छत्रपती संभाजीनगर : मनसे नेते प्रकाश महाजन आणि भाजपा नेते नारायणे राणे यांच्यासह त्यांच्या मुलांमधील वाद चांगलाच चिघळला आहे. राणे समर्थकांनी धमकी देताच मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला. यावेळी, "राणे यांना काय अडचण आहे, त्यांनी सांगावं. मी एक म्हण आहे, ती फक्त वापरली. अशा म्हणी अनेक वेळा वापरल्या जातात. त्यांनी साहेबांच्या बाबतीत वक्तव्य करू नये, आम्ही शांत राहू, अन्यथा जशाच तसे उत्तर देऊ," असा इशारा प्रकाश महाजन यांनी दिला. तसंच, कणकवली येथे यायचं असल्यास सांगा तिथं पण यायला तयार असल्याची टीका त्यांनी केली. दरम्यान, क्रांतीचौकात मनसे कार्यकर्त्यांनी राणे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
राणे यांच्याबाबत केलं होत वक्तव्य : नारायण राणे आणि त्यांचे पुत्र नितेश राणे व निलेश राणे यांची वक्तव्यं नेहमीच चर्चेची ठरतात. त्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी एका खाजगी वृत्तवाहिनीवर नारायण राणे आणि त्यांच्या मुलांवर टीका केली होती. मराठी म्हण वापरत केलेलं वक्तव्य राणे समर्थकांना चांगलेच जिव्हारी लागले. एका कार्यकर्त्यानं कणकवली येथून प्रकाश महाजन यांना "घरात बसून काय बोलता, हिंमत असेल तर बाहेर या" अशी धमकी दिली. यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं.
बोलावलं तर कणकवली येथे येतो..: राणे समर्थकानं धमकी दिल्यावर प्रकाश महाजन यांनी डोक्याला रुमाल बांधून दंड थोपटून आव्हानाला उत्तर दिलं. क्रांतीचौक भागात मनसे कार्यकर्त्यांसह त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अभिवादन केलं. यावेळी राणे कुटुंबीयांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. "राणे यांनी निवडणुकीत आवर्जून प्रचाराला बोलावलं होतं. त्यावेळी आपण जाऊन प्रचार केला होता, हे ते विसरले आहेत. आमच्या साहेबांच्या बाबतीत तुम्ही वक्तव्य केल्यास आम्हीही बोलणारच. तुम्ही काही बोलू नका, आम्हीही काही बोलणार नाही. धमकी मिळाली असून पोलिसांची त्याबाबत बोलणार आहोत. याशिवाय मुख्यमंत्र्यांना देखील याबाबत सांगू, " असं प्रकाश महाजन यांनी स्पष्ट केलं. तसंच, त्यांनी बोलावलं तर कणकवली येथे पण जाऊ असा इशारा यावेळी त्यांनी दिला.
हेही वाचा :