोन्नती मिळाली. 12 नोव्हेंबर 2005 ला न्यायमूर्ती भूषण गवई हे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झालेत. नागपूर, छत्रपती संभाजी नगर आणि पणजी याठिकाणी त्यांनी उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून न्यायदानाचं काम केलं. 24 मे 2019 त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून भूषण गवई यांची नियुक्ती झाली. 14 मे रोजी अमरावतीच्या काँग्रेसनगरचे सुपुत्र देशाच्या सरन्यायाधीश पदी रुजू होणार असल्यानं काँग्रेसनगर पुन्हा चर्चेत आलं. सध्या काँग्रेसनगर येथील प्रत्येक घरात न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या सरन्यायाधीश पदी झालेल्या निवडीचा आनंद व्यक्त केला जातोय.

हेही वाचा-

Last Updated : April 16, 2025 at 1:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.