ETV Bharat / state

"मला अफजलखान म्हणतात, मग मोदी शाह यांना चंगेज खान म्हणायचं का?" - माजी आमदार अनिल गोटे

माजी आमदार अनिल भोटे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.

ANIL GOTE ON PM MODI
प्रतिक्रिया देताना माजी आमदार अनिल गोटे (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : June 11, 2025 at 8:36 PM IST

|

Updated : June 11, 2025 at 8:49 PM IST

2 Min Read
Choose ETV Bharat

धुळे : "धर्माच्या नावाखाली नवी पिढी आपले काळे धंदे बिनदिक्कतपणे चालवत आहेत. एखाद्या धर्माची अफूची नशा चढवली की अंधभक्त चेकाळून आपल्या कुठल्याही कृतीला धर्माचा मुलामा चढवून जनतेच्या गळी उतरवतात. नवीन पिढी कोणत्या पात्रतेची आहे याचा एक व्हिडिओ मी माझ्या व्हॉट्सअपवर टाकला आहे. मला अफजल खानाची उपमा देऊन आपण काय साध्य करणार आहात," असं माजी आमदार अनिल गोटे म्हणाले.

मला अफजलखान म्हणतात, मग 'ते' चंगेजखान का? : "भाजपाच्या नेतृत्वानं मला अफजल खान म्हटलं. पण गेल्या अकरा वर्षात विश्वगुरू म्हणवून घेणारे नरेंद्र मोदी, भाजपाचे एक छत्रीय मालक यांनी देशातील 446 मंदिरे आणि वाराणसीत 286 मंदिरे पाडली आहेत. पाच हजार वर्ष जुनं भारत माता मंदिर सुद्धा यांनी सोडलं नाही. अन्य असंख्य मंदिरे ही हजारो वर्षांपूर्वीची होती. पण याचा किंचितही विचार न करता त्यांनी मंदिरे पाडली. अहमदाबादमध्ये शेकडो वर्षांपासून असलेली 80 मंदिरे जमीनदोस्त केली. भगवान श्रीकृष्णाची जन्मभूमी असलेल्या वृंदावनमध्ये 50 मंदिरे पाडण्याच्या खुणा मंदिरावर केल्या आहेत. प्रभू रामचंद्राचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येमधील 30 मंदिरे, 2200 दुकानं, 800 घरे जमीनदोस्त केली आहेत. वृंदावनमध्ये 100 दुकाने आणि 300हून अधिक घरांवर बुलडोझर चालविण्याची तयारी पूर्ण झाली आहे. शेकडो वर्षापासून वास्तव्य करणाऱ्या हिंदूंची घरे पाडून त्यांना जगणे सुद्धा अशक्य करून टाकले आहे. हे तर चंगेचखानाला सुद्धा लाजवणारे कृत्य आहे. एक हजार अफजलखान मरतील त्यावेळेस एक चंगेजखान पैदा होईल असं म्हणतात. हिंदूंवर अत्यंत निर्घृण अत्याचार करणाऱ्या तसंच इतिहासात ज्याची नोंद क्रूरकर्मा म्हणून असलेल्या चंगेजखानानं पण शरमेनं मान खाली घातली असेल. तुम्ही अफजलखान म्हटल्यानं मी अफजलखान होत नाही. तुमच्या बारा पिढ्यांना शक्य होणार नाही अशी भगवान शंकराची तब्बल 18 टन वजनाची, 23 फूट उंचीची भगवान शंकराची मूर्ती उभी केली. ती राजकीय अंधभक्तांना दिसेल कशी?" असं म्हणत माजी आमदार अनिल गोटे यांनी जोरदार टीका केली.

प्रतिक्रिया देताना माजी आमदार अनिल गोटे (ETV Bharat Reporter)

मोदी आणि शाह यांना काय म्हणणार? : "मी स्वार्थासाठी किंवा व्यक्तिगत लाभ मिळावा म्हणून कुठलीही कारवाई केली नाही आणि करणार नाही. संजय वाल्हे यांनी शिवतीर्थाबद्दलचा दाखल केलेल्या दाव्याचा मी कधीही निषेध केला नाही. भविष्यात असा प्रसंग तुमच्यावर उद्भवता कामा नये. यासाठी आणि धुळेकर जनतेच्या हितासाठील मी नियमानुसार कायद्याच्या चौकटीत आणि माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करून हा दावा दाखल केला आहे. 'सटवाईला नाही नवरा आणि म्हसोबाला नाही बायको' अशी अवस्था आमदाराची झाली आहे. आमदारकीची नशा डोक्यात शिरली आहे. मंदिरासोबत माझ्या कारकिर्दीत प्रार्थना स्थळांचे अतिक्रमण केवळ वाहतूक सुरळीत होण्याकरिता दूर करणारा मी जर अफजलखान आहे. तर 446 मंदिरे 1100 घरे आणि 2300 दुकाने पाडणाऱ्या मोदी आणि शाह यांना आता तुम्ही चंगेजखान म्हणणार का? माझा सवाल आहे की फक्त तुम्ही मोदी, शाहांना काय उपमा देणार आहात? अफजल खान? की चंगेज खान?" असं माजी आमदार अनिल गोटे म्हणाले.

हेही वाचा :

  1. "...तर मी स्वतः पोलीस महासंचालकांच्या कार्यालयात शिरणार", बच्चू कडू यांचा इशारा
  2. जळगावच्या 'सुवर्णनगरी'त चांदीच्या दरात विक्रमी वाढ, दहा दिवसांत दहा हजारांची उसळी
  3. T-20 मुंबई लीग नवख्या खेळाडूंसाठी उत्तम व्यासपीठ, स्पर्धेनं दिले अनेक स्टार; एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक काय म्हणाले?
Last Updated : June 11, 2025 at 8:49 PM IST