मुंबई : महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील हिरकणीची गोष्ट प्रसिद्ध आहे. या गोष्टीतून आपल्या बाळा बाबतची ओढ दिसू नये. राणी लक्ष्मीबाई हे त्यापैकीच एक उदाहरण. अशा अनेक माता भारतीय लष्करात आपली कर्तव्य बजावत आहेत. 'घार उडते आकाशी पण चित्त तिचे पिल्लापाशी' या मराठीतील ओळीप्रमाणे देशाचं रक्षण करणाऱ्या रणरागिणींची अवस्था देखील काहीशी अशीच असते. आज आम्ही तुम्हाला गोष्ट सांगणार आहोत ती एका आईची आणि तिच्या मुलाची, सैन्यदलातील एका अधिकारी मामीची आणि तिच्या भाच्याची.
मुंबई त्रिशक्ती महिला खलाशी मोहीम पूर्ण : पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेले ऑपरेशन सिंदूर जगभरात चर्चेचा विषय ठरले. या ऑपरेशननंतर कर्नल सोफिया सुरेश आणि विंग कमांडर व्योमिका सिंग संपूर्ण देशाच्या गळ्यातील ताईत बनल्या. संपूर्ण देशात या दोन महिला अधिकाऱ्यांचे बॅनर लागले. भारतीय सैन्याची या महिला अधिकाऱ्यांचा देशभरात गौरव सुरू असतानाच तीनही सैन्यदलाच्या महिला अधिकाऱ्यांनी एक नवा विक्रम करत देशाची मान उंचावली आहे. तीनही सैन्यदलाच्या एकूण 11 महिला अधिकाऱ्यांनी मुंबई-सेशेल्स-मुंबई त्रिशक्ती महिला खलाशी मोहीम पूर्ण केली आहे. या 11 महिलांचा सत्कार आज मुंबईत करण्यात आला.
भाच्याला पाहून मामीचे पाणावले डोळे : या ऑपरेशनच्या लीडर होत्या कॅप्टन डॉली बुटोला. सैन्याचे वरिष्ठ अधिकारी कॅप्टन डॉली यांचा सत्कार करत असतानाच पुढे बसलेल्या उपस्थितांमधून एक आवाज आला 'मामी...' हा आवाज इतर कोणाचा नसून कॅप्टन डॉली यांच्या भाच्याचा होता. तब्बल 55 दिवसानंतर आपल्या भाच्याला भेटल्यानंतर कॅप्टन डॉली यांचा उर भरून आला होता. सोहळा संपल्यानंतर त्यांनी आपल्या भाच्याला कडकडून मिठी मारली.
समुद्राने आम्हाला खूप काही शिकवले : या मोहिमेबाबत 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधताना कॅप्टन डॉली यांनी सांगितलं की, "ही मोहीम मुंबई-सेशेल्स-मुंबई अशी होती. याचे एकूण अंतर 3 हजार 600 नॉटिकल माईल इतके आहे. हे अंतर आम्ही 55 दिवसात पार केलं. यात भारतीय सैन्याच्या आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्स या तीनही दलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता. या 55 दिवसात समुद्राने आम्हाला खूप काही शिकवलं. आम्ही समुद्राच्या उंच लाटांचा सामना केला, बदलत्या हवामानाचा सामना केला, आम्ही एका वादळात अडकण्यापासून थोडक्यात बचावलो. या मोहिमेदरम्यान समुद्राने आम्हाला खूप काही शिकवले. जेव्हा आपण खूप काहीतरी मोठं केलं असा आपल्याला वाटायला लागतं तेव्हा हा समुद्र आपल्यासमोर एक नवं आव्हान आणून ठेवतो. तेव्हा आपल्याला कळतं आपण आतापर्यंत ज्या संकटांचा सामना केला आहे तो काहीच नाहीत. याहून आणखी मोठ्या संकटांना आपल्याला तोंड द्यायचं आहे याची जाणीव होते."
आठवड्यातून दोन दिवस कुटुंबीयांशी संवाद : पुढे बोलताना कॅप्टन डॉली यांनी सांगितलं की, "या मोहिमेदरम्यान कुटुंबीयांशी संवाद करण्यासाठी आठवड्यातून केवळ दोनच दिवस मिळायचे. या दोन दिवसात ठराविक कालावधीत कुटुंबीयांची संवाद साधण्याची परवानगी होती. आमच्या जहाजातील इमर्जन्सी कॉन्टॅक्ट सर्विसमधून आम्ही घरच्यांची संवाद साधायचो. ही सर्विस केवळ रिपोर्टिंगसाठी वापरली जाते. ज्यावेळी घरच्यांशी बोलणं व्हायचं त्यावेळी आम्ही केवळ आम्ही सध्या कुठे आहोत आणि कोणत्या स्थितीत आहोत याची माहिती द्यायचो. आता पुन्हा जमिनीवर आल्यानंतर घरच्यांना भेटले, माझ्या भाच्याला भेटले मला आनंद आहे."
सासू- सासरे यांचे डोळे पाणावले : कॅप्टन डॉली यांचे पती देखील सैन्य दलात असून, ते कर्तव्यावर असल्यानं या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. कॅप्टन डॉली यांचे आई-वडील देहरादूनला असतात. तर त्यांचे सासू-सासरे देखील एका कार्यक्रमादरम्यान व्यस्त असल्यानं या कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. या कार्यक्रमाला कॅप्टन डॉली यांच्या पतीचे मामा आणि मामी म्हणजेच कॅप्टन ट्रॉली यांचे मामे सासू आणि सासरे आले होते. आपल्या सुनेने पूर्ण केलेली मोहीम पासून त्यांचे सासरे मनोज वाघ आणि त्यांच्या सासूचे डोळे पाणावले होते.
हेही वाचा -