ETV Bharat / state

सागरी सीमांचे संरक्षण अधिक भक्कम; आयएनएस सुरतवरून क्षेपणास्त्र विनाशकाची यशस्वी चाचणी - INS SURAT TESTS MISSILE

भारतीय नौदलानं स्वदेशी क्षेपणास्त्र विनाशकाची यशस्वी चाचणी पूर्ण केली. आयएनएस सुरतने ही चाचणी यशस्वीरित्या पार पाडली.

INS SURAT TESTS MISSILE
स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्र विनाशकाची सुरत युद्धनौकेवरून यशस्वी चाचणी (Indian Navy X Account)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : April 24, 2025 at 8:36 PM IST

2 Min Read

मुंबई : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम इथं झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्यानंतर भारतभर चिंता आणि संतापाचं वातावरण आहे. भारत सरकारकडून पाकिस्तानवर अनेक कडक निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर आज भारतीय नौदलाकडून स्वदेशी बनावटीचे क्षेपणास्त्र विनाशकाची आयएनएस सुरत युद्धनौकेवरून यशस्वी चाचणी करण्यात आली. यातून भारतीय सागरी सीमांचे संरक्षण करण्यास भारतीय नौदल सज्ज असल्याचा दिलासा मिळत आहे.

हल्ल्याविरोधात रक्षणासाठी सज्ज : समुद्राच्या पाण्यावर कमी उंचीवरून मारा करणारे क्षेपणास्त्र हवेतच नष्ट करण्यासंबंधीची चाचणी आज आयएनएस सुरत युद्धनौकेवरून घेण्यात आली आहे. समुद्रालगत पाण्यापासून कमी उंचीवरून येणारे क्षेपणास्त्र लवकर शोधता येणे अवघड असते. त्या क्षेपणास्त्राचे अस्तित्व ते एका विशिष्ट अंतरावर आल्यानंतरच कळते. मात्र, आज झालेल्या यशस्वी चाचणीमुळे हा अवघड टप्पा भारतीय नौदलाने यशस्वीरित्या पार केल्याचे संरक्षण सूत्रांनी सांगितले.

हवाई सुरक्षा देण्यास आयएनएस सुरत सक्षम : आयएनएस सुरत ही भारतीय नौदलाची अतिशय अद्ययावत युद्धनौका आहे. देशाला हवाई सुरक्षा देण्यास आयएनएस सुरत सक्षम आहे. या युद्धनौकेमुळे शत्रूनं डागलेले क्षेपणास्त्र सीमेपासून काही किलोमीटर अंतरावर हवेतच नष्ट करता येणार आहे. आयएनएस सुरत हे 15B वर्गाच्या गाईडेड मिसाईल डिस्ट्रॉयर प्रकल्पाचं चौथे आणि अंतिम जहाज आहे. हे जगातील सर्वात मोठ्या आणि सर्वात अत्याधुनिक विनाशकांपैकी एक आहे. यात 75 टक्के स्वदेशी सामग्री आहे. ही युद्धनौका अत्याधुनिक शस्त्रे, सेन्सर पॅकेजेस आणि प्रगत नेटवर्क-केंद्रित क्षमतांनी सुसज्ज आहे.

दहशतवाद्यांचे कंबरडं मोडल्याशिवाय राहणार नाही : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात संतापाची लाट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये बोलताना पाकिस्तानला कडक शब्दात इशारा दिलाय. "मी अगदी स्पष्ट शब्दात सांगू इच्छितो की, या दहशतवाद्यांना आणि या हल्ल्याचा कट रचणाऱ्यांना त्यांच्या कल्पनेपेक्षा मोठी शिक्षा मिळेल, त्यांना सोडलं जाणार नाही. आता दहशतवाद्यांचे उरले सुरले मैदान नष्ट करण्याची वेळ आली आहे. 140 कोटी भारतीयांची इच्छाशक्ती आता दहशतवाद्यांचे कंबरडं मोडल्याशिवाय राहणार नाही", असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिला आहे.

भारतीय नौदलाने व्हिडिओ शेअर केला : भारतीय नौदलाने आयएनएस सुरतच्या यशस्वी चाचणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यावेळी भारतीय नौदलानं कॅप्शनमध्ये लिहिलं की, "हा मैलाचा दगड भारतीय नौदलाच्या देशाच्या सागरी हितांचं रक्षण करण्याच्या अढळ वचनबद्धतेचं आणि स्वावलंबी भारताप्रती असलेल्या समर्पणाचं प्रतीक आहे. भारतीय लष्कराच्या नवीनतम स्वदेशी मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशक आयएनएस सुरतनं समुद्रात अचूकतेनं लक्ष्य साधलं, जे आपल्या संरक्षण क्षमता मजबूत करण्यात आणखी एक मैलाचा दगड ठरले."

हेही वाचा :

  1. भारताचा कठोर पवित्रा पाहून पाकिस्तानमध्ये धास्ती, भारतीय विमान कंपन्यांना हवाई क्षेत्र वापरण्यास केली मनाई
  2. माझ्या समोरच माझ्या वडिलांना तीन गोळ्या मारल्या...; आसावरी जगदाळेंनी सांगितली हृदय पिळवटून टाकणारी घटना
  3. दहशतवाद्यांनी बाबा, काका आणि मामा यांना डोळ्यांसमोर मारलं-मुलीनं सांगितली हल्ल्याची आपबिती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.