अमरावती: आयकर चोरीच्या संशयावरून आज नागपूर इथल्या आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अमरावतीसह अकोला आणि परतवाडा येथील प्रसिद्ध 'ज्वेलर्स' दुकानांवर छापेमारी केली आहे. सकाळपासून सुरू झालेली ही कारवाई संपूर्ण दिवसभर सुरू आहे. तर अजूनही काही ठिकाणी ती सुरू असल्याचं सूत्रांकडून समजतंय. या तीनही ठिकाणच्या दुकानांचे मालक एकच असून, मोठ्या प्रमाणावर रोख व्यवहार आणि बेहिशोबी संपत्तीबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर ही कारवाई करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र, या धाडीमागील नेमकं करण काय? आणि यामध्ये काय घबाड बाहेर येईल? हे तपासणीनंतर कळू शकणार आहे.
सराफा वर्तुळात खळबळ : आयकर विभागाच्या एकूण ५ ते ६ पथकांनी संयुक्तपणे ही धाड टाकली. धाडीत महत्त्वाचे कागदपत्रे, संगणकीय रेकॉर्ड्स, हिरे आणि सोन्याचे साठे मोठ्या प्रमाणातील रोकड जप्त केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यासंबंधी आयकर विभागाकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. स्थानिक नागरिकांमध्ये या कारवाईमुळं खळबळ उडाली आहे.
पुढील काही दिवस कारवाई सुरू राहणार : अमरावती, अकोला, परतवाडा येथील सराफा दुकानावर आयकर विभागाच्या धाडी पडल्यानंतर शहरातील सराफा दुकान पूर्णपणे बंद ठेवण्यात आले आहे. या कारवाईमुळं इतर अनेक दुकानदारांनी आपले व्यवहार तातडीने बंद केले आहे. ही कारवाई पुढील काही दिवस सुरू राहण्याची शक्यता आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच प्रत्यक्ष गैरव्यवहाराचे स्वरूप स्पष्ट होईल, असे आयकर विभागाच्या सूत्रांनी सांगितलं.
हेही वाचा -
- Income Tax Raid Nashik: नाशिकमध्ये सातहून अधिक बांधकाम व्यवसायिकांवर आयकर विभागाची छापेमारी; 3 हजार 333 कोटींचा बेहिशेबी व्यवहार उघड
- IT Raids Pune: पुण्यातील निळकंठ ज्वेलर्सवर आयकर विभागाची धाड; 40 वाहनांमधून अधिकाऱ्यांचा फौजफाटा दाखल
- छत्रपती संभाजीनगरात एकाच वेळी 11 ठिकाणी आयकर विभागाची छापेमारी, व्यावसायिकांमध्ये खळबळ