मुंबई : "तुरुंगानं लेखक, कवी, राजकारणी यांच्या आयुष्यात काय बदल आणले माहीत आहे ? किती तरी महान पुस्तकं, कविता तुरुंगात लिहिली गेली," असं प्रतिपादन ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी परळ इथल्या रवींद्र नाट्य मंदिरात केलं. नरकातला स्वर्ग या संजय राऊत यांच्या पुस्तक प्रकाशनावेळी जावेद अख्तर अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. यावेळी त्यांनी "पाकिस्तानात जाण्यापेक्षा मी नरकात जाईन," असं स्पष्ट करुन कट्टरवाद्यांवर मोठा हल्लाबोल केला. "संजय राऊत यांना पेन आत नेऊ नाही दिले, असं सांगत लेखणी खूप मोठं आयुध आहे, हे खरं आहे. कारण त्यामुळे झालेली जखम भरत नाही," हे नक्की अशी कोपरखळी मारली.
संजय राऊत निर्भीड विरोधी पक्षनेते आहेत : "मी काही वर्षापूर्वी त्यावेळच्या राजकीय परिस्थितीवर एक लेख लिहिला होता. तो लेख छापण्याचं धाडस संजय राऊत यांनी दाखवलं. संजय राऊत हे एक निर्भीड विरोधी पक्षनेते आहेत. विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात नाही घातलं पाहिजे. कारण तिथं जाऊन त्यांना विचार करायचा वेळ मिळतो. त्यांना सरकारनं बाहेरच बिझी ठेवलं पाहिजे," असं जावेद अख्तर यांनी म्हणताच सभागृहात खसखस पिकली. पाकिस्तान किंवा नरक हा पर्याय असेल तर नरकात जाणे पसंत करेन. मी नेहमीच सद्य परिस्थितीवर बोलतो तेव्हा मला दोन्हीकडचे एक्स्ट्रीमिस्ट शिव्या देतात. हे म्हणतात तू काफिर आहेस, नरकात जा तर ते म्हणतात तू जिहादी आहेस पाकिस्तानात जा. जर पाकिस्तान किंवा नरक हाच पर्याय असेल तर मी नरकात जाणे पसंत करेन, असं यावेळी जावेद अख्तर यांनी सांगताच सभागृहात हास्याचा स्फोट झाला.
हेही वाचा :